For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:01 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

बुधवार, दि. 15 ते मंगळवार, दि. 21 एप्रिल 2026 पर्यंत

Advertisement

मेष

वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. बोलताना आपले बोलणे अधिकारवाणीने बोलल्यासारखे भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित समोरच्या माणसाला कुठेतरी मनाला लागण्याचा संभव आहे. त्यामुळे सांभाळून बोला. हा आठवडा आपल्याला चैनीत आणि ऐषोआरामात जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

उपाय : शंकराची उपासना करा.

वृषभ

नोकरीत आपले काम अतिशय चोख व उत्तम होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्या कामावर खूश होतील. या आठवड्यात आपले काही छोटे प्रवास होण्याचाही संभव आहे. कदाचित रेल्वेचाही असेल. लहान भावंडासमवेत अथवा मित्रमंडळींच्या बरोबर प्रवास संभवतो. कोणतेही औषध घेताना पारखून घ्या.

उपाय : गाईला गूळ भाकरी/चपाती खायला द्या.

मिथुन

आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. सध्या तुमची त्यांना गरज भासण्याची शक्यता आहे. त्यांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद मिळाल्याने तुम्हाला अनेक सुखांची प्राप्ती होण्याचा संभव आहे. वाहन खरेदीचा आपला विचार मार्गी लागेल. पण कागदपत्राची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. वडिलांचा मान ठेवा.

उपाय : पक्ष्यांना चारा-पाणी घाला.

कर्क

परदेशातून द्रव्य लाभ संभवतो. विद्यार्थी दशेत असाल, तर विद्यालाभ पूर्तता संभवते. उद्योगात कष्ट संभवतात. संततीच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. त्यांना मोबाईलमध्ये जास्त अडकू देऊ नका. नाहीतर त्यांना आणि नंतर पर्यायाने तुम्हालाच त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा सांभाळा.

उपाय : हनुमान चालिसा वाचा.

सिंह

तब्येतीची काळजी घ्या. किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. घरातील व ऑफिसमधील सर्व कर्मचारी वर्गाचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल. आपल्या आईला छोट्याशा प्रवासाला न्याल. कदाचित आपल्याला आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्या लागतील. गुप्तशत्रुंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

उपाय : मंगळवारी बजरंग बाणचा पाठ करा.

कन्या

आपल्या जोडीदाराबरोबर उगाच वितंडवाद घालू नका. या आठवड्यात त्याची थोडी चिडचिड होण्याची शक्यता आहे. जरा समजुतीने घ्या. तुमची पण चिडचिड होऊ देऊ नका. शांततेने घ्या. आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल, तर त्याच्या सल्ल्याने व्यवसायात बदल करा. आपला जोडीदार आपल्याला योग्य सल्ला देईल.

उपाय : गुरुवारी दत्ताची आराधना करा.

तूळ

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कदाचित स्त्राrकडून किंवा अन्य कुठल्या मार्गाने धनलाभ होण्याचा संभव आहे. पण ते धन योग्य मार्गाने आले पाहिजे. अन्यथा त्या धनामुळे काही संकटे ओढून घेण्याची शक्यता आहे. काही मानसिक व्यथा छळत राहण्याची पण शक्यता आहे. उन्हाळ्यामुळे उन्हाळी लागणे, तोंड येणे अशा प्रकाराचा त्रास होण्याचा संभव आहे.

उपाय : सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.

वृश्चिक

कोणत्या तरी धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. संधीचा फायदा घ्या. त्या धार्मिक कार्यातून सत्संग घडेल. मोठ्यांचे, वडिलांचे आशीर्वाद मिळतील. दूरवरच्या प्रवासाला जाण्याची, कदाचित धार्मिक स्थळांना भेटी द्यायची संधी मिळेल. जलपर्यटनाची पण शक्यता आहे. आपल्या हातून काही चांगले लिखाणही होईल.

उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.

धनु

नोकरीत आपल्यावर आपले वरिष्ठ खूश होतील. आपल्याला या आठवड्यात बढती मिळण्याची शक्यता आहे. मान, मरातब, प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. समाजात आपला दर्जा उंचावेल. स्वतंत्र व्यवसायात असाल, तर वडिलांच्या सल्ल्याने वागा. भरभराट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा आपला छान आहे.

उपाय : सद्गुरुंची उपासना करा.

मकर

आपला हा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे. आपल्याला अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या वडीलभावंडांच्या, जुन्या मित्रांच्या सहवासाचा लाभ संभवतो. या सर्वांबरोबर एखाद्या सभा-समारंभात जाण्याची संधी मिळेल. उंची भेटवस्तुंचा लाभ होण्याची शक्यता आहे. समाजातील प्रतिष्ठा वाढेल.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

कुंभ

वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. आपल्याबरोबर आपली सगळी कागदपत्रे आहेत, याची खात्री केल्याशिवाय घराबाहेर पडू नका. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. उलट खर्च जास्त संभवतो. त्यावर अकुंश ठेवा. कारण नसताना खर्च नको. परदेश प्रवास संभवतो.

उपाय : सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.

मीन

या आठवड्यात मन अस्वस्थ, चंचल राहील. चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात असाल आणि ते काम आपल्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर यशस्वीपण करून दाखवाल, अशी शक्यता आहे. पण हे करताना वाणीवर संयम ठेवा.

उपाय : शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

Advertisement
Tags :

.