For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:02 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

बुधवार, दि. 25 ते मंगळवार दि. 31 मार्च 2026 पर्यंत

Advertisement

मेष

लहान भावंडांच्या सहवासात आपला वेळ चांगला जाईल, असे दिसते. त्यांच्या सोबत एखादा छोटा रेल्वेप्रवासही घडण्याची शक्यता आहे. पण प्रवासात काही भलतेसलते धाडस करू नका. अंगलट येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपले काम चोख होईल. आपल्या कामाचे कौतुक होईल.

Advertisement

उपाय : शनिवारी दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.

वृषभ

घर खरेदी करण्याचा किंवा जागा घेण्याचा विचार करत असाल, तर त्या संबंधीच्या कागदपत्रांची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. आमिषाला बळी पडण्याची शक्यता आहे. शांतपणे विचार करा. चिडचिड होण्याचा संभव आहे. या आठवड्यात आईचा सहवास छान मिळेल.

उपाय : मंगळवारी मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घ्या.

मिथुन

या आठवड्यात आपल्यातील कोणती तरी सुप्त कला लोकांच्या निदर्शनास येईल आणि तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कुठेतरी तीर्थयात्रेला भेट देण्याची शक्यता आहे. तिथे आपल्या हातून धर्मकार्य घडण्याचा संभव आहे. आपल्या कलेला वाव द्या आणि आनंदात रहा, असे हा आठवडा सांगतो आहे.

उपाय : सोमवारी शंकराला बेल अर्पण करा.

कर्क

परदेशी जाण्याचा विचार डोक्यात येण्याचा संभव आहे. पण सध्या तरी हा विचार स्थगित करा. हाताखालील नोकरवर्गाचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मातुल घराण्याचे म्हणजे मामा-मावशी वगैरेचे सुद्धा सहकार्य आपल्याला लाभण्याची शक्यता आहे. खूश रहा.

उपाय : सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.

सिंह

दैनंदिन व्यवसाय वाढवायचा असतो बरोबर आहे. पण तो वाढवायच्या प्रयत्नात कुठल्यातरी आमिषाला बळी पडण्याचा संभव आहे. त्यामुळे सांभाळून व विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदारासोबत उगाच पंगा घ्यायला जाऊ नका. कोणतीही गोष्ट संयम, शांतता व समजूतदारपणाने घेतल्यास त्यातून चांगलेच घडेल.

उपाय : मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करा.

कन्या

अचानक धनलाभ संभवतो. कदाचित स्त्राrकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात काही अंशी आपली चिडचिड होण्याचा संभव आहे. कशाची तरी चिंता आपल्याला लागून राहण्याची शक्यता आहे. पण चिंता तन आणि मन हे दोन्ही जाळते, हे आपण जाणताच तेव्हा सर्व चिंता भगवंताला अर्पण करा.

उपाय : रामनामाचा जप करा.

तुळ

जप, तप, धर्मकार्य यामध्ये आपला हा आठवडा समाधानात जाईल, असे दिसते. काही सूचक स्वप्ने पडण्याची शक्यता आहे. दूरच्या पल्ल्याचा प्रवास संभवतो. कदाचित तीर्थयात्रेचा योग संभवतो. मंडळीचे, वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. आपले आयुर्विम्याच्या संदर्भातील काम सफल होण्याचा संभव आहे.

उपाय : गुरुवारी दत्त आराधना करा.

वृश्चिक

या आठवड्यात आपल्या उद्योगात प्रगतीची वाटचाल जोरात होण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल, तर उच्चपद प्राप्तीची शक्यता आहे. वरिष्ठांची कृपादृष्टी राहण्याचा संभव आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला चांगला जाईल, असे वाटते. मस्त आनंदात रहा.

उपाय : मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनु

समारंभात सहभागी होण्याची संधी मिळून आपली काही कला आपण सादर करण्याची शक्यता आहे. त्यातून तुम्हाला लाभही संभवतो. वडील भावंडांचे सहकार्य मिळेल. काही चैनीच्या वस्तू खरेदी कराल अथवा आपल्याला भेट मिळेल. आपल्या बुद्धीच्या जोरावर समोरच्या माणसावर चांगलीच छाप पाडाल.

उपाय : गायीला गूळ व भाकरी/चपाती खायला घाला.

मकर

परदेशी मालाच्या आयात-निर्यातीतून लाभ संभवतो आहे. कामाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचीदेखील शक्यता आहे. संधीचा लाभ घ्या. वाहन चालवताना आपली जरुरीची कागदपत्रे आपल्याबरोबर असू द्या. अनावश्यक खर्च टाळा. पैसा गाठीशी असू द्या. आईची छोटीशी तीर्थयात्रा करवाल. तब्येतीला सांभाळा.

उपाय : पक्ष्यांना चारा पाणी द्या.

कुंभ

या आठवड्यात आपले मन काहीसे अस्वस्थ, हळवे असण्याची शक्यता आहे. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन स्थिर असेल, तर आपली बुद्धी चांगले व व्यवस्थित काम करू लागेल आणि त्यामुळे कोणत्याही बाबतीत आपण ठामपणे व योग्य निर्णय घेऊ शकाल. पण त्यासाठी मन स्थिर व शांत हवे.

उपाय : शनि मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

मीन

या आठवड्यात आपल्या कुटुंबासोबत खूप छान वेळ घालवण्याची संधी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पैतृक संपत्तीचादेखील थोडाबहुत लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा समोरील माणसावर छान परिणाम होऊन त्याचाही लाभ संभवतो.

उपाय : शनिवारी शनि चालीसा वाचा.

Advertisement
Tags :

.