For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:40 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

27 मे ते 2 जून 2026

Advertisement

मेष

या आठवड्यात वाहन जपून  चालवा. तुम्ही सावकाश चालवाल पण समोरुन येणारा किंवा आपल्या मागून येणारा सावकाश चालवेलच असे नाही. तेव्हा सावधान. अवास्तव खर्च संभवतो. खर्चावर नियंत्रण  असणे गरजेचे आहे. बेकार असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी कष्ट मात्र खूप घ्यावे लागतील.

Advertisement

उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

वृषभ

आपल्यातील आत्मविश्वास वाढल्याचे तुमचे तुम्हालाच जाणवेल. एक  सकारात्मक ऊर्जा आपले आत्मबळ वाढवेल. कार्य करीत रहा. यश निश्चित मिळेल.  आळसाला मात्र क्षणभरही थारा देऊ नका. शरीर आळसाला चटावते. मग कितीही सकारात्मकता असली तरी. खूप कामे करावीशी वाटली तरी आळस आला की याचा काही उपयोग नाही.

उपाय: या महिन्यात तुळशीपुढे दिवा लावा.

मिथुन

नातेवाईकांच्या गराड्यात आपला हा आठवडा छान जाईल. पण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. हा आठवडा ऐशआरामात घालवाल. आपल्या वडिलांच्याकडून धनलाभ संभवतो किंवा काही स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून चांगली धनप्राप्ती संभवते. कुटुंबात आध्यात्मिक वातावरण राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल.

उपाय: विष्णूसहस्त्रनाम म्हणा.

कर्क

आपल्या कामात खूप व्यवस्थितपणा येईल. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आपला मानसन्मान वाढेल. समाजात प्रतिष्ठा निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कदाचित तीर्थयात्रा पण घडेल. हा आठवडा छान जाईल.

उपाय:सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करा.

सिंह

या आठवड्यात आपल्याला मातृसुखाचा लाभ मिळेल. मातेच्या सहवासात वेळ छान जाईल. पण मातेला सुद्धा तुमच्याकडून आधाराची अपेक्षा असते. शक्य होईल तर तिचा आधार बना. तिची काळजी घ्या. बाकी सर्वांपासून थोडे अलिप्त रहावेसे वाटेल. हातून कामे यंत्रवत घडत राहतील. पण त्यात फारसे लक्ष लागणार नाही.

उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर केशरी गंध लावा.

कन्या

मुलांच्याकडे लक्ष द्या. सुट्टी संपून आता त्यांना परत रुटीनला लावले पाहिजे. आळसावलेली असतील. या आठवड्यात आपल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याचा संभव आहे. आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या संधीचे सोने करा. वाया जाऊ देऊ नका. एकूण आठवडा बरा जाईल.

उपाय: संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

तुळ

नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. संधी मिळेल. त्याचा कशा पद्धतीने लाभ उठवायचा ते सर्वस्वी तुमच्या चातुर्यावर अवलंबून आहे. नोकरवर्गाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळेल. तुमच्या मातुल (आईच्या) घराण्याकडून आपल्याला मदत, सहकार्य, लाभ मिळण्याची शक्यता आहे.

उपाय: सोमवारी शंकराला बेल वाहा.

वृश्चिक

पार्टनरकडून चांगले सहकार्य मिळेल. पण थोडे त्याच्या कलाने घ्यावे लागेल. आपल्या दैनंदिन व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे व त्या बाबतीतही जोडीदाराचे बरेच सहाय्य लाभेल. त्याचे बुद्धीचातुर्य व नियोजन हे आपल्या कामाला पूरक ठरतील व उत्पन्नाचा ओघ वाढेल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला लाभदायी ठरेल.

उपाय: मंगळवारी बजरंग बाण वाचा.

धनु

अचानक धनलाभाची शक्यता आहे. कदाचित कुठल्या तरी शिकवणीतून अथवा काही लक्झरी वस्तूमधून आपल्याला लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण स्वत:च्या हिमतीवर मिळालेला पैसा चांगला उपयोगी पडेल. कष्टाचा पैसा मिळत असेल तरच तो स्वीकारा. नाहीतर त्यातून नवीन काही लचांड मागे लागेल. सांभाळा.

पाय:सोमवारी शंकराला कच्च्या दुधाने अभिषेक करा.

मकर

वडिलांच्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या हवा पालटासाठी  धार्मिक स्थळी तीर्थयात्रा कराल. त्यातून तुम्हाला फायदाच होईल. सत्संग घडेल. मनाला प्रसन्न वाटेल. कोर्टकचेरीची जर कामे अपुरी राहिली असतील तर आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. काहीतरी सूचक स्वप्ने पडण्याची शक्यता आहे.

उपाय: शनिवारी शनि महात्म्य वाचा.

कुंभ

नोकरीत असाल तर आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपले वरिष्ठ आपल्या कामावर खूश होऊन आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपला काही स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्याची भरभराट होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे व त्यांचे आशीर्वाद  घेऊन कामाला लागा. यश मिळेल.

उपाय: शनिवारी शनिमंदिरात जाऊन दर्शन घ्या.

मीन

वडिलभावंडांच्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या गाठीभेटीत हा आठवडा उत्तम जाईल. सभा समारंभास जाऊन तिथल्या आनंदाचा लाभ आपल्याला उठवता येईल. तिथल्या नवीन लोकांच्या भेटीमुळे उंची वस्तुंची देवाणघेवाण होईल. एकूण या आठवड्यात सर्वच लाभ मिळण्याची शक्यता आहे.

उपाय: मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.

Advertisement
Tags :

.