For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:05 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

(26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026)

Advertisement

मेष

आपण करत असलेल्या कुठल्याही कामात आपला नीटनेटकेपणा आणि सुव्यवस्थितपणा लोकांना दिसून येईल. त्याबद्दल आपले सर्वत्र कौतुकही होईल. मातेचा सहवास छान मिळेल. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील आणि त्या संधीचा योग्य तऱ्हेने फायदा करून घ्यावा. नवीन वाहन खरेदीचा विचारही मनात येईल. नोकरीच्या ठिकाणी वाणीवर संयम ठेवा.

Advertisement

उपाय : कपाळावर केशरी गंध लावून बाहेर पडा.

वृषभ

या आठवड्यात वाणीवर थोडा संयम ठेवावा लागेल. लहान भावंडांसोबत एखादा छोटा प्रवास घडेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामात चांगलीच प्रगती दिसून येईल. आपला स्वत:चा  व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात चांगलीच प्रगती प्राप्ती होईल. जोडीदाराकडूनही चांगले सहकार्य मिळेल. हातून काही दानधर्म घडेल. सत्संग मिळेल.

उपाय : गुरुवारी विष्णुसहस्त्रनाम म्हणा.

मिथुन

आपल्या बोलण्याने समोरील व्यक्तीवर छाप पाडाल. स्त्रीकडून घरकाम होण्याची शक्यता आहे. कदाचित कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. पण टूरिस्ट कंपनीबरोबर जाणार असाल किंवा वैयक्तिक प्रवास कराल तर संपूर्ण माहिती घेऊन जा. नोकरीच्या ठिकाणी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती थोड्या वेळाने होईल. धीर धरा.

उपाय: मंगळवारी हनुमानाचे मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

कर्क

आपला जर दैनंदिन काही व्यवसाय असेल तर या आठवड्यात त्यात प्रगती होण्याची शक्यता दिसते. जोडीदाराकडून योग्य ते सहाय्य मिळेल. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या कामात आत्मविश्वास दिसेल. पण कदाचित आपल्या बोलण्याने कुणाचे तरी मन दुखावले जाईल. म्हणून वाणीवर संयम असू द्या. वाहन जपून चालवा. सांभाळून रहा.

उपाय : सोमवारी महादेवाला बेल वाहा.

सिंह

नोकरीच्या शोधार्थ असाल तर या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपल्याला सहकार्यही मिळेल. पण आपण वाणीवर संयम ठेवला पाहिजे. नाहीतर आपल्या बोलण्याने होत असलेले काम बिघडून जाण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. स्वत:ला सांभाळा.

उपाय : बुधवारी संकटनाशन गणेशस्तोत्र म्हणा.

कन्या

संततीकडून काहीतरी शुभ समाचार कळण्याची शक्यता आहे. त्यांच्या अभ्यासातील प्रगतीची वार्ता येईल. कामाच्या ठिकाणी आपले काम व्यवस्थित झाल्यामुळे वरिष्ठ खूष होतील. आईच्या आणि आपल्याही तब्येतीची काळजी घ्या. काही कारणामुळे दमल्यासारखे होईल. सुस्ती येईल. नीट औषधपाणी व विश्रांती घेऊन कामाला लागा.

उपाय: रोज तुळशीला पाणी घाला.

तुळ

आईच्या सहवासात आपला हा आठवडा छान जाईल. दूरच्या प्रवासाला किंवा तीर्थयात्रेला जाल. अथवा तयारीला लागाल. जे काम कराल त्यात यश मिळेल. नोकरीच्या शोधार्थ असलेल्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि  मिळालेल्या नोकरीमध्ये मन लावून आणि प्रामाणिकपणे केलात तर यश तुमच्या हातात आहे.

उपाय : शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करा.

वृश्चिक

वाणीवर संयम ठेवा. काही लोक फारच स्पष्ट व रूक्ष बोलतात यावर जरा संयम ठेवायला शिका. आपल्या पूर्वार्जित प्रॉपर्टीच्या संदर्भात काही चर्चा विनिमय होण्याचा संभव आहे. त्यात तुम्ही बोलू नका. नोकरीच्या ठिकाणी आपले काम अगदी चोख व व्यवस्थित  होईल आणि त्याची आपल्या वरिष्ठावर व सहकाऱ्यावर छाप पडेल.

उपाय: मंगळवारी बजरंगबाण वाचा.

धनु

आपल्या वाणीने लोकांवर चांगली छाप पाडाल. लोकांना आपलेसे करून घ्याल. तुमच्या वागणुकीमध्ये आपोआप बदल झालेला तुम्हाला स्वत:ला सुद्धा जाणवेल. कुटुंबातील सर्वांशी सहकार्याने वागून वेळप्रसंगी धाकट्या भावंडांना किंवा इतरांना मार्गदर्शन कराल. काही मानसिक तणाव असतील तर या आठवड्यात दूर होताना दिसतील.

उपाय: आपल्या आराध्य दैवताचे नामस्मरण करा.

मकर

मन काहीसे चंचल किंवा द्विधा होण्याचा संभव आहे. हे करू, का ते करू या गोंधळातच आपला वेळ जाण्याची शक्यता आहे. पण गोंधळून न जाता शांत रीतीने विचार केलात तर योग्य निर्णय निश्चितपणे घेऊ शकाल. या आठवड्यात आपल्या गायन कलेला किंवा वक्तृत्व कलेला कुठे ना कुठे तरी वाव मिळण्याचा संभव आहे.

उपाय: सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.

कुंभ

अति तेथे माती या म्हणीनुसार अति लोभ हा माणसाला घातक ठरतो. ही गोष्ट सतत लक्षात ठेवावी. एखादा आपल्याला मदत करतो म्हणून त्याच्याकडून सतत अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान करा. त्यांचे काम किंवा त्यांची सेवा करताना कंटाळून जाऊ नका. त्यांना तृप्त करून त्यांचे आशीर्वाद घ्या.

उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा.

मीन

खर्चावर नियंत्रण ठेवा. जिथे गरज असेल तिथेच खर्च करा. घर किंवा वाहन खरेदीचा विचार येण्याचा संभव आहे. पण पूर्ण विचार करून कागदपत्रांची पूर्ण  शहानिशा करूनच पुढे पाऊल टाका. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात प्रगती झालेली समजून येईल. पाल्याच्या प्रगतीची बातमी ऐकून खुश होऊन जाल. खूष रहा.

उपाय: दशरथकृत शनेश्चर स्तोत्र वाचा.

Advertisement
Tags :

.