राशिभविष्य
बुधवार दि. 25 सप्टेंबर ते दि. 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत
ऋण काय असते? हे बघितले, हेही समजून घेतले की किती कर्तव्ये असतात. आता दोष किती प्रकारचे असतात? त्याची लक्षणे काय असतात? आणि त्यावर उपाय काय? हे बघू या. कृपया लक्षात घ्या की एखाद्या जाणकार ज्योतिषाला दाखवल्याशिवाय केवळ लक्षणांवरून उपाय करू नका. आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे दोष आहेत किंवा ही जी ऋणे आहेत ती पूर्वजन्मीच्या कर्मांची फळे तरी आहेतच पण त्याचबरोबर जर या जन्मामध्ये आपण या चुका करत असलो तर पुढच्या जन्मात काय होणार याची झलकही आहे. इथे मी नम्रपणे सांगू इच्छितो. 1939 साली पंडित रूपचंद जोशी यांच्याद्वारे जे ज्योतिषी ज्ञान अवतरीत झाले, ज्याला लाल किताब असे नाव दिले गेले त्याच्या आधारे हे लिखाण आहे.
- स्वऋण : म्हणजे स्वत:चे स्वत:वर असलेले कर्ज. मागील जन्मी चांगले अवसर हाती असतानादेखील अधर्माने वागल्यामुळे हे ऋण येते. त्याची सामान्य लक्षणे म्हणजे व्यक्ती स्वकर्तृत्वावर पुष्कळ मानसन्मान, धनप्राप्ती करते. समाजात स्थान निर्माण करते आणि एकाएकी होत्याचे नव्हते होते. करोडपती रोडपती होतो. शारीरिक हानी होते. तोंडात कायम थुंकी जमा होणे हेही याचे लक्षण आहे. यावर उपाय म्हणजे नित्यनेमाने अग्निहोत्र करणे, धर्माचरण करणे. घरातील सगळ्या सदस्यांकडून पैसे घेऊन यज्ञ याग करणे.
- मातृऋण : जर व्यक्ती गेल्या जन्मी आईचे हाल होण्याकरता कारणीभूत झाली असेल, आईला त्रास दिला असेल, घराबाहेर काढले असेल तर मातृऋण भोगावे लागते. यामध्ये अपरिहार्य कारणास्तव संपत्तीचा ऱ्हास होतो. एखादे मोठे ऑपरेशन करावे लागणे किंवा अचानक अशी घटना घडणे की, ज्यामुळे घर गहाण ठेवावे लागावे हेही असे लक्षण आहे. जनावरे पाळली असतील तर दुभत्या जनावरांचा मृत्यू होणे हेही एक सामान्य लक्षण आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अचानक बाधा येणे, कोणी मदत करायला गेले तर त्याचेही वाईट होणे हे सुद्धा एक लक्षण आहे. बोअर किंवा विहीर यांचे पाणी बंद होणे यावरून हेही कळते. यावर उपाय म्हणजे घरातल्या प्रत्येकाकडून समान पैसे घेऊन त्याची चांदी घेऊन ती जल प्रवाहित करणे.
- स्त्राrऋण : मागील जन्मी कुठल्याही प्रकारे कोणत्याही स्त्राrस त्रास दिला असेल, गरोदर बाईला पीडा दिली असेल, स्त्राrचा अनादर केला असेल, तिची अन्नान्नदशा केली असेल, छळ केला असेल तर हे ऋण लागते. अशा वेळेला रंगाचा बेरंग होणे हे प्रमुख लक्षण आहे. घरात मंगल कार्य आहे आणि त्याच वेळी घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा लकवा मारणे हे दुसरे लक्षण आहे. यावर उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्त्राrचा आदर करणे आणि परिवारातील प्रत्येक सदस्याकडून समान पैसे घेऊन एकावेळी 100 गाईंना चारा घालणे.
