For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:02 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

5 ते 11 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष

मन थोडे चलबिचल, अस्वस्थ राहील. एखाद्या गोष्टीवर निर्णय काय घ्यावा, यासाठी द्विधा मन:स्थिती होईल. शांत रहा. शांततेने विचार केल्यास योग्य मार्ग नक्की सापडेल. नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी योग्य मार्ग सापडून काम चोख होईल. आपल्या कामावर वरिष्ठ खूष होतील. पगारवाढ किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

उपाय: रोज सूर्याला अर्ध्य द्या.

वृषभ

पैत्रुक संपत्तीच्या बाबतीत काही चर्चा चालू असल्यास त्यातून आपल्याला फायद्याचेच निष्पन्न होईल. आपल्या चतुरबुद्धीने त्यावर तोडगा काढाल. यात  आपल्या जोडीदाराचेही पूरक असे सहाय्य मिळेल. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. ऑफिसमध्ये देखील आपल्या हाताखालील नोकरांकडून मोठ्या शिताफीने सगळी कामे करून घ्याल. अडचण येणार नाही.

उपाय : सद्गुरुंची आराधना करीत जा.

मिथुन

या आठवड्यात वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. आपल्यात आत्मविश्वास येईल आणि त्याबरोबरच अहंकारही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ला सांभाळा. आपल्या बुद्धीचा चांगल्या प्रकारांनी उपयोग करून घ्या. कष्ट करा, कष्टाला पर्याय नसतो. वाहन खरेदीच्या विचारात असाल तर सध्या खरेदी करू नका. शांतपणाने फक्त काम करा.

उपाय: रविवारी आदित्यहृदय वाचा.

कर्क

या आठवड्यात कुटुंबापासून थोडे अलिप्त राहाल अथवा असे काही  काम निघेल की काही काळापुरते दूर जावे लागेल. आत्मविश्वास वाढेल.  काम चोख आणि प्रामाणिकतेने कराल. आणि त्याचे फळही मिळण्याची शक्यता आहे. पण चुकूनही झटपट पैसा मिळवायच्या नादात शॉर्टकट अवलंबू नका. असा शॉर्टकटने पैसा मिळणार नाही.

उपाय: सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.

सिंह

या आठवड्यात आपल्याला थोडी उदासीनता आल्यासारखी वाटेल. कोणत्याच कामात इंटरेस्ट घेऊन करावेसे वाटणार नाही. पण यंत्रवत कामे करीत राहाल, त्यात काही चूक होणार नाही. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधार्थ असाल तर ती मिळण्याची शक्यता आहे. या बाबतीत वडील भावंडे किंवा यांचे सहकार्य मिळेल.

उपाय: हनुमान चालीसा वाचा.

कन्या

तब्येतीला सांभाळा. आरोग्याच्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. थोडक्यात असतानाच व्यवस्थित उपचार करा. आळशीपणा करू नका. आईची मदत मिळेल. आशीर्वाद मिळेल. तिचे मन मात्र मोडू नका. तिच्यावर चिडचिड करू नका. तब्येतीमुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण शांत राहण्याचा प्रयत्न करा. आणि कामात लक्ष द्या.

उपाय: संकटनाशन हनुमान स्तोत्र वाचा.

तुळ

कष्टाशिवाय पर्याय नाही हे तर आपल्याला माहितीच आहे. काहीतरी मिळवायचे असेल तर त्यासाठी योग्य तो मार्ग निवडून कष्ट केलेच पाहिजे. या आठवड्यात आपल्याला ते करावे लागणार आहेत. आणि त्याचे फळही आपल्याला मिळण्याचा संभव आहे. आपले काम खूपच छान होईल. त्यामुळे आपला मान, सन्मान व प्रतिष्ठा पण वाढेल.

उपाय: मंगळवारी श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणा.

वृश्चिक

आतापर्यंतच्या तब्येतीच्या किरकोळ तक्रारी हळुहळू कमी होतील. घरात आनंद, सुख नांदू लागेल. तुम्ही स्वत: पुढाकार घेऊन एखादी मोठी सहल आयोजित कराल. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मोठ्या अक्कल हुशारीने समर्थपणे सांभाळून न्याल. पण हे सगळे करताना आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. नाहीतर केलेल्या कामावर पाणी ओतले जाईल.

उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.

धनु

नोकरदार वर्ग, आपल्या कामाच्या ठिकाणी जबाबदारीने काम करू लागेल. नीट व्यवस्थित काम करण्याकडे त्यांचा कल असेल. पण अग्निशी खेळू नका. आगीच्या जवळ जाऊ नका. लांबच्या तीर्थक्षेत्री भेट द्यायची संधी येईल. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कोणत्याही मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका. खर्च टाळा.

उपाय: आपल्या आराध्याचे नामस्मरण करा.

मकर

आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. अहंपणाने बोलताना समोरच्या माणसाचे आपण मन दुखावत नाही ना याचा विचार करा. बाकी या आठवड्यात आपला आत्मविश्वास वाढेल. जे काही कराल त्यात तुमची कार्यक्षमता प्रामुख्याने दिसेल. मुलांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. त्यांना समजुतीने घ्यावे लागेल. इतरांवर वर्चस्व गाजवू नका.

उपाय: घरातून बाहेर पडताना केशरी गंध कपाळावर लावा.

कुंभ

आपण आयुष्यात जी गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात, त्या प्रयत्नाला चालना मिळेल आणि ती गोष्ट मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. सरकारी योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण त्या प्रयत्नांना थोडी शांततेची साथ द्या. शांततेने व संयमाने प्रयत्न करीत रहाल तर यश मिळेल.

उपाय: संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा.

मीन

या आठवड्यात थोडा मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. पण मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व गोष्टीतून मार्ग हा सापडतोच. खर्चावर नियंत्रण असू द्या. खर्च करताना योग्य अयोग्यतेचा विचार करून खर्च करा. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तिच्याशी मतभेद किंवा वाद घालू नका. मुलांच्या भावना समजून घ्या.

उपाय: दशरथकृत शनैश्चरस्तोत्र वाचा.

Advertisement
Tags :

.