खजाना राशिभविष्य
23.9.2026 ते 29 .9. 2026)
मेष
स्वत:कडे लक्ष द्यावे असे वाटू लागेल. कामाच्या घाईगर्दीत आपण स्वत:कडे लक्ष देत नाही असे वाटण्याची शक्यता आहे. स्वत:च्या दिसण्याकडे व तब्येतीकडे लक्ष द्यावे, असे वाटण्याचा संभव आहे. नोकरीच्या ठिकाणी थोडी बुद्धी वापरून युक्ती युक्तीने काम करावे किंवा करवून घ्यावे लागणार आहे. मातेचा सहवास छान लाभेल.
उपाय : दशरथकृत शनैश्चरस्तोत्र वाचा.
वृषभ
कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचा उरक आणि त्यातील व्यवस्थितपणा याचा वरिष्ठावर प्रभाव पडेल आणि आपले कौतुक होईल. दैनंदिन व्यवसाय असेल तर व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कोणती तरी विद्या प्राप्तीच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना थोड्या कष्टात खूप यश मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.
मिथुन
आपल्या वाणीवर थोडा संयम असू द्या. नोकरीच्या शोधार्थ असाल तर या आठवड्यात आपल्याला मिळण्याची शक्यता आहे किंवा कदाचित अचानक धनलाभ होण्याचा संभव आहे. लॉटरीसारख्या प्रकारातून आपल्याला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराबरोबर सुट्टी छान घालवाल. त्याचे सहकार्य मिळेल.
उपाय : तुळशीला पाणी घाला.
कर्क
आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल तर या आठवड्यात त्याची प्रगती होण्याचा संभव आहे. त्या व्यवसायात आपली प्राप्ती चांगली होईल. त्या क्षेत्रात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली वार्ता कानावर पडेल. त्यांची प्रगती होईल. हातून काही धर्म कार्य होईल. दूरचा प्रवास होईल. पित्याचे आशीर्वाद मिळतील.
उपाय : आपल्या आराध्य दैवताचे नामस्मरण करा.
सिंह
आपल्या वाणीने दुसऱ्यावर छाप पाडाल. वक्तृत्व स्पर्धेत यश मिळेल. परदेशी वस्तूंच्या व्यापाराशी निगडित असाल तर त्यात चांगली प्राप्ती होईल. छोट्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. कदाचित छोट्या सहलीचाही आनंद लुटाल. नोकरीच्या ठिकाणी आपले काम छान व्यवस्थित होईल. पण म्हणावे तसे यश मिळण्यास थोडा उशीर होईल.
उपाय : सूर्योदयाला अर्घ्य द्या.
कन्या
कोणत्याही कामातील आपला आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी आपल्यातला आळशीपणापण जाणवेल. आध्यात्मिक मार्गाकडे वळावेसे वाटण्याचा संभव आहे. घर किंवा जागा खरेदीच्या विचारात असाल तर सध्या थोडे थांबा. त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. नोकरीत सांभाळा.
उपाय: संध्याकाळी महालक्ष्मीची लाल गुलाब वाहून पूजा करा.
तुळ
मोहाला बळी पडू नका. चैन करताना सांभाळून करा. अति खर्च नको. खर्चावर नियंत्रण ठेवा. संततीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल लक्ष विचलित करणारी भरपूर साधने मुलांना आकर्षित करून घेतात. यासारख्या साधनातून त्यांचे लक्ष काढून टाकून अभ्यासाकडे मन वळवले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड नको.
उपाय : मंगळवारी कपाळावर गंध लावून बाहेर पडा.
वृश्चिक
वडिल भावंडांच्या गाठीभेटी होतील. सभा-समारंभात सहभागी व्हाल. ज्याचा आपल्याला लाभच होईल. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाचे कौतुक होईल. जागेच्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्या सुटण्याची शक्यता आहे. काही विशेष विद्या ग्रहण करत असाल तर ती प्राप्त होईल.
उपाय : ॐ नम: शिवायचा जप करा.
धनु
या आठवड्यात आपल्या कुटुंबाच्या बाबतीत काही कारणाने तुम्ही हळवे होण्याची शक्यता आहे. पण वाणीवर संयम ठेवा. सगळे छान होईल. मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात आपला वेळ छान जाईल. आपली नोकरी असेल तर त्या ठिकाणी आपली कलात्मक बुद्धिमत्ता वापराल व वरिष्ठांना खूश कराल. हातून धार्मिक कार्य घडेल.
उपाय : मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.
मकर
या आठवड्यात मन थोडे हळवे होईल. काहीतरी हुरहूर लागल्यासारखी वाटेल. पण मनाला सांभाळा. थोडे धार्मिक कार्यात मन गुंतवा. छान वाटेल. आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेले कार्य व्यवस्थित कराल. थोडे कष्ट पडतील. पण काळजी नको. प्रामाणिकपणे केलेले काम व्यवस्थितच होईल. कदाचित एखादी तीर्थयात्रा घडेल. आनंदी रहा.
उपाय: अपंग किंवा गरजूंना मदत करा.
कुंभ
अति आशा चांगली नव्हे. आपल्याला कदाचित या आठवड्यात सगळेच म्हणजे सर्व क्षेत्रातले सगळे आपल्यापाशी असावे, असे वाटण्याची शक्यता आहे. पण स्वत:वर संयम ठेवा आणि जे सहजासहजी मिळेल तेवढेच घ्या. अट्टाहास नको. नोकरीत प्रामाणिक रहा. चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा विचारही नको.
उपाय : शनि मंदिरात जाऊन शनिचे दर्शन घ्या.
मीन
दैनंदिन व्यवसायात असाल तर आपल्या चतुरतेने व्यवसायवृद्धी कराल. पण आळसाला थारा देऊ नका. संततीच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या भावंडाच्या, मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होतील आणि त्यातून आपल्याला लाभच घडेल. एखादी विद्या आत्मसात करणार असाल तर यश मिळेल.
उपाय : शनिवारी दशरथकृत श्री शनैश्चरस्तोत्र वाचा.