खजाना राशिभविष्य
मागच्या दोन लेखांमध्ये साडेसाती म्हणजे काय, अडीचकी किंवा पनोती म्हणजे काय या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर आपण हेही बघितले की, एका वेळेला शनिची शांती किंवा कर्मकांड या सगळ्या प्रकारापासून आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होते. काही लोकांना कदाचित हे पटले नसेल. माझा मुद्दा एकच आहे की, जर वर्तणूक, वागणे आणि आपला व्यवहार बदलला नाही तर कोणत्याही कर्मकांडाचा काहीही उपयोग नाही. शनिची शांती करणे किंवा दान देणे, हे उपाय पूर्वापार परंपरेनुसार चालू आहेत यात शंका नाही. पण त्याच वेळेला आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शनि महाराजांना न्यायदेवता किंवा न्यायाधीश अशी पदवी ज्योतिषशास्त्राने दिलेली आहे. याचाच अर्थ आपण केलेल्या कर्मांचा न्याय निवाडा करण्याची जबाबदारी शनि महाराजांकडे आहे. थोडी कल्पना करा की, तुम्ही कोर्टामध्ये एका केसच्या संदर्भात हजर झाला आहात आणि तुम्ही न्यायाधीशाला आपल्या बाजूने निकाल देण्याकरता चहापाण्याकरता चिरमिरी (पैसे) देण्याचा प्रयत्न करता, हे किती हास्यास्पद आहे? आपली केस जर मजबूत असेल तर कोणत्याही प्रकारे आपल्याला चांगलाच न्याय मिळणार. आपल्यालाही गॅरंटी नसते की, आपण केलेली कामे किंवा कर्मे ही चांगली आहेत की वाईट आहेत. त्यात पूर्वजन्मीच्या कर्मांचा हिशोब आपल्याला कसा माहीत असणार? आपल्या भीतीचे कारण मुळात इथे आहे. म्हणून आपण या सगळ्याच्या मागे लागतो. पण होते काय तर... लाडू लावन लापसी, पूजा चढो अपार। पूजी पुजारी ले गया, मूरत के मुह छार। - संत कबीर, यापेक्षा जास्त मी काय सांगू? कळकळीची हात जोडून विनंती करतो की, सोशल मीडियावर बघितलेले कोणतेही उपाय किंवा मंत्र-तंत्र करायला जाऊ नका, आपले वर्तन सुधारा. संयम बाळगा... बस्स... साडेसातीत भाग्योदयकारक घटनाच जास्त घडतात हे निर्विवाद सत्य आहे. असो. मागे सांगितल्याप्रमाणे गोचेरीचे सगळे ग्रह आपापल्या परीने सगळे परिणाम देत असतात. शनि महाराज अडीच वर्षे एका राशीत या हिशोबाने तुमच्या राशीच्या अगोदरच्या राशीत अडीच वर्षे, तुमच्या राशीत अडीच वर्षे आणि त्यानंतरच्या राशीमध्ये अडीच वर्ष या हिशोबाने साडेसात वर्षे आपल्या आयुष्यातील या साडेसातीमध्ये जातात. बहुतेक सगळ्यांनाच किमान दोन साडेसातीचा अनुभव घ्यावा लागतो. त्यातल्या एका साडेसातीबद्दल आपल्याला काहीही आठवत नाही किंवा त्याच्या परिणामाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. जी अजाणतेपणामध्ये आलेली साडेसाती असते त्यामध्ये आपण घाबरतो. काही भाग्यवंतांना तीन साडेसाती अनुभवायला मिळतात. जर आपण या संपूर्ण गोष्टीकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, जगातील सुमारे 8 अब्ज लोकसंख्या 12 राशींमध्ये विभागली गेली आहे. याचा अर्थ असा की, सुमारे 70 कोटी लोक एकाच राशीचे आहेत. हे स्वाभाविक आहे की, संक्रमण सर्व 70 कोटी लोकांवर एकाच पद्धतीने परिणाम करणार नाही. मग नक्की कुणा कुणाला याचा परिणाम जाणवेल. 1. तुम्ही महादशा, अंतरदशा किंवा अगदी शनिची प्रत्यंतर दशा चालवत असाल. जर तुम्ही हे करत असाल, तर तुमच्यासाठी निश्चितच अधिक स्पष्ट परिणाम येतील. यासाठी तुमची कुंडली असणे आवश्यक आहे. 