For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:10 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

दीडकी

Advertisement

आता हे दीडकी काय प्रकरण आहे बुवा? अगोदरच धनू आणि सिंह वाल्यांना अडीचकीची धडकी भरले, मेष वाल्यांच्या मनात साडेसातीची धास्ती बसलेय, मीनवाले कधी एकदा शेवटची अडीच वर्षे जातात याची वाट पाहत आहेत. त्यात भरीस भर म्हणून मी दीडकी या नवीन प्रकाराबद्दल बोलतोय! तुम्ही विचार करत असणार, ‘आता हे दीडकी काय प्रकरण आहे?’ सांगतो. ज्योतिष शास्त्रात दीडकी नावाचा कोणताही प्रकार नाही! हा शब्द ‘मैनेच शोधा है!’ जोक अपार्ट. पण अती झाले आणि हसू आले हा प्रकार झालाय.

खरच. बघा, कुंडलीमध्ये 12 पैकी 3 स्थाने अत्यंत खराब (6, 8, 12), अपोल्कीम स्थाने 3, मारक स्थाने 2, बाधक स्थान 1, 9 ग्रहांपैकी 3 नैसर्गिक शुभ, चंद्र तळ्यात मळ्यात, 5 ग्रह नैसर्गिक पाप ग्रह... माणसाने जगावे की, नाही?????? अंबानीच्या कुंडलीत सुध्दा हीच परिस्थिती आणि एका भिकाऱ्याच्या कुंडलीत सुध्दा हेच चित्र. मग घाबरा कशाला? ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. पुढे ख•ा असेल तर अगोदर सूचित करणारे शास्त्र आहे आणि त्याचा उपयोग हा माणसाचे दु:ख कमी करण्याकरताच व्हायला पाहिजे, ना की घाबरवून पैसे लुबाडण्याकरता. आजचा विषय ‘राहू-केतू’ यांचा 18 मे रोजी होणारा राशिपरिवर्तन आणि परिणाम हा आहे. शनी वत (सारखा) राहू आणि कुजा (कूजृ मंगळा) वत (सारखा) केतू हे वाक्मय प्रत्येक ज्योतिषी पाचवीलाच पाठ करून ठेवतो. या दोन ग्रहांनी ज्योतिषांना जेवढे कमवून दिले तितके दुसरा कोणताही ग्रह देऊ शकणार नाही! गंडमूळ नक्षत्र - केतूची करा शांती, पित्रुदोष - राहू-केतू संबंध- करा शांती, कालसर्प दोष (खर तर जो असतच नाही!) - करा शांती. ज्योतिष जे शिकतात त्यांना गोष्टी कळतात, इतर लोकांचा हा विषयच नसल्याने त्यांना यातले माहीत नसते आणि याचाच फायदा अनेक ज्योतिषी घेतात. राहू-केतूबद्दल थोडक्मयात सांगतो. जे म्हणतात की, ज्योतिष हे शास्त्रच नाही, त्यांना कल्पना नसेल की, ज्योतिष शास्त्राचे 3 विभाग आहेत. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील फक्त होरा या भागात फलादेश सांगितला आहे. सिद्धांत या भागात ग्रह, तारे, नक्षत्रे, त्यांचे अंतर, गती या गोष्टींचा विचार केला गेला आहे. (कल्पना करा, आज आम्हाला विद्वान शिकवणारे गुहेत राहात होते आणि पृथ्वी सपाट आहे, असे मानत होते, त्याच्या कितीतरी हजार वर्षांपूर्वी आमचे पूर्वज ग्रह-गणित सोडवत होते!) पृथ्वी सूर्या भोवती फिरते, चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. या दोघांचे मार्ग जिथे एकमेकाला छेदतात त्या बिंदूंना राहू-केतू म्हणतात. तिथे ठोस, दिसणारे असे काहीही नाही! आकृती पहा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील राहू हा भय, निराशा, गोंधळ आणि ध्यास यांचा अधिपती आहे. राहूचा संबंध गूढ शास्त्राशी देखील आहे आणि केतूप्रमाणे राहू हा सूर्य आणि चंद्राचा शत्रू देखील आहे. ज्योतिषशास्त्रात तो एक अशुभ ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायचे झाले तर, आपल्याला प्रत्येक ग्रह आणि ताऱ्यांचे स्वत:चे असे अस्तित्व आहे, त्यांची उपस्थिती भौतिक आणि स्पष्ट आहे. परंतु भौतिकदृष्ट्या उपस्थित नाहीत ते राहू आणि केतू आहेत. राहूला अन्यथा एक अमूर्त अस्तित्व म्हटले जाते आणि ग्रहण घडवण्यास जबाबदार आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, राहू आणि केतू हे दोन छाया ग्रह आहेत. त्यांना अशुभ ग्रह मानले जातात आणि ‘राहू काल’ हा शब्द कोणत्याही चांगल्या कामाची सुऊवात करण्यासाठी अशुभ मानला जातो.

