For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:10 AM Mar 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

मेष

Advertisement

लहान भावंडांच्या सहवासात हा आठवडा छान जाईल, असे दिसते. लहान भावंडे, नातेवाईक यांच्यासोबत एखाद्या छोटय़ा रेल्वे प्रवासाचा आनंद आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात काही भलते धाडस मात्र करू नका. खाण्यापिण्याची चंगळ अनुभवाल. एकंदरीत हा आठवडा छान जाईल, असे वाटते. आनंद घ्या.

उपाय : दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.

Advertisement

वृषभ

या आठवडय़ात आईच्या प्रेमळ सहवासात आपला वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला असणार्‍या अनेक काळजी व चिंतेतून थोडे रिलॅक्स झाल्यासारखे वाटून झोप छान मिळण्याचा संभव आहे. स्वत:साठी घर बांधण्याचा अथवा घेण्याचा विचार डोक्यात येण्याचा संभव आहे. कदाचित त्याबद्दलची चर्चा घरात सुरू होईल.

उपाय : गाईला गूळ चपाती-भाकरी खायला घाला.

मिथुन

आपण कोणती तरी विशेष विद्या शिकण्याच्या प्रयत्नात असाल, तर ते पूर्णत्वाला येईल. काही गूढ, तंत्र, मंत्र विद्येचा अभ्यास करण्याची सुद्धा इच्छा होऊ लागेल. पण आता सध्या या आठवडय़ात तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. परीक्षेचे दिवस आहेत. तुमच्या मार्गदर्शनाची त्यांना आवश्यकता आहे. तिकडे लक्ष द्या.

उपाय : शुक्रवारी संध्याकाळी घरी महालक्ष्मीची पूजा करा.

कर्क

नोकर-चाकरावरती आंधळा विश्वास टाकू नका. तब्येतीला सांभाळा. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीच्या शोधार्थ असाल, तर मिळण्याची शक्यता आहे. उगाच कोणत्यातरी गोष्टीचा अतिविचार करून मन चिंतेने व्याकूळ होण्याची शक्यता आहे. चिंता करू नका व अति विचारही करू नका.

उपाय : सोमवारी महादेवाच्या पिंडीवर कच्च्या दुधाने अभिषेक करा.

सिंह

जोडीदाराचे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. दैनंदिन व्यवसाय करीत असाल, तर पूर्ण विचारांती नवीन गुंतवणूक करा. सध्या आहे तेच पुढे चालवण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यामुळे कदाचित आपल्याला काही त्रास होण्याचा संभव आहे. थोडा फार फायदा नक्की होईल.

उपाय : मंगळवारी बजरंगबाण वाचा.

कन्या

अचानक धनलाभ संभवतो. पण योग्य मार्गाने आलेला धनलाभच स्वीकारा. नाहीतर कोणत्या तरी गोत्यात अडकाल. तो पैसा आपल्याला लाभण्याची शक्यता कमी आहे. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा संभव आहे. स्वत:साठी अगर घरासाठी काही खरेदी कराल. एकंदरीत या आठवडय़ात आपल्याला सावध रहावे लागेल.

उपाय : पक्ष्यांना चारापाणी द्या.

तुळ

या आठवडय़ात आपल्याला सूचक स्वप्ने पडण्याची शक्यता आहे. घरात काही धार्मिक कार्य घडण्याचा संभव आहे. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील. काही लेखनकार्य संपन्न होईल, असे वाटते. वडिलांसोबत कुठेतरी दूरवरच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कदाचित दूरची तीर्थयात्रा घडेल.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

वृश्चिक

नोकरीत आपल्यावर आपले वरिष्ठ अधिकारी खूश होतील. आपले काम त्यांना आवडून आपली पदोन्नती होण्याचा संभव आहे. आपण स्वतंत्र उद्योगधंदा करत असाल, तर आपल्या उद्योगात प्रगती संभवते. भरभराट होईल. मानसन्मान प्राप्त होईल. समाजात आपला दर्जा उंचावेल. कर्जासाठीच्या प्रयत्नात यश मिळेल.

उपाय : मंगळवारी हनुमान चालीसाचा संकल्प घेऊन म्हणा.

धनु

या आठवडय़ात अतिशय सुंदर ग्रहमान आहे. अनेक सभा-समारंभातून सन्माननीय वागणूक मिळेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा तर मिळेलच पण त्यातून आर्थिक फायदा सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. उंची व किमती वस्तुंची देवाणघेवाण होईल. वस्त्रप्रावरणांची खरेदी होईल. वडील भावंडांच्या व मित्रांच्या भेटीगाठी होतील.

उपाय : सदगुरुंची उपासना करा.

मकर

वाहन चालवताना सांभाळून चालवा. आपली सगळी कायदेशीर कागदपत्रे आपल्या जवळ कायम असू द्या. कोणत्याही बाबतीत कुणासाठी मध्यस्थी करू नका अथवा जामीन राहू नका. विनाकारण अडकण्याची शक्यता आहे. या सर्वांमुळे मन व्यथित होऊन अध्यात्माकडे वळण्याचीदेखील शक्यता आहे. चांगली गोष्ट आहे.

उपाय : घरातून बाहेर पडताना केशरी गंध कपाळावर लावा.

कुंभ

मन थोडे काहीवेळा चंचल होईल. आपली तर्कबुद्धी चांगली काम करेल व आपण आपल्या कामावर चांगले लक्ष केंद्रित कराल. आपल्याला  अनेक प्रकारांनी आमिषे दाखविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्या अमिषांना आपण किती बळी पडायचे ते आपल्या बुद्धीने आपणच ठरवायचे असते.

उपाय : ॐ नम: शिवाय जप करा.

मीन

आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवून इतरांशी व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या कुठल्या बोलण्याने समोरचा माणूस दुखावेल याचा अंदाज लावता येत नाही. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे. पण काही देवघेवीचे व्यवहार असतील, तर थोडे सांभाळून व पूर्ण विचारांती  करावेत.

उपाय : शनिवारी तळलेले पदार्थ भिकार्‍यांना खायला द्या.

Advertisement
Tags :

.