2. शनि त्याच्या मीन राशीच्या संक्रमणादरम्यान पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती नक्षत्रांमधून जात आहे. जर तुमचा लग्नाचा स्वामी, तुमचा सूर्य किंवा तुमचा चंद्र यासारखे महत्त्वाचे ग्रह या नक्षत्रांमध्ये असतील, तर अधिक स्पष्ट परिणाम जाणवतील. तुम्ही तुमच्या कुंडलीवरून हे जाणून घेऊ शकता. 3. तुम्ही ज्या वयात आहात आणि ज्या अवस्थेत आहात. जर तुम्ही 18 वर्षांखालील मुलांसारखे विशिष्ट वयोमर्यादेपेक्षा कमी वयाचे असाल, तर त्याचे परिणाम सौम्य असण्याची शक्मयता असते. 4. उच्च अहंकार आणि वृत्ती असलेल्या लोकांसाठी, शनि निश्चितच ग्राउंडिंग फोर्स म्हणून काम करतो आणि जमिनीवर आणतो. 5. ज्या लोकांनी खूप उल्लंघन केले आहे किंवा वाईट कर्म केले आहे किंवा बेकायदेशीर, अन्याय किंवा निर्दयी कृत्ये केली आहेत, त्यांचे परिणाम अधिक स्पष्ट असतील. 6. या उलटदेखील खरे आहे, जर तुम्ही शुद्ध, न्याय्य आणि दयाळू जीवन जगला असाल तर चांगले आणि अधिक फायदेशीर आणि स्पष्ट परिणाम मिळतील.
मेष
पूर्वी घेतलेली कर्जे, घरातील वाद-घडामोडी यावर मात करण्यासाठी सतर्क राहावे लागेल. स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. प्रवास घडेल. छंद व व्यासंग जोपासून घरात खेळकर वातावरण ठेवता येईल. ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे त्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद घेता येणार नाही. कर्जाचा बोजा वाढवू नका.
उपाय : साखर दान करा.
वृषभ
नोकरदार व्यक्तींना एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्यांच्या कौशल्याला मागणी राहील, पण मोबदल्याविषयी खात्री नसल्यामुळे कामात फारसे लक्ष नसेल. त्यानंतर मात्र एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला उपयोग होईल. त्यानिमित्ताने विशेष सवलती मिळतील. इंजिनियर, शास्त्राrय शाखेत काम करणाऱ्या मंडळींना फायदा.
उपाय : दूध दान करा.
मिथुन
प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पुढील काळासाठी गुंतवणूक करावी लागेल. जादा पैशाच्या मोहाने अयोग्य व्यक्तींशी संगत करू नका आणि बेकायदेशीर कामांपासून लांब रहा. नोकरीत अपेक्षित कामे होतील. पगारवाढ, बढतीची शक्मयता आहे. जुनी आर्थिक येणी वसूल होतील. तुमच्याच कामाच्या व्यवधानामुळे सांसारिक जीवनाला म्हणावा तसा न्याय देऊ शकणार नाही.
उपाय : कपाळवर केशराचा टिळा लावा.
कर्क
अतिश्र्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. महिला आपली जबाबदारी उत्तम पार पाडू शकतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. लांबचा प्रवास, घरातील शुभकार्य, खरेदी यातून जीवनाचा एक वेगळा आनंद मिळेल. तऊण-तऊणींना आपला जीवनसाथी निवडण्यात यश येईल. महिलांना कार्याची जबाबदारी पार पाडता येईल.