Advertisement

मेष

भावा-बहिणीचे सहकार्य मिळेल. आरोग्याची चिंता राहील. प्रवास टाळावा. वृद्ध व्यक्तीशी भांडणाची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार टाळावेत. शेअर्समधून लाभ संभवतो. नोकरदारांना प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव असेल. भाग्याची उत्तम साथ आहे. कर्तबगारीमध्ये वाढ होईल.

उपाय : दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान दत्त दर्शन घ्यावे.

वृषभ

आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती कष्टांनी होईल. प्रवासात नुकसानीची शक्मयता आहे. वाहन आणि स्थावर जमिनीचे सुख उत्तम मिळेल. प्रेम प्रसंगात निराशा होऊ शकते. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल.

उपाय : पांढरे तीळ घालून चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे.

मिथुन

दोषयुक्त पाण्यामुळे तब्येतीच्या तक्रारी होतील. घरातील वातावरण चांगले असेल. पैशांची आवक उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडून शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ स्त्राrशी मतभेद होऊ शकतात. शेअर्समधून लाभ होईल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. दूरच्या प्रवासाचे योग असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

उपाय : सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करावी.

कर्क

वाढत्या गर्मीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. बाहेरील खाणे-पिणे टाळावे. प्रवासाचे योग आहेत. घरच्यांची उत्तम साथ मिळेल. जमिनीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेम प्रसंगात यश मिळेल. छोट्या लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन जपून चालवावे.

उपाय : शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

सिंह

बिघडलेली तब्येत सुधारेल. पैशांची आवक उत्तम असेल. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. प्रवास टाळावा. वाहन सूख उत्तम आहे. छोट्या गुंतवणूकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस आहेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कष्टाची तयारी ठेवावी. गुप्तशत्रू नाव बदनाम करण्याची शक्मयता आहे. सावध असावे. लाभाचे योग बनत आहेत.

उपाय : गरजू व्यक्तीला चप्पल दान द्या.

कन्या

तब्येतीची साथ राहील. घरामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीच्या वादांमध्ये यश मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. छोट्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रसंगात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आपले काम चोख करावे.

उपाय : बांधकाम मजुरांना ताक द्यावे.

तूळ

पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. प्रवासातून लाभ होईल. नवीन योजना बनवाल. वाहन सुख उत्तम असेल. आईचे सहकार्य मिळेल. प्रेम प्रसंगात मधुरता निर्माण होईल. नोकरदारांना कष्टाचा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भाग्याची उत्तम साथ मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. लांबच्या ठिकाणांहून फायदा होईल.

उपाय : गाईला चपाती आणि गुळ खायला खायला घाला.

वृश्चिक

इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे चांगले योग बनताहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. जमीन आणि वाहन प्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. चहाडी करणाऱ्यांची तोंडे बंद होतील. व्यवसायामध्ये नाव कमवाल. लाभाची शक्मयता जास्त आहे.

उपाय : मुक्मया जनावरांना खाणे द्यावे.

धनु

आरोग्य सुधारेल. पोटाच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबातील वातावरण उत्तम असेल. दुसऱ्यांना मदत कराल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवास घडेल. प्रेम प्रसंगात निराशा होऊ शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ कमी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भाग्य साथ देईल. प्रतिष्ठेने मध्ये वाढ होईल.

उपाय : मुंग्यांना साखर घालावी.

मकर

नवीन उत्साह जाणवेल. शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल. धनप्राप्ती सहजतेने होईल. जुनी येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास शक्मयतो टाळावा. ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. प्रेम प्रसंगात ताणतणाव येईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरवर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी भांडण संभवते. देव दर्शनाकरता प्रवास कराल.

उपाय : दिव्यांगाना आर्थिक मदत करावी.

कुंभ

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. आरोग्याची साथ मिळेल. कुटुंबात वाद-विवाद संभवतात. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. जमिनीचे व्यवहार टाळावेत. प्रेमीजनांना उत्तम काळ आहे. नोकरवर्गाला कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. वैवाहिक जीवन मधूर असेल. वाहन जपून चालवा, दुखापतीची शक्मयता आहे. सगळ्या प्रकारचे लाभ संभवतात.

उपाय : पिवळा हात ऊमाल जवळ ठेवावा.

मीन

खानपान आणि पथ्य याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:च्या चुकीमुळे तब्येत बिघडण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत लहानसा समारंभ साजरा कराल. धनप्राप्ती उत्तम असेल. या काळात पैसे साठवण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी, वाहन यांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. गुंतवणूक करण्याआधी त्यातील धोके समजून घ्या. हाताखालील लोकांचा त्रास होईल.

उपाय : गणपतीला लाल गुंजा अर्पण करा.

Advertisement

.