खजाना भविष्य
मेष
हा आठवडा अतिशय चांगला जाईल. तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. कोणताही निर्णय पूर्ण विचारांती व ठामपणे घ्याल. कामात कुठेही कमी पडणार नाही. कुठलेही काम आत्मविश्वासाने कराल. तुमच्या कामामध्ये जोडीदाराचे सहाय्य लाभेल. फक्त खर्चाकडे मात्र लक्ष द्या. आठवडा मजेत घालवा.
उपाय: शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.
वृषभ
हा आठवडा तुम्ही आपल्या कुटुंबासोबत खूप छान घालवाल. कुटुंबाबरोबर कुठेतरी प्रवास कराल. अचानक धनलाभाचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल आणि आपण आपल्या कुटुंबाला एक छान ऐश्वर्यसंपन्न आयुष्य देऊ शकण्याचा संभव आहे. खूश रहा.
उपाय: पशुपक्ष्यांना चारापाणी द्या.
मिथुन
या आठवड्यात आपल्या जोडीदाराकडून आपल्याला चांगला लाभ संभवतो. आपल्यात सुसंवाद घडून त्यातून काहीतरी आपल्याला फायदाच संभवतो. आपण काहीतरी दैनंदिन व्यवसाय करत असाल, तर त्या बाबतीत त्याचा सल्ला खूपच मोलाचा ठरेल. काही कामानिमित्त दूरचा प्रवास घडेल.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
कर्क
या आठवड्यात आईच्या सहवासाचा लाभ मिळेल. पण थोडी आईच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. जमीन जुमला घेण्याचा विचार आपल्या मनात येऊ लागेल किंवा असलेल्या जमिनीतून आपल्याला काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूण हा आठवडा साधारण बरा जाईल.
उपाय: ‘ॐ नम: शिवाय’चा जप करा.
सिंह
या आठवड्यात आपला वेळ मुलाबाळांच्या सहवासात छान जाईल, असे दिसते. पण या अवधीत फार कष्ट घेण्यास जाऊ नका. काही वेळा उत्साह दांडगा असतो पण त्याप्रमाणे हाताने काम जमत नाही. जे डोक्यात असते ते हातून घडत नाही मग चिडचिड होऊ लागते. तसे होऊ देऊ नका.
उपाय: रविवारी आदित्यहृदयचा पाठ करा.
कन्या
नोकरीच्या प्रयत्नात असाल तर या आठवड्यात आपल्याला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण तिथे इंटरव्ह्यू देतेवेळी प्रामाणिक उत्तरे देणे व शांतपणे देणे गरजेचे आहे. आत्मकेंद्रित होऊ नका. कदाचित या नोकरीद्वारे आपण परदेशी पण जाऊ शकता पण प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.
उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करा.
तुळ
आपला काही छोटेखानी दैनंदिन व्यवसाय असेल तर सरकारी मदत मिळण्याची शक्यता आहे. तो व्यवसाय वृद्धिंगत करण्याची आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचे सोने कराल तर जिंकाल. आपले बुद्धीचातुर्य वापरून आपण आपला व्यवसाय वाढविण्याचा संभव आहे. या आठवड्यात हरवलेली वस्तू सापडेल.
उपाय: गायत्री मंत्राचा जप करा.
वृश्चिक
अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण ते धन योग्य मार्गाने मिळत आहे का याची शहानिशा करा आणि मग त्याचा स्वीकार करा. कदाचित सौंदर्यप्रसाधन अथवा तत्सम प्रकारच्या व्यवहारातून लाभ मिळू शकतो. त्या संदर्भात आलेल्या संधीचा लाभ घ्या. पण फुकटात मिळालेला पैसा स्वीकारताना पूर्ण विचार करा.
उपाय: मंगळवारी बजरंगबाणाचा पाठ करा.
धनु
या आठवड्यात आपण कोणत्या तरी पूजेमध्ये सहभागी होण्याचा संभव आहे. काही दानधर्म, पुण्य कार्य आपल्या हातून घडेल, असे वाटते. त्या निमित्ताने दूरचा प्रवास घडेल. कदाचित तीर्थयात्रेचा पण योग असू शकतो. संतांचा सहवास घडेल. त्यांचा आशीर्वादही मिळेल. पित्याचा आशीर्वाद मिळेल.
उपाय: गुरुवारी गुरुचे कोणतेही एक स्तोत्र वाचा.
मकर
स्वतंत्र उद्योगात असाल तर उद्योगधंद्याची भरभराट होण्याची शक्यता आहे. आपला मानसन्मान वाढेल. समाजात आपल्याला प्रतिष्ठा लाभेल. आपल्या उद्योगासाठी कर्ज मिळविण्यासाठी धडपड करीत असाल तर आपल्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपल्याला हा आठवडा खूप चांगला जाईल.
उपाय: सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
कुंभ
‘पांचो उंगलियाँ घी में’ असा एकंदरीत आपला आठवडा जाणार आहे. या आठवड्यात ज्या कामात हात घालाल तेथे यश मिळेल, असे ग्रहमान आहे. मोठ्यामोठ्या सभा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि त्यातून आपल्याला फायदाच होईल. अशा मिळालेल्या संधी सोडू नका.
उपाय: दर रविवारी शनिला तेल वाहा.
मीन
या आठवड्यात खर्च खूप संभवतो. खर्चाकडे लक्ष द्या. योग्य असेल तेथेच खर्च करा. वाणीवर संयम ठेवा. उगाच कुणाशी वितंडवाद घालू नका. आपल्या शब्दाशी प्रामाणिक रहा. आपले मन अध्यात्माकडे वळण्याची शक्यता आहे. हरकत नाही. त्यात जर समाधान मिळत असेल तर त्याचा आनंद उपभोगा.
उपाय: दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.