उपाय : मुंग्यांना पंजिरी घाला.
सिंह
वाढत्या खर्चामुळे पैसे हातात शिल्लक राहणार नाहीत. त्यानंतर पैसे मिळतील, पण ते नवीन गुंतवणुकीकरिता वापरावे लागतील. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना अधिक मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. महिला जबाबदारी समर्थपणे पार पाडतील. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. कामाच्या ठिकाणी महिला सहकर्मी बरोबर वाद संभवतो.
उपाय : वारुळाकडील माती जवळ ठेवा.
कन्या
मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली असेल. उच्च शिक्षणाकरिता किंवा कामाकरिता ज्यांना देशात अथवा परदेशात जायचे असेल त्यांना संपूर्ण महिना चांगला आहे. तरुणांना करिअरमधील प्रगती उत्तेजित करीत राहील. कौशल्य वाढविण्याकरिता त्यांना प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. घरातील वयोवृद्ध व अनुभवी मंडळीबरोबर संघर्ष न करता खेळकर दृष्टिकोन ठेवून मिळेल ते पदरात पाडून घ्याल.
उपाय : पिंपळाला पाणी घाला.
तूळ
नवीन करार करताना बेसावध राहू नका. नोकरदार व्यक्तींच्या बऱ्याच वर्षाच्या इच्छा-आकांक्षा साकार करणारा काळ आहे. गाडी किंवा घर आणि इतर सुखसुविधा खरेदीच्या कामाला यश मिळेल. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यांना हा महिना विशेष चांगला आहे. विवाहोत्सुक तऊणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.
उपाय : केळीच्या झाडाची पूजा करा.
वृश्चिक
कामाला चालना मिळेल. प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक सौख्य फारसे चांगले नसेल पण तुम्ही वेळ मारून नेऊ शकाल. घरामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी सारासार विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रकृती आणि पैसा या दोन्हीबाबतीत यंदा तशा अडचणी जाणवल्या नाहीत तरी सांभाळून राहिलेले बरे.
उपाय : लाल स्वस्तीक जवळ ठेवा.
धनु
नोकरदार व्यक्तींना ज्यांना पदोन्नती किंवा जादा पगारवाढ पाहिजे असेल, त्यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. महिला शिक्षण व कला क्षेत्रात आघाडीवर राहतील. घरातील सदस्य आणि त्यांच्या जीवनातील काही चांगले क्षण बघायला मिळतील. एखादी चांगली घटना घडल्याने घरात वातावरण प्रसन्न राहील.
उपाय : तीळ दान करा
मकर
ज्यांना परदेशात जायचे आहे, अशा मुलांकरिता आईवडिलांना पैशाची बरीच मोठी तरतूद करावी लागेल. तऊण-तऊणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नेईल, हे लक्षात ठेवावे. विवाहोत्सुक तऊणांना हा काळ अनुकूल आहे, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. प्रकृतीच्या तक्रारी अगर अन्य कारणाने मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र, काळजीचे कारण नाही.
उपाय : तुरटीने दात घासा.
कुंभ
नोकरीत संस्थेकडून बरेच प्रोत्साहन मिळेल. पगारवाढ किंवा नवीन भत्ते मिळतील. चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल, परंतु त्यानंतर मात्र कामाचा तणाव खूपच वाढेल. नोकरी किंवा उच्च शिक्षणाकरिता परदेशात जायचे आहे, त्यांना बरेच कष्ट पडतील. प्रॉपर्टी किंवा घरामधले बराच काळ रेंगाळत पडलेले प्रश्न असतील तर तडजोडीतून सुवर्णमध्य काढा.
उपाय : कपिला गायीची पूजा करा.
मीन
महत्त्वाकांक्षी व धाडसी तऊण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्मयता आहे. कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने काळ आव्हानाचा आहे. जोडीदाराशी चर्चा आणि विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरले. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील.
उपाय : बदाम दान करा.