For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:01 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

बुधवार, दि. 24 ते मंगळवार, दि. 30 जून 2026 पर्यंत

Advertisement

मेष

वाणीवर संयम ठेवा. न जाणो अगदी होत आलेले काम आपल्या बोलण्याने बिघडून जाईल. काही गोष्टी स्पष्ट बोलाव्याच लागतात. पण बोलताना दहादा विचार करून बोला. हाताखालील नोकरावर फार विश्वासून राहू नका. घर, वाहन अथवा जमीन खरेदी करण्याचा विचार मनात सतत येण्याची शक्यता आहे, घेण्यास हरकत नाही.

Advertisement

उपाय : शनिवारी मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

वृषभ

आपण आपले काम शिस्तीत करतच असतो. पण त्याचबरोबर दुसऱ्याकडूनही तशाच कामाची अपेक्षा असते आणि जर ते तसे झाले नाही, तर आपली चिडचिड होते. असेच काहीसे आपल्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. पण काळजी करू नका. आपले काम छानच होईल. जर आपला दैनंदिन व्यवसाय असेल, तर या आठवड्यात व्यवसायवृद्धी होईल.

उपाय : मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

मिथुन

आपल्या कुटुंबासमवेत हा आठवडा छान घालवाल. पण या काळात आपल्या शिस्तीला, आपल्या नियमाकडे जरा दुर्लक्ष करा. सगळीच कामे घड्याळाच्या काट्यावर करायची नसतात. काहीवेळा सोडून द्यायची असतात. आपल्या बोलण्यात मृदुता असू दे. त्यामुळे आपल्याला इतरांशी सुसंवाद साधता येईल.

उपाय : सोमवारी महादेवाला बेल वाहा.

कर्क

या आठवड्यात आपला आत्मविश्वास वाढल्याचे आपल्याला जाणवेल. हाती घेतलेले काम आपल्या युक्ती व बुद्धीच्या जोरावर यशस्वी करून दाखवाल. पण कुठेतरी मनातून अलिप्त रहाल. कर्तव्य करत जाल पण अलिप्तपणे. सरकारी कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. दूरचा प्रवास संभवतो.

उपाय : शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

सिंह

आध्यात्मिकतेकडे मन जास्त वळू लागेल. त्यातच आनंद मिळण्याची शक्यता आहे. गूढ विज्ञानासारख्या शास्त्रात आपली रुची वाढेल आणि अशा कामात किंवा चैनीच्या वस्तू, ऐषआरामाच्या वस्तू खरेदी करण्यात पैसा खर्च होईल. सरकारी कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा लाभेल.

उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळावर केशरी गंध लावा.

कन्या

या आठवड्यात आपला आळस वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा शक्यतो आळस झटकून कामाला लागण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला अपेक्षित फळे मिळतील. सभा-समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल आणि त्यातून फायदाच होईल. कदाचित दूरवरचे प्रवास होतील. सरकारी कागदपत्राद्वारे लाभ मिळेल.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

तुळ

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील. पदोन्नती होण्याचीदेखील शक्यता आहे. समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळेल. पण सांभाळून वाहन चालवा किंवा कागदपत्रे जपून ठेवा. अचानक धनलाभ मिळेल. पण तो पैसा योग्य मार्गाने आला असेल तरच स्वीकारा.

उपाय : ॐ नम: शिवायचा जप करा.

वृश्चिक

या आठवड्यात अध्यात्माकडे जास्त ओढा वाढेल. आपल्या हातून काहीतरी चांगले, धर्माचे, परोपकाराचे कार्य घडण्याची शक्यता आहे. धाकट्या भावंडांची गाठभेट होईल. खास मित्रमंडळींच्या भेटीतून आनंद मिळेल. मात्र जोडीदाराची मर्जी सांभाळून रहा. छोट्या मोठ्या खटक्यांकडे लक्ष देऊ नका. सामंजस्य ठेवा.

उपाय : मुक्या प्राण्यांना खाऊ पिऊ घाला.

धनु

सरकारी कामातून फायदा संभवतो. अचानकपणे अपेक्षा नसलेल्या गोष्टीतून अथवा कामातून धनलाभ संभवतो किंवा आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर काही लाभ मिळून जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात या ना त्या कारणाने चमचमीत खाणे होईल. पण तब्येत सांभाळा. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा.

उपाय : शुक्रवारी दत्तगुरुंची उपासना करा.

मकर

दैनंदिन व्यवसाय करत असाल, तर व्यवसायवृद्धी संभवते आणि नोकरीत असाल तर मानमरातब मिळेल. उच्चपद प्राप्ती होईल. दैनंदिन व्यवसायात भागीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एखादी हरवलेली किंवा नजरचुकीने इकडे तिकडे ठेवलेली व बऱ्याच दिवसापासून मिळत नसलेली वस्तू मिळेल.

उपाय : मंगळवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका.

कुंभ

मुलांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्याकडून आपल्याला चांगली बातमी मिळेल. पण तुमच्या सहकार्याची कदाचित त्यांना गरज लागण्याची शक्यता आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला आपल्या सहकारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. मात्र प्रलोभनाला बळी पडू नका. झटपट पैसा मिळणार नाही.

उपाय : मंगळवारी व शनिवारी संकटनाशक हनुमान स्तोत्र म्हणा.

मीन

विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम जाईल. घेत असलेल्या विद्येत प्रगती होत जाईल. मोठ्यांना गूढविद्या किंवा गूढशास्त्र शिकण्याची इच्छा होईल आणि त्यात यशही मिळेल. नोकरीच्या ठिकाणी थोडे कष्ट आहेत. पण केलेल्या कष्टाचे चीज होईल. घर किंवा वाहन खरेदीच्या विचारात असाल, तर त्याप्रमाणे पावले उचला.

उपाय : शनिवारी दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.

Advertisement
Tags :

.