For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:55 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

बुधवार, दि. 29 एप्रिल ते मंगळवार, दि. 5 मे 2026

Advertisement

मेष

हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. सर्वांवर आपण थोडी हुकूमत गाजवाल. आपण म्हणाल तेच खरे असे वाटायला लागेल. पण थोडे सांभाळून. दुसऱ्यावर हुकूमत करता करता समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही ना याची काळजी घ्या. या आठवड्यात काही अंशी तुमचेच खरे होण्याची शक्यता आहे.

Advertisement

उपाय : घरातून निघताना केशरी टिळा लावा.

वृषभ

या आठवड्यात आपल्या वाणीत फरक जाणवेल. आपल्या मोहक वाणीने सर्वांना आपलेसे कराल. काही मौल्यवान म्हणजे सोने-चांदी यांची खरेदी होईल. घरातील मंडळींकडून आदर, प्रेम, वात्सल्य मिळेल. सरकारी कामाच्या बाबतीत मात्र थोडा खर्च संभवतो. तो सांभाळून व योग्य असेल तर करा.

उपाय : पक्ष्यांना पाणी द्या.

मिथुन

आपल्या कामाचे चीज झाल्याचे लक्षात येऊन समाधान वाटेल. आपल्या बुद्धीचा व्यवस्थित उपयोग आपल्या कामात कराल व त्याचा उपयोगही होईल. कामाकरता काही छोटे प्रवासही घडण्याची शक्यता आहे. आपल्या कामात कदाचित आपल्या भावंडांचीदेखील मदत मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : सोमवारी शंकराला अभिषेक करा.

कर्क

या आठवड्यात आपल्याकडून खर्च संभवतो. सांभाळून, शांतपणाने व्यवहार करा. चिडचिड होऊ देऊ नका. आईची काळजी घ्या. आईचे सुख किंवा तिच्याकडून काही लाभ संभवतो. कुटुंबासाठी कष्ट कराल. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या हातातील काम अतिशय चोख व उत्तमरितीने करू शकाल. आपल्या कामाचे कौतुक होईल.

उपाय : सोमवारी श्वेतवस्त्र परिधान करा.

सिंह

मन:स्वास्थ जरा डळमळीत राहील किंवा काम तर भरपूर करायचे आहे. पण हे करू का ते करू अशी द्विधा मन:स्थिती राहील. कामामध्ये किंवा आर्थिक बाबतीत भरपूर प्रलोभने येतील. पण शांतपणाने विचार करून या प्रलोभनाला कितपत बळी पडायचे हे ठरवा. कारण कदाचित फसले जाण्याची शक्यता आहे.

उपाय : गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा.

कन्या

या आठवड्यात थोडे अध्यात्माकडे वळाल किंवा वळावसे तरी नक्की वाटेल. नोकरीत संघर्ष करावा लागेल. गुप्तशत्रुंना शोधून त्यांच्या खेळीवर सडेतोड उत्तर देता येईल. जोडीदाराची मदत घेतल्याने संघर्ष करण्यास मदत होईल. पण यश मात्र थोडे उशिरानेच मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : ‘ॐ नम: शिवाय’चा जप करा.

तुळ

मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. सध्या सुटीचे दिवस आहेत. मुलांना घेऊन प्रवासाला जाऊन याल. मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा आनंद लुटाल. परदेशातून धनप्राप्तीची शक्यता आहे. त्या संदर्भात एखादा व्यवसाय कराल. व्यवसायात अथवा नोकरीत जे काम कराल ते अतिशय उत्तम कराल.

उपाय : शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

वृश्चिक

अचानक धनलाभाची शक्यता आहे. ऐषोआरामाच्या गोष्टीतून भौतिक सुख मिळण्याचा संभव आहे. सौंदर्य प्रसाधनाच्या गोष्टीतून लाभ संभवतो. पण इतर कुठून पैसा मिळाला, तर तो स्वीकारताना दहावेळा विचार करून स्वीकारा अन्यथा फसले जाण्याचा संभव आहे. हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय : मंगळवारी बजरंगबाणचा पाठ करा.

धनु

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. पण काही बाबतीत मतभेदही होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तब्येतीला सांभाळावे लागेल. प्रवास घडेल. कदाचित धार्मिक स्थळांना भेटी द्याल. त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि आपली दैनंदिन कामे अति उत्साहात कराल.

उपाय : गुरुवारी दत्ताच्या कुठल्याही एका मंत्राचा जप करा.

मकर

नोकरीत आपले काम, आपले प्रेझेंटेशन अगदी चोख कराल. आपल्या प्रामाणिकपणावर व आपल्या कामावर सगळेच खूश होतील. संततीची प्रगती चांगली होईल. संततीवर आपल्याला अभिमान वाटेल, असे काहीसे कार्य त्यांच्या हातून घडेल. एकूण हा सप्ताह आपल्याला छान जाईल.

उपाय : अपंगांना मदत करा.

कुंभ

या आठवड्यात मनाला थोडा आवर घालण्याची जरुरी आहे. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचारांती शांतपणाने आणि ठामपणे घ्या. सारासार विचार करा. दुसऱ्यावरती विसंबू नका. मोठ्या समारंभात सहभागी व्हाल. काहीतरी करून दाखवायची संधी मिळेल. योग्य तऱ्हेने त्या संधीचा फायदा घ्या.

उपाय : शनिस्तोत्र शनिवारी म्हणा.

मीन

चिडचिड करू नका. गोंधळ उडण्याची शक्यता आहे. पण शांतपणे विचार करा. मग काम करा. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मान सन्मानही मिळेल. समाजात प्रतिष्ठा निर्माण होईल. कामाच्या संदर्भात कदाचित परदेशप्रवास घडेल किंवा परदेश प्रवासासाठी प्रयत्न सुरू कराल.

उपाय : मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करा.

Advertisement
Tags :

.