For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:01 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

बुधवार, दि. 1 ते मंगळवार, दि. 7 जुलै 2026

Advertisement

मेष

घर अथवा वाहन घ्यायचा विचार किंवा आपली जुनी स्थावर मालमत्ता असेल, तर त्यावर बांधकाम करण्याचा विचार करण्यास काहीच हरकत नाही. पण ते सर्व करताना थोडा आपला बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. शब्द जपून वापरा, आपले कामही झाले पाहिजे, पण समोरच्या माणसाला न दुखावता.

Advertisement

उपाय : मंगळवारी ॐ हं हनुमते नम: या मंत्राचा जप करा.

वृषभ

आपल्या हातून होणारे काम अतिशय उत्तमपणे होईल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. त्याचा/तिचा काही स्वतंत्र व्यवसाय असेल, तर या आठवडय़ात त्या व्यवसायात वृद्धी होईल. त्यामध्ये आपले मोलाचे साहाय्य असेल. या आठवडय़ात आपल्या हातून काहीतरी चांगले धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे.

उपाय : गुरुवारी मंदिरात जाऊन श्री दत्ताचे दर्शन घ्या.

मिथुन

या आठवडय़ात आपला आत्मविश्वास वाढण्याची जाणीव होईल. कोणतेही काम करताना पूर्ण विचारांनी आणि पूर्वनियोजन करून कराल. आपल्या बोलण्याचा दुसर्‍या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडेल. पण म्हणून भान सुटू देऊ नका. अति आत्मविश्वासदेखील कधी कधी दु:खास कारणीभूत ठरू शकतो.

उपाय : शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

कर्क

या आठवडय़ात तुमच्या बुद्धीची चुणूक सर्वांच्या लक्षात येईल. ज्यांचे विवाह ठरत नव्हते किंवा ज्यांना विवाहाबाबत उदासीन वाटायचे अशांचे विवाह ठरण्याची किंवा विवाह करावासा वाटण्याची शक्यता आहे. काहीजणांना अनपेक्षितपणे धनलाभ संभवतो. पण तो धनलाभ योग्य मार्गाने आला तरच स्वीकारा.

उपाय : घरातून बाहेर पडताना केशरी टिळा लावा.

सिंह

नोकरीत असाल, तर ऑफिसमध्ये आपला सन्मान वाढण्याची शक्यता आहे. हाताखालील लोकांकडून योग्य ते सहकार्य मिळेल. ज्यांना नोकरी नाही आणि ते त्याच्या शोधार्थ असतील, तर त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी कुठे पैसे देऊन फसू नका.

उपाय : तिन्हीसांजेला देवापुढे तुपाचा दिवा लावा.

कन्या

या आठवडय़ात आपल्याला मोठय़ा सभा–समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्यामुळे आपल्याला काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. वडील भावंडांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात आपला हा आठवडा छान जाईल. पण त्याचबरोबर या आठवडय़ात थोडा आळशीपणा येईल. आळस झटकून कामाला लागा.

उपाय : सूर्योदयाला जल अर्पण करा.

तूळ

या आठवडय़ात आपल्या कामाच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपली पत-प्रतिष्ठा वाढेल. स्वतंत्र व्यवसायात भरभराट होण्याचा संभव आहे. अचानक धनलाभाचीदेखील शक्यता आहे. पण प्रलोभनाच्या मागे धावू नका. तब्येतीला सांभाळा. नोकर-चाकरावर अति विश्वास नको.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

वृश्चिक

आपला हा आठवडा सत्संग, धर्मकार्य, संतदर्शन अशा पवित्र कार्यात छान जाणार आहे. लहान भावंडासोबत एक छोटा प्रवास घडण्याचीही शक्यता आहे. काही तरी प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचाराने तशी पावले उचलाल. प्रॉपर्टी खरेदी करताना मात्र पूर्ण चौकशी करून कागदपत्रे हातात येईतोवर पैशाचा व्यवहार करू नका.

उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.

धनु

नोकरदार वर्ग आपल्या कामामध्ये चोखपणा दाखवण्याचा संभव आहे. त्यांच्यातला आत्मविश्वास त्यांच्या कामात व्यवस्थित दिसेल पण तो आत्मविश्वास गर्व होऊ देऊ नका. देवाने दिलेल्या गुणांचा व्यवस्थित वापर करा आणि त्याचे आभार माना. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा.

उपाय: पर्समध्ये 3-4 हिरवे वेलदोडे ठेवून मग बाहेर पडा.

मकर

वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या बुद्धिचातुर्याचा लाभ घेऊन आपण संपत्तीचा लाभ घ्याल. या आठवडय़ात आपण सुखोपभोग घेण्याचा संभव आहे. आपल्या वाणीने आपण सर्वावर छाप पाडाल. आपल्या हातून काही लेखन होईल. या काळात आपल्याला थोडे आत्मिक समाधान लाभेल.

उपाय : मुक्या प्राण्यांना खायला द्या.

कुंभ

अति हव्यास करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. कोणती गोष्ट चांगली आहे. आणि कोणती गोष्ट वाईट आहे, हे स्वत:च्या अनुभवावरून ठरवा. कोणी बोलले किंवा तुम्हाला पटवून दिले म्हणून विश्वास ठेवू नका. स्वत: विचार करा. कोणतीही गोष्ट सहजासहजी किंवा पटकन मिळत नसते. काही शारीरिक व्याधी हळूहळू कमी होऊ लागतील.

उपाय: दशरथकृत शनैश्चरस्तोत्र वाचा.

मीन

मुलांच्या प्रगतीच्या वार्ता ऐकून मन समाधान पावेल. आपल्याला आपली इच्छुक विद्या संपादन करण्याची संधी मिळेल. आपल्या हातून काही दानधर्म घडेल. आपल्याला आपल्या आईचा संपूर्ण पाठिंबा व सहकार्य मिळेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागणार असे दिसते. पण केल्या कष्टाचे फळ मिळेलच.

उपाय : शनिचालिसा शनिवारी वाचा.

Advertisement
Tags :

.