खजाना राशिभविष्य
बुधवार, दि. 22 ते मंगळवार, दि. 28 जुलै 2026 पर्यंत
मेष
आपल्या कामाच्या ठिकाणी आपण आपल्या बुद्धीचातुर्याने कामाचे नियोजन करून ते व्यवस्थित वेळेवर पूर्ण कराल. त्यामुळे आपले काम छान होईल आणि त्यावर आपले सहकारी वर्ग व अधिकारी वर्ग खूश होतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आपले कौतुक होईल. मानसन्मान, उच्चपद प्राप्तीदेखील होण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीमध्ये आत्मविश्वास दिसेल.
उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
वृषभ
या आठवड्यात आपल्या वाणीमध्ये लोकांना खूप फरक जाणवेल. आपण जे बोलाल किंवा ज्या विषयावर बोलाल ते अभ्यासपूर्णच असणार आहे. त्यामुळे आपल्या अशा बोलण्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडून आपल्याबद्दलचा आदर समाजात वाढेल. आपण जर नोकरी करत असाल, तर तिथल्या कामावर असाच काहीसा परिणाम जाणवेल. छोट्या भावंडांबरोबर छोटे प्रवास घडतील.
उपाय : मंगळवारी रात्री हनुमान चालीसा वाचा.
मिथुन
छोटे मोठे उद्योग करण्याचा विचार येऊ लागेल. नुसता विचार करत बसू नका. तो विचार कृतीत आणण्याची कदाचित वेळ आली आहे. सौंदर्य प्रसाधने अथवा इमिटेशन ज्युवेलरी यांचा घरबसल्या व्यापार आपण सुरू करू शकता किंवा त्वचा रक्षणाच्या हर्बल उत्पादनांचा व्यापार करू शकता. आपले बुद्धीचातुर्य वापरून त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आपले बोलणेही मिठ्ठास होईल.
उपाय : शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करा.
कर्क
आपण करत असलेल्या कामात आपला आत्मविश्वास दिसून येईल. तुमचे तुम्हाला सुद्धा ते जाणवेल. तो अति होऊ देऊ नका. काहीवेळा तो अति झाल्याने अहंपणा येण्याचा संभव असतो. अचानक धनलाभ किंवा पैतृक संपत्तीद्वारा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण हा धनलाभ योग्यरीतीने होतो आहे का, याची शहानिशा करा. योग्य मार्गाने असेल, तरच स्वीकारा.
उपाय : गुरुवारी दत्तगुरुंच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
सिंह
या आठवड्यात जरा आपले स्वत:कडे जास्त लक्ष जाईल. आपण छान दिसावे, चार लोकात उठून दिसावे असे आपल्याला खूप वाटू लागेल. काही हरकत नाही. पण दिसण्यापेक्षा तब्येतीकडे जास्त लक्ष द्या. तब्येतीने ठणठणीत राहाल, तर त्याचे तेज आपल्या चेहऱ्यावर आपोआप येत जाईल. आपल्या कामाकडेही व्यवस्थित लक्ष लागेल. काम व्यवस्थित होऊन कौतुकही होईल.
उपाय : गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणा.
कन्या
वडील भावंडांच्या भेटी होतील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये वरिष्ठ त्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना उच्चपद देण्याचा संभव आहे. आपल्या कामामध्ये आपण अत्यंत प्रामाणिक राहाल आणि या प्रामाणिकपणाचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळणार. आपल्या हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. पण आळस सोडावा लागेल.
उपाय : ॐ हं हनुमते नम: चा जप करा.
तुळ
मुलांच्या बाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना अभ्यासापासून किंवा कामापासून लक्ष विचलित करणारी व्यवधाने भरपूर येतील. त्यात अडकण्याचा संभव आहे. त्यांना त्यातून बाहेर पडण्यास मदतीचा हात देण्याची गरज आहे. मुलांना अभ्यासाकडे लक्ष देण्यास मदत करा. आपल्याला कोणत्या तरी सरकारी योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
वृश्चिक
या आठवड्यात आपल्या उद्योगात भरभराट होण्याची शक्यता आहे. आपण ज्योतिष, गूढ विद्या याचा अभ्यास करत असाल, तर ती आत्मसात कराल. सौंदर्य प्रसाधने किंवा दागिने यांचा व्यवसाय करत असाल, तर त्यात वृद्धी होईल. कदाचित उद्योगासंदर्भात आपले प्रवासही घडतील. काही धर्मकार्य घडेल. वडिलांचे आशीर्वाद मिळतील. सत्संग घडेल.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
धनु
एवढ्या तेवढ्या कारणावरून चिडचिड होण्याचा संभव आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. बुद्धीचातुर्याचा उपयोग करून आपले काम करून घ्या. कदाचित आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याचा संभव आहे. पण आपल्या फटकून वागण्याने होत आलेल्या कामाचा विचका होईल. शांततेने, संयमाने वागण्याचा प्रयत्न करा.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.
मकर
आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये व्यवस्थितपणा येईल. खूप कष्टाने एखादे काम होईल. कष्टाला पर्याय नाही. पण कष्टाचे फळ मिळेल आणि म्हणूनच आत्मविश्वासही वाढेल आणि काम करताना गुरुचेही साहाय्य मिळेल. कौटुंबिक बाबतीत मात्र थोडी किरकिर वाढण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढण्याचा संभव आहे.
उपाय : मंगळवार व शनिवार संकटनाशक हनुमानस्तोत्र वाचा.
कुंभ
या आठवड्यात जे काही काम कराल त्यात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकारी वर्गाचे आणि आपल्या हाताखालील नोकरवर्गाचे सहकार्य मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या बातमीने मन खूश होऊन जाईल. एकंदरीत हा आठवडा छान जाईल. पण आईच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्या. आईला सांभाळा.
उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.
मीन
आळस झुगारून कामाला लागा, असे हा आठवडा सांगतो आहे. केलेल्या कष्टाचे फळ नक्की मिळेल. आपल्याला कोणती तरी नवीन विद्या शिकण्याची संधी मिळेल. संधीचा उपयोग करून घ्या. आपल्या हातून काहीतरी लेखन होईल. आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांची कदर केली जाईल. या कलांचा उपयोग करून घ्या. आठवडा छान जाईल.
उपाय : शनिवारी दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.