खजाना भविष्य
बुधवार, दि. 10 ते मंगळवार, दि. 16 जून 2026 पर्यंत
मेष
वाहन जपून चालवा आणि वाहन चालवताना त्याची जी काही कागदपत्रे असतील, तर सतत स्वत:जवळ ठेवा. कायद्याच्या विरोधात जाऊ नका. नोकरीच्या अथवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. अथवा परदेशी/देशी मालाच्या व्यवहारातून फायदा संभवतो. आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.
वृषभ
आपला काही स्वतंत्र व्यवसाय असेल, तर या आठवड्यात त्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. प्राप्ती चांगली होईल. नोकरदारांना नोकरीत पदोन्नती संभवते. त्यांच्या कामावर वरिष्ठ खूश होऊन त्यांना मान सन्मान मिळेल. समाजात प्रतिष्ठा लाभेल. पण या सर्वांमुळे ‘ग’ची बाधा येऊ देऊ नका.
उपाय : सकाळी सूर्योदयाला सूर्याला जल अर्पण करा.
मिथुन
या आठवड्यात आपल्या वाणीमध्ये बराच फरक सर्वांना जाणवेल. या बोलण्याने व बुद्धी चातुर्याने सर्वांची मने जिंकाल. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्याल, तर नक्की स्पर्धा जिंकाल. काहीतरी लेखन करावे, असेही मनात येईल. पण सर्वांमध्ये आपल्या वाणीत कुठे कटुता येणार नाही ना याची काळजी घ्या.
उपाय : महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
कर्क
मुलांच्या प्रगतीच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल. त्यामुळे समाधान व आनंद वाटेल. धाकट्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. छोटे प्रवास घडतील. जोडीदार चांगला मिळेल. त्याचे सहकार्य लाभेल. कदाचित त्याच्या मदतीने एखादा छोटा व्यवसायही सुरू करू शकाल. आठवडा छान जाईल.
उपाय : सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करून लाल फूल वाहा.
सिंह
परदेशातून धनलाभ संभवतो. परदेशी जाण्याची संधी मिळेल. परदेशी नोकरीच्या प्रयत्नात असाल, तर कदाचित संधी मिळेल. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे. थोरामोठ्यांच्या भेटी होतील. त्यातून लाभ मिळेल. मोठ्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
उपाय : संकटनाशन गणपतीस्तोत्र मंगळवारी म्हणा.
कन्या
मुलांच्याकडे त्यांच्या सवयीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. आपण काही तंत्रमंत्र विद्या शिकत असाल, तर त्यात बऱ्याचशा अडचणी येण्याचा संभव आहे. त्यामुळे तूर्तास ते स्थगित करा. आपल्या जोडीदाराची मदत, त्याचा सल्ला घ्या. त्याच्या सल्ल्यानुसार वागाल, तर आपल्याला लाभ होण्याची शक्यता आहे.
उपाय : शिव आराधना करा.
तूळ
नोकरीच्या शोधार्थ असाल, तर या आठवड्यात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण आत्मविश्वासासह मुलाखत द्याल. कदाचित सरकारी नोकरी पण मिळून जाईल. नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे प्रवास घडेल. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल.
उपाय : कपाळावर केशरी गंध लावूनच बाहेर पडा.
वृश्चिक
आपला दैनंदिन व्यवसाय असेल, तर त्यात वृद्धी होईल. शिवाय सरकारकडून तुमच्या व्यवसायाची दखल घेतली जाईल व त्याचा तुम्हाला फायदाच होईल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. त्याच्या सल्ल्याचा आपल्याला चांगलाच फायदा होईल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्यावर आपला विचार चालू राहील.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.
धनु
स्त्राrकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे किंवा लॉटरी वगैरे सारख्या प्रकारातूनही धनलाभ होऊ शकतो. अथवा आपल्या बुद्धीचातुर्याच्या साहाय्याने शेअर मार्केटमधूनही धन मिळू शकते. पण तो पैसा सन्मार्गाने, प्रामाणिकपणाने मिळवत असाल तरच तुम्हाला प्राप्त होईल. अन्यथा नाही. कष्ट करा व मिळवा.
उपाय : गुरुवारी मंदिरात जाऊन श्रीदत्तगुरुंचे दर्शन घ्या.
मकर
घरात काहीतरी धार्मिक कार्य घडेल. सत्संग घडेल आणि त्या निमित्ताने तीर्थस्थळी भेटी द्याल. प्रवास घडेल. वडीलधाऱ्या मंडळीचे, वडिलांचे आशीर्वाद मिळतील. तीर्थस्थळीच्या प्रवासात जल पर्यटनाचाही आनंद मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा सात्विक समाधानाचा जाईल, असे दिसते.
उपाय : अधिकमास संपत आला आहे. विष्णुसहस्रनाम वाचा.
पुंभ
स्वतंत्र व्यवसायात असाल, तर व्यवसायवृद्धी दर्शवते. पण व्यवसायवृद्धी करताना त्यात पैसा घालताना संपूर्ण विचार करून गुंतवणूक करा. एकदम जास्त रक्कम घालू नका. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. हा आठवडा छान जाईल.
उपाय : मंगळवारी मारुती मंदिरात जाऊन त्याच्या पायाजवळील शेंदूर कपाळी लावा.
मीन
या आठवड्यात आपल्या वडील भावंडांच्या गाठीभेटीचा योग दिसतो. त्यांच्या आणि आपल्या खास मित्रमंडळींच्या सहवासात हा आठवडा उत्तम जाणार असे दिसते. कुठल्या तरी समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. जी तुमच्या फायद्याची असेल संधीचे सोने करून घ्या. प्रामाणिकपणा ठेवा.
उपाय : शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.