खजाना राशिभविष्य
बुधवार, दि. 8 ते मंगळवार, दि. 14 एप्रिल 2026 पर्यंत
मेष
या आठवड्यात आपल्या कुटुंबासोबत छान मौजमस्ती करत वेळ घालवाल. पैतृक संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्या-चालण्याने इतरांवर आपली चांगलीच छाप पडण्याचा संभव आहे. या आठवड्यात आपल्या शेजाऱ्यांशी आपली चांगली जवळीक होऊ शकते. आपल्याला त्यांचे चांगले सहकार्य मिळू शकेल.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.
वृषभ
लहान भावंडांचा सहवास या आठवड्यात आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मित्रांबरोबर छोट्यासा प्रवास घडण्याचा संभव आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी आपली काहीतरी कर्तबगारी अथवा काही विशेष कामगिरी करून दाखविण्याची आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचा लाभ घ्या. यश मिळेल.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
मिथुन
वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर अवश्य करा. पण रीतसर कागदपत्रे पाहून पुढे पाऊल टाका. या ना त्या कारणावरून उगाच चिडचिड होण्याचा संभव आहे. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. अति विचार टाळा व स्वत:च्या उद्धाराकडे शांतपणे लक्ष द्या. मन स्थिर नसेल, तर शांत झोप नाही. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. शांत रहा.
उपाय : रामनामाचा जप करा.
कर्क
हा आठवडा आपल्यास सांभाळून राहण्यास सांगतो आहे. नजरदोषापासून सावध रहा. संततीच्या प्रगतीकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्या सहकार्याची गरज भासण्याची शक्यता आहे. आपण स्वत: काही कोर्स करत असाल किंवा कोणती तरी विद्या मिळविण्याच्या प्रयत्नात असाल, तर प्रयत्न करा, यश नक्की मिळेल.
उपाय : गायीला गूळ भाकरी/चपाती घाला.
सिंह
तब्येतीला सांभाळा. ऊन खूप वाढले आहे. काळजी घ्या. नोकरवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी वर्ग सहकार्य करेल. पण गुप्तशत्रूपासून सावध रहा. आपल्या अवतीभवतीच्या नकारात्मक शक्ती ओळखा आणि त्यांच्यापासून थोडे दूरच रहा. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा.
उपाय : कपाळावर केशरी गंध लावल्याशिवाय बाहेर पडू नका.
कन्या
या आठवड्यात थोडी जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार असे दिसते. त्यांचे सहकार्य मिळेल. पण त्यांची चिडचिडही सहन करावी लागण्याची शक्यता आहे. आपला जर दैनंदिन काही व्यवसाय असेल, तर जैसे थे चालू द्या. तोच व्यवसाय थोडा जोमाने चालवलात, तर त्यातून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा व तिला लाल फूल घाला.
तुळ
कोणत्या तरी स्त्राrकडून धनलाभ संभवतो किंवा सासरकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण योग्य मार्गाने मिळालेला पैसाच केव्हाही लाभतो, हे लक्षात घ्या. नाहीतर हाच पैसा आपल्याला गोत्यात आणतो. या आठवड्यात आपल्याला कोणतीतरी मानसिक व्यथा त्रास देण्याची शक्यता आहे. सांभाळा.
उपाय : ॐ नम: शिवाय रोज 11 वेळा म्हणा.
वृश्चिक
वडीलधारी, वृद्ध मंडळींची आपल्या हातून सेवा घडण्याची शक्यता आहे. जरूर सेवा करा व त्यांचा आशीर्वाद घ्या. आपल्या हातून काही धर्मकार्य घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला संत सहवास मिळण्याचा संभव आहे. त्यांचा गुरुपदेशही मिळेल. सूचक स्वप्ने पडतील. पण मन काहीसे अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे.
उपाय : मंगळवारी बजरंगबाणचा पाठ करा.
धनु
आपल्या उद्योगधंद्यात भरभराट होण्याची शक्यता आहे. आपली समाजातील प्रतिष्ठा वाढेल. मानमरातब मिळेल. नोकरीत पदोन्नती संभवते. त्यामुळे साहजिकच पगारवाढीची शक्यता आहे. कर्जप्राप्तीच्या प्रयत्नात असाल, तर आणखी थोड्या खटपटीने कर्जप्राप्ती होईल. एकंदरीत हा आठवडा छान जाईल. खूश रहा.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
मकर
आपल्या मित्रांसोबत आणि वडील भावंडासोबत आपला हा आठवडा मस्त मजेत जाणार असे दिसते. या सर्वांसोबतच्या सहवासाचा आपल्याला लाभ मिळेल. शिवाय या लोकांमुळे आपल्याला इतर गोष्टींचाही फायदा होईल. कदाचित आपल्या व्यवसायात याचा फायदा होईल. समारंभात भाग घेता येण्याची शक्यता आहे. तेथूनही आपल्याला काही लाभ मिळेल.
उपाय : सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
कुंभ
खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आजकालचे दिवस असे आले आहेत की, प्रलोभने भरपूर दिसत आहेत. प्रलोभनाला बळी पडून आपण स्वत:चेच नुकसान करून घेण्याची शक्यता दिसते. कुठेही खर्च करताना थोडा बुद्धीचा वापर करून विचार करून खर्च करा. वाहन चालवताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जवळ ठेवा.
उपाय : दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.
मीन
या आठवड्यात आपले मन थोडे चंचल, अस्वस्थ, अस्थिर होण्याची शक्यता आहे. थोडे शांत रहा. चिडचिड होऊ देऊ नका. आपले तेच खरे व्हावे असे वाटू लागण्याचा संभव आहे. डोक्यात आले की, ते झालेच पाहिजे, असेही वाटेल. पण थोडा संयम पाळा. समोरच्याचे नीट ऐकून घ्या. विचार करा. मग निर्णय घ्या.
उपाय : शनि चालिसा वाचा.