राशिभविष्य खजाना
बुधवार, दि. 17 ते मंगळवार, दि. 23 जून 2026 पर्यंत
मेष
या आठवड्यात सगळी कामे वेळच्या वेळी व शिस्तीतच झाली पाहिजेत, असा तुमचा दंडक राहील आणि जर तुमच्या मनाप्रमाणे झाली नाहीत, तर थोडीफार चिडचिडही होईल. टेन्शन घेऊ नका. सगळे व्यवस्थित होईल. तुम्ही आपल्या बुद्धी चातुर्याने सर्व व्यवस्थित करून घ्याल. आईचा सुखद सहवास लाभेल.
उपाय : शनिवारी दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.
वृषभ
या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. आपल्या बोलण्याने दुसऱ्यावर छाप पाडाल व कुटुंबात काही कुणाचे मतभेद वगैरे असतील, तर आपल्या मधुर बोलण्याने सगळे गैरसमज दूर कराल. घरात असो वा बाहेर आपण केलेल्या कामाचे आपल्याला उत्तम फळ मिळेल.
उपाय : सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
मिथुन
या आठवड्यात आपल्याला स्वत:चा आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होईल. आपण आपल्या कामाबद्दल खात्रीपूर्वक बोलू शकाल. आपल्या बोलण्यातही फरक जाणवेल आपल्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी कमी होतील. आपल्या जोडीदाराला बुद्धीच्या जोरावर हवी ती मदत कराल व उद्योग वाढवाल.
उपाय : संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.
कर्क
या दिवसात आपल्याला थोडी थोडी धार्मिक कार्याची ओढ लागेल. अध्यात्मात रुची वाढायला लागेल. मुलांच्या प्रगतीची चांगली बातमी मिळेल किंवा जे बाळाच्या चाहुलीची वाट पहात आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळेल. काही जणांना तीर्थयात्रा करण्याची संधी मिळेल.
उपाय : गुरुवारी विष्णुसहस्त्रनाम पाठ करा.
सिंह
परदेशी जाण्याची संधी मिळेल. आपली धार्मिक यात्रा घडेल. आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये रुची वाढेल. सरकारी कामातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही सभा समारंभात सहभागी व्हाल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद व मित्रमंडळींच्या शुभेच्छा मिळतील. किमती भेटवस्तूदेखील मिळतील.
उपाय : ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’चा जप करा.
कन्या
स्वत:च अंतर्मुख व्हाल. कोणतेही हातात घेतलेले काम लवकर पूर्ण होणार नाही. पूर्ण होईल पण थोडा वेळ लागेल. त्यामुळे वैतागून जाल. पण निराश होऊ नका. वडील भावंडांच्या, खास मित्रमंडळींच्या भेटीगाठीचा योग आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात तुमचा वेळ छान जाईल.
उपाय : गुरुवारी दत्तगुरुंचे दर्शन घ्या.
तुळ
मुलांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजकाल अनेक प्रलोभनात मुले अडकत आहेत. त्यांची प्रलोभने काय आहेत, ते पाहून दूर करायला हवीत. नोकरीत सहकार्य चांगले मिळेल. पण रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
वृश्चिक
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विशेष करून लाभ संभवतो. दूरवरच्या प्रवासाला, कदाचित तीर्थयात्रेला जाण्याचा योग येईल किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्री, गुरुच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. सत्संग घडेल. साधूसंतांचा आशीर्वाद मिळेल. हा आठवडा तुम्हाला आनंद व समाधान देईल.
उपाय : घरातून बाहेर पडताना केशरी टिळा लावा.
धनु
जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. त्याच्या सल्ल्याने कामे कराल, तर आपल्या व्यवसायात त्याचा चांगलाच फायदा होईल. मुलांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांचे मूड्स सांभाळावे लागतील. आपल्याही स्वभावाला मुरड घालावी लागेल. वाणीवर संयम ठेवावा लागेल न जाणो एखाद्या कठोर शब्दामुळे नुकसान होईल.
उपाय : मंगळवारी हनुमान चालीस वाचा.
मकर
आपल्याला कष्टाशिवाय फळ मिळणार नाही. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदार सहकार्य करेल. नोकरदारांना नोकरीत हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. एखादी चोरीस गेलेली वस्तू किंवा हरवलेली वस्तू परत मिळेल. घरामध्ये एखादी चैनीची वस्तू खरेदी कराल. आठवडा छान जाईल.
उपाय : शनिवारी शनीला तेल वाहा.
कुंभ
अति लोभ बरा नव्हे आणि ऊस मिळाला म्हणून मुळासकट खाऊ नये. या आठवड्यात तुम्ही अॅक्टिव्ह रहाल. मुलांची प्रगतीची बातमी ऐकून खूश होऊन जाल. सरकारकडून आपल्याला एखादे बक्षीस मिळून जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपल्याला हा आठवडा छान जाईल.
उपाय : रोज तुळशीला पाणी घाला.
मीन
आळस झटकून कामाला लागा, असा हा आठवडा तुम्हाला सांगत आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या संदर्भात काही चर्चा सुरू असेल, तर त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण वाणीवर संयम ठेवा. डोके तापवून घेऊ नका. घर अथवा वाहन खरेदीचा विचार चालला असेल, तर तो कृतीत येईल.
उपाय : मंगळवारी सुंदरकांड वाचा.