खजाना भविष्य
मेष
या आठवड्यात आपला आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम पूर्ण विचारांती व पूर्ण आत्मविश्वासाने कराल. त्यामुळे आपल्या कुटुंबाला देखील आपण खूप खूश ठेवाल. कष्ट मात्र खूप करावे लागतील. पण कष्टाचे फळ देखील मिळेल. फक्त आत्मविश्वासाने काम करताना, कष्टाला कंटाळून चिडचिड मात्र होऊ देऊ नका.
उपाय: मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा.
वृषभ
हा आठवडा आपण आपल्या कुटुंबासोबत छान घालवाल. पैतृक संपत्तीचा काही लाभ होण्याचाही संभव आहे. अचानक धनलाभाचीदेखील शक्यता आहे. आपल्या वाणीने सर्वांवर छाप टाकाल. कदाचित वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल तर नक्की विजय मिळवाल. आपल्या बुद्धीने आणि वाणीने आपल्या जोडीदारावरही छाप पाडाल.
उपाय: विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करा.
मिथुन
परदेशातून नोकरीच्या संदर्भात काही बोलणे होण्याची शक्यता आहे किंवा परदेशी मालाच्या देवाण घेवाणीच्या संदर्भात काही बोलणे होईल. त्याबद्दल काय निर्णय घ्यावा हे न कळल्याने कदाचित मन थोडे संभ्रमित होईल. पण शांत रहा आणि सारासार विचार करून शांतपणे निर्णय घ्या.
उपाय: पक्ष्यांना चारा व पाणी द्या.
कर्क
या आठवड्यात आपले मन थोडे अध्यात्माकडे वळण्याची शक्यता आहे. आध्यात्म करताना आपल्या कर्तव्यपूर्तीकडे आपले लक्ष असणार. कर्मफलाची अपेक्षा न करता आपले कर्म करत राहणे या गीतेतील भगवंतानी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आपले कार्य राहील. मातेच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
उपाय: ॐ नमो भगवते वासुदेवायचा जप करा.
सिंह
वाहन जपून चालवा. महत्त्वाचे म्हणजे वाहन चालवताना सर्व कागदपत्रे जवळ ठेवा. दैनंदिन व्यवसाय वाढविण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या बुद्धी चातुर्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. फळ थोडे विलंबाने मिळेल. पण मिळेल. निराश होऊ नका. तब्येतीला सांभाळून प्रयत्न करीत रहा.
उपाय: गुरुची उपासना करा.
कन्या
नोकरीच्या बाबतीत आमिषे दाखविण्यात येतील. एवढेच नव्हे तर परदेशाबाबतीतही प्रलोभने दाखवतील. पण पूर्ण खात्री झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. पैसा पण गुंतवू नका. यदा कदाचित चुकीच्या लोकांच्या हाती अडकला तर सुटणे मुश्किल होईल. नंतर पश्चात्ताप करून काही उपयोग नाही.
उपाय: ॐ नम: शिवायचा जप करा.
तुळ
डोकं तापवून घेऊ नका. त्यामुळे हाती काहीच लागणार नाही. मुलांच्या खेळाकडे आणि त्यांना लागलेल्या सवयीकडे लक्ष द्या. कोणता तरी लांब पल्ल्याचा प्रवास घडेल. भूलथापांना बळी पडू नका. पण अचानक धनलाभाची शक्यता आहे. लॉटरीचे तिकिट काढून आपले नशीब आजमावून बघण्यास काहीच हरकत नाही.
उपाय: घरातून बाहेर पडताना केशरटिळा लावा.
वृश्चिक
बुद्धीचातुर्याच्या जोरावर हा आठवडा आपल्याला कामात यश देणारा असेल. सरकारी काम काही अडलेले असेल तर या आठवड्यात ते होऊन जाण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी थोडे संयमाने राहावे लागेल. सर्वांवरच आपला वचक राहतो, असे होत नाही. सांभाळा.
उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्ध्य द्या.
धनु
भूलथापांना बळी पडण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत सांभाळून रहा. या आठवड्यात आपल्यावर आध्यात्मिक वातावरणाचा बराच परिणाम होईल. कदाचित तीर्थयात्रेला जाल. त्यामुळे साहजिकच आपल्याला संतांचा सहवास लाभेल. या दृष्टिकोनातून हा आठवडा छान जाईल. मातेचा सहवास लाभेल.
उपाय: गुरुवारी गुरु उपासना करा.
मकर
मुलांच्याकडून चांगली बातमी मिळेल. त्यामुळे या आठवड्यात उत्साहित राहाल. परदेशातून धनलाभ संभवतो. आपल्या कष्टाचे फळ मिळेल. पण या साऱ्या उत्साहात तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. नोकरदार व्यक्तीस आपल्या कामाच्या ठिकाणी मानसन्मान, पदोन्नती मिळण्याचा संभव आहे. प्रतिष्ठा वाढेल.
उपाय: सोमवारी शंकराला बेल वाहा.
कुंभ
सगळेच एका वेळेला मिळत नसते. तशी अपेक्षा करणेही चुकीचेच आहे. प्रत्येक गोष्ट धीराने घ्या. आपली सगळी कामे व्यवस्थित कराल. घरासाठी काहीतरी सुशोभित करणारी वस्तू खरेदी कराल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामामुळे आपला दबदबा निर्माण होईल. काही लाभही होतील. आठवडा छान जाईल.
उपाय: शनिवारी दशरथकृत शनैश्चरस्तोत्र वाचा.
मीन
या आठवड्यात आपल्याला कोणतेही काम करायला नकोच वाटेल. आळशीपणा वाढेल. घरामध्ये थोडी चिडचिड वाढेल. कामाच्या, नोकरीच्या ठिकाणी मात्र आळशीपणा करून चालणार नाही. अंग झटकून, अक्कल हुशारीने काम केलात तर आपले कौतुकच होईल. कागदपत्रावर सही करताना अभ्यासपूर्वक सही करा.
उपाय: मंगळवारी बजरंग बाण वाचा.