- संबंधी- ऋण- पूर्वजन्मात आपल्याच सग्या सोयऱ्यांना जर धोका दिला असेल, कुणाच्या घराला आग लावली असेल, घर होताना आडकाठी आणली असेल तर हे ऋण भोगावे लागते. याचे लक्षण म्हणजे व्यक्ती उच्च पदावर पोहोचते, मान सन्मान मिळतो, स्वकष्टाने धनार्जन करते, वैरींवर मात करते आणि अचानक फासा फिरतो. संकटावर संकटे येतात. संततीला अपार कष्ट होतात. एक डोळा बिघडतो, शरीरात रक्ताची कमी होते. अत्याधिक राग येतो. यावर उपाय म्हणजे परिवारातील सगळ्यांकडून समान पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये दान करणे.
- बहिणीचे किंवा मुलीचे ऋण- मागील जन्मी बहिणीवर अन्याय केला असेल, तिची संपत्ती हरण केली असेल, तिच्या विवाहात अडथळे आणले असतील किंवा स्त्राr भ्रूण हत्या केली असेल तर हे ऋण लागू होते. कुबेरासारखी संपत्ती असलेला माणूस एकाएकी कंगाल होतो. विशेषत: संततीच्या जन्मानंतर हे घडते. याची लक्षणे म्हणजे दातांचा क्षय होणे. पौऊषत्व नाहीसे होणे. वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे. यावर उपाय म्हणजे अनाथ मुलीच्या विवाहाला सर्वतोपरी मदत करणे, लहान मुलींच्या शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याच्या खर्च उचलणे, घरातील प्रत्येक सदस्याकडून समान रक्कम घेऊन पिवळ्या कवड्या खरेदी करणे आणि त्या जाळून पूर्ण राख करणे आणि ती राख वाहत्या पाण्यात विसर्जित करणे.
- ब्रह्म ऋण किंवा बृहस्पतीचे ऋण - आपल्या घरचे पौरोहित्य करणाऱ्या गुऊजींवर अन्याय करणे. त्यांचा हक्क मारणे. अकारण त्रास देणे. याने हे ऋण उत्पन्न होते. यामध्ये शिक्षण अर्धवट राहते. याचे आणखीन एक कारण म्हणजे वड, पिंपळ, औदुंबरसारख्या पवित्र झाडांची कत्तल करणे. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीवर हे ऋण आहे त्या व्यक्तीसंबंधी खोट्या अफवा पसरवल्या जातात. खोट्या केसमध्ये व्यक्तीला अडकवले जाते आणि काही प्रसंगी तुऊंगवासही घडतो. यावर उपाय म्हणजे पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना सर्वतोपरी मदत करणे, मंदिर किंवा धर्मस्थळ निर्माण करण्याकरता आर्थिक मदत करणे, चारित्र्य शुद्ध ठेवणे.
मेष
खर्च वाढल्यामुळे चिंता वाटू शकते पण त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे चांगले योग बनत आहेत. लांबून चांगली खबर मिळू शकते. मनात वाईट विचार येऊ देऊ नका. दागदागिने खरेदी करण्याचे योग होत आहेत. पराक्रमाला झळाळी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंददायक घटना घडतील. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
उपाय : दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घ्यावे.
वृषभ
जमिनी संबंधी काही व्यवहार अडकले असतील तर ते पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. वाहन सुख उत्तम मिळेल. नोकरीमध्ये आशादायक घटना घडतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग येतील. धर्मविषयक आस्था वाढेल. प्रवासाचे योग आहेत. लाभाचे प्रसंग येतील. मित्रांचा सहयोग लाभेल.
उपाय : मोहरीच्या तेलाचे दान करावे.
मिथुन
आत्मविश्वासाची कमी जाणवू देऊ नका. दुसऱ्यांच्या बाबतीत मत व्यक्त करत असताना सावध रहा. जवळची व्यक्ती चुगली करू शकते. प्रवासातून लाभाचे योग आहेत. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मानसन्मान प्राप्त होईल. दिखावा करणाऱ्या मित्रांपासून दूर रहावे.
उपाय : निळे फूल गटारीत टाकावे.
