खजाना भविष्य
28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026 पर्यंत
मेष
हा आठवडा आपण आपल्या कुटुंबात छान रमून जाल. छोट्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबाबद्दल खूपच भावूक व्हाल. कुटुंबातही आपले कौतुक होईल. आपला आदर करतील. आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे कराल. कामाच्या ठिकाणी आपले कौतुक होईल. शेजाऱ्यांशी स्नेहसंबंध चांगला राहील. आईच्या तब्येतीची मात्र काळजी घ्या.
उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
वृषभ
मन थोडे हळवे, चंचल होईल, पण काळजी करू नका. मनाची समजूत घालून त्यावर संयम ठेवा. सगळे व्यवस्थित होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी आहे. वडील भावंडांच्या गाठीभेटी होण्याचा योग आहे. सभा समारंभात सहभागी व्हाल, जे आपल्याला लाभदायी ठरतील. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या.
उपाय : सोमवारी शंकराला कच्च्या दुधाने अभिषेक करा.
मिथुन
परदेशवारीची किंवा परदेशी मालाचा व्यापार करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत समाधानकारक बातमी कानावर येईल. त्यांच्या अभ्यासात ते योग्य ते प्रयत्न करतील. नोकरीच्या ठिकाणी काम ठीकठाक चालेल. वाहन मात्र जपून चालवा व सोबत आवश्यक ती कागदपत्रे ठेवा.
उपाय: मंगळवारी गणपती अथर्वशीर्ष म्हणा.
कर्क
वडील भावंडांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. सभा समारंभात सहभागी व्हाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील, ज्याचा आपल्याला फायदाच होईल. काही भेट वस्तू मिळतील. नियमित धनप्राप्ती होण्याचा मार्ग सापडेल. मात्र त्यासाठी थोडे कष्ट आपल्याला करावे लागतील. कष्टाचे फळ मिळतेच. त्यामुळे प्रयत्न करा.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
सिंह
हा आठवडा आईच्या सहवासात छान जाईल. दैनंदिन व्यवसायात प्रगती संभवते. त्यामुळे प्राप्ती वाढण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. वाहन चालवताना जरुरीची कागदपत्रे सोबत ठेवा व वाहन जपून चालवा.
उपाय : पक्ष्यांना चारा पाणी घाला.
कन्या
‘आळस झटका व कामाला लागा’ असे हा आठवडा सांगतो आहे. अति आळसानेसुद्धा रोगाला निमंत्रण देण्याचा संभव आहे. काही करणे नकोसे होईल. पण काहीतरी करणे, काहीतरी मिळवणे हे तर गरजेचे आहे. आणि काहीतरी मिळविण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. दूरचे प्रवास अथवा तीर्थयात्रा घडण्याचा संभव आहे.
उपाय : गुरुवारी कपाळावर केशरी टिळा लावून बाहेर पडा.
तुळ
आपल्या कामामध्ये आत्मविश्वास आल्याचे तुमच्या लक्षात येईल. काम करण्यात, त्याबद्दलचा विचार करण्यात कल्पकता येण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. संततीकडे मात्र थोडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यांचे लाड करावेत पण ते फालतू नसावेत एवढे लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीची किंमत सांगा.
उपाय : घरातून बाहेर पडताना अत्तर लावा.
वृश्चिक
मन थोडे हळवे होईल. पण त्याला समजुतीने अध्यात्माकडे तुम्हीच वळवाल. आपल्या कामाशी प्रामाणिक रहाल. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आपण कोणती तरी विद्या मिळविण्याच्या प्रयत्नात असाल किंवा कोणती तरी मोठी परीक्षा देण्याच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल.
उपाय : श्रीगणपती अथर्वशीर्ष म्हणा.
धनु
कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. सांभाळून काम करा. कामात यश मिळेल. काही बाबतीत वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आपले विचार मग ते व्यवसायासंबंधित असोत अगर घरगुती स्वरुपात असोत, मतभेद होतील. त्यामुळे कदाचित उदासीनता येईल. एकांतात रहावेसे वाटण्याची शक्यता आहे.
उपाय : रविवारी आदित्यहृदय स्तोत्र वाचा.
मकर
वाणीवर संयम ठेवावा लागेल, कारण वाणी लक्ष्य होण्याची शक्यता आहे. कामात दुर्लक्ष होण्याचा संभव आहे. आमिषाला भुलून बळी पडू नका. उगीच एवढ्या तेवढ्या कारणावरून चिडचिड होऊ देऊ नका. कामात अडथळे येत असतील तर चांगल्या जाणकारांचा सल्ला घ्या.
उपाय : मंगळवारी संकटनाशन मारुतीस्तोत्र वाचा.
कुंभ
पैतृक संपत्ती मिळण्याच्या प्रयत्नात असाल तर घाई करू नका. योग्य वेळ आली की सर्व व्यवस्थित होईल. आईच्या सहवासात हा आठवडा छान जाईल. नोकरीमध्ये गुप्त शत्रुच्या कारवाया थोड्या फार कमी होण्याचा संभव आहे. पित्याचा आशीर्वाद मिळेल. दूरचा प्रवास घडेल. कदाचित परदेशवारीही घडेल. ज्यातून आपल्याला फायदाच होईल.
उपाय : शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
मीन
खर्चावर नियंत्रण ठेवा. जरुर त्या ठिकाणी तेवढाच खर्च करा. अपव्यय नको. नोकरीच्या ठिकाणी कदाचित स्पर्धेला किंवा परीक्षेला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पण काळजी करू नका. आपले काम चोख असल्याने आपल्या कामाचे कौतुकच होईल. धाकट्या भावंडांच्या बरोबर सहलीचा घाट घालाल. त्यांच्या सहवासात वेळ छान जाईल.
उपाय : शनिवारी दशरथकृत श्री शनैश्चरस्तोत्र वाचा.