कर्क
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रतिकार शक्ती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. डोळ्यांचे दुखणे येऊ शकते. भागीदारीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला विशेष लाभाचे योग बनत आहेत. धनप्राप्ती उत्तम असेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदाने वेळ घालवाल. भाग्याची उत्तम साथ आहे. लांबचा प्रवास टाळावा.
उपाय : हिरव्या शाईने डाव्या मनगटावर 369 नंबर लिहावा.
सिंह
इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. विवाहोत्सुक व्यक्तींसाठी अनुकूल काळ आहे. प्रवासातून आर्थिक लाभ संभवतो. जमिनीचे व्यवहार करू नयेत. आई विषयक चिंता वाटेल. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाचे कौतुक होईल. गुप्त शत्रू वाढतील. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते.
उपाय : गरजूला काळी छत्री दान द्यावी.
कन्या
धनप्राप्ती समाधानकारक राहील. गुंतवणुकीतून मिळालेले पैसे ठेवी म्हणून जतन कराल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवासात धोका संभवतो. जमिनीतील व्यवहारात यश प्राप्त होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभाचे प्रसंग येतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मांगलिक कार्याकरिता खर्च होईल.
उपाय : केशराचा टिळा माथी लावावा.
तूळ
नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा प्रगतीचा असणार आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. शारीरिक व्याधी दूर होतील. धनसंचय मात्र कष्टाने संभवतो. कुटुंबातील वातावरणाला समतोल राखण्याकरता प्रयत्न करावा लागेल. प्रवासातून अर्थार्जन होईल. लाभाचे प्रमाण अधिक असेल. मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवाल. वडिलांच्या तब्येतीची चिंता वाटू शकते.
उपाय : देवीला कुंकूमार्चन करावे.
वृश्चिक
येणारा काळ हा सावधपूर्वक तब्येतीची काळजी घेण्याकरता वापरावा. धनार्जन उत्तम असेल. कुटुंबात सहयोगाचे वातावरण असेल. प्रवासाचे अनेक योग आहेत. धाकट्या बहीण भावंडाकडून फायदा होईल. छोट्या गुंतवणूकीतून लाभ संभवतो. संततीसुख उत्तम असेल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
उपाय : कोळसे पाण्यात प्रवाहित करावे.
धनु
पैसे मिळाल्याने आणि धनसंचय झाल्याने आनंदी असाल. तब्येतीचा पाया उत्तम राहील पण कुपथ्य करणे टाळावे. प्रवासात नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रवास टाळावा. जमिनीच्या व्यवहाराला गती येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका प्रेमसंबंधात ताणतणाव संभवतो. नोकरीत अप्रिय प्रसंग घडेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असतील.
उपाय : बत्तासे दान द्यावे.
मकर
काही व्यावहारिक चिंता सतावू शकतात. आरोग्य उत्तम असेल. धनप्राप्ती कष्टाने होईल. प्रवास घडेल. नोकरदारांनी कोणतेही काम करत असताना विचारपूर्वक करावे. वरिष्ठांची मर्जी राखावी. संततीच्या बाबतीत चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनामध्ये तडजोड करावी लागेल. वारसा हक्काकरता प्रयत्न करत असाल तर अनुकूल वेळ आहे.
उपाय : तांब्याचे नाणे पाण्यात टाकावे.
कुंभ
कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद असेल. पाहुण्यांचे आगमन संभवते. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. सही करताना सावध राहावे. रागाच्या भरात मेसेज किंवा ई-मेल करू नये. उधारी देणे आणि घेणे यातून नुकसान संभवते. जमिनीचे व्यवहार शक्मयतो पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी व्यग्रता वाढेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय : चपातीला मोहरीचे तेल लावून कुत्र्याला खाऊ घालावी.
मीन
जुने मित्र किंवा मैत्रिणी भेटल्याने आनंद होईल. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. घरातील आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असाल. आरोग्य उत्तम असेल. नोकरदार वर्गाला शाब्बासकी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील असे प्रसंग टाळावेत. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. मानसन्मान मिळेल. उत्तम लाभ होतील.
उपाय : जलचरांना भाताची शिते घालावीत.