For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:10 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

बुधवार दि. 21 ते मंगळवार दि. 27 जानेवारी 2026 पर्यंत

Advertisement

मेष

संततीच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. परीक्षेचे दिवस जवळ आले आहेत. आपल्या मार्गदर्शनाची त्यांना कदाचित गरज लागेल. विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनाकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासावर मन केंद्रीत करावे. या आठवड्यात मन भरकटण्याची शक्यता आहे. सांभाळा.

Advertisement

उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.

वृषभ

या आठवड्यात आपल्याला आपल्या हाताखालील सहकाऱ्यांची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या वागणुकीमध्ये कंजुषपणा करू नका. कर्जप्राप्तीसाठी धडपड चालली असेल, तर या आठवड्यात आपल्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा छान जाईल.

उपाय : दत्तगुरुंची उपासना करा.

मिथुन

जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. आपल्या कुटुंबाचे सुद्धा सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला ऐकत जा. स्वतंत्र व्यवसायात असाल, तर व्यवसायातील भागीदाराचा सल्ला घेतलात, तर आपल्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. संधीचा फायदा घ्या.

उपाय : रोज तुळशीला पाणी घाला.

कर्क

पैतृक संपत्तीबद्दल घरात जर चर्चा सुरू असेल, तर त्याचा लाभ आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. पण आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. अचानक धनलाभाची पण शक्यता आहे. पण त्यासाठी अट्टहास नको. आईची व जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वत:ला सांभाळा.

उपाय : शिवाची आराधना करा.

सिंह

या आठवड्यात आपल्याला काही धर्मकार्य करावेसे वाटण्याची शक्यता आहे. त्याबद्दल विचार करू नका. ते कार्य प्रत्यक्षात आणा. अध्यात्म मार्गाकडे आपली आस्था वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. संतांचे, वृद्धांचे आशीर्वाद मिळतील. सूचक स्वप्ने पडतील.

उपाय : मंगळवारी व बुधवारी गणपती स्तोत्र म्हणा.

कन्या

या आठवड्यात आपल्या अंगी असलेल्या कलेचे कौतुक होईल व त्याबद्दल आपल्या कार्यक्षेत्रात आपला मान उंचावण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल, तर पदोन्नती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारवाढ, मानमरातब हे ओघाने आलेच. कर्जप्राप्तीच्या प्रयत्नात असाल, तर कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : भटक्या कुत्र्यांना खायला द्या.

तुळ

या आठवड्यात आपल्या वडील भावंडासोबत, मित्रपरिवारासोबत आपला वेळ छान जाईल, असे दिसते. कदाचित काही नवीन लोकांच्या ओळखी होतील आणि त्या ओळखीतून आपल्याला काही लाभ होण्याचीदेखील शक्यता आहे. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. त्यातून काहीतरी चांगलाच लाभ घडेल.

उपाय : श्री दत्तगुरुंची उपासना करा.

वृश्चिक

या आठवड्यात आपल्याला परदेशातून फायदा संभवतो. परदेशी मालाच्या देवाण-घेवाणीतून कदाचित लाभ मिळेल. पण व्यवहार करताना पूर्ण विचार करूनच करा. कारण काहीवेळा ही प्रलोभनेपण असू शकतात. बाकी हा आठवडा आपल्याला छान जाईल, असे वाटते. काहीजणांना अध्यात्मात रुची वाटण्याचा संभव आहे.

उपाय : मंगळवारी बजरंग बाण वाचा.

धनु

या आठवड्यात मन थोडे चंचल होण्याचा संभव आहे. तेव्हा मनावर ताबा, संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. आळशीपणा वाढण्याचा संभव आहे. त्यावर मात करा व कार्यरत रहा. आळशीपणामुळे तुमचेच नुकसान होण्याचा संभव आहे. बाकी आठवडा चांगला आहे. या आठवड्यात आपल्या मातेला तिच्या कार्यामुळे सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : दिगंबरा दिगंबरा...चा जप करा.

मकर

हा आठवडा आपल्या कुटुंबीयासोबत आपण छान घालवाल. पण या काळात आपण आपल्या वाणीवर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व मिळून आनंदात असताना आपल्या बोलण्याने त्या आनंदावर विरजण पडणार नाही ना, याची काळजी घ्या. अचानक धनलाभाची शक्यता आहे. आपल्याला काही लेखन करावेसे वाटेल.

उपाय : शनिवारी दशरथकृत शनैश्चर स्तोत्र वाचा.

पुंभ

या आठवड्यात आपल्याला कष्ट बरेच करावे लागणार असे दिसते. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरी-धंद्यात असाल, तर तिथे किंवा विद्यार्थी असाल, तर अभ्यासात आपल्याला कष्ट घ्यावे लागेल. अनेक प्रलोभनांनी आपले मन सैरभैर होण्याची शक्यता आहे. जाणकारांचा सल्ला घ्या. आपल्या भावंडांची मित्रपरिवाराची कदाचित आपल्याला मदत मिळू शकेल.

उपाय : शनिवारी शनिमंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

मीन

आपल्या कामाशी व आपल्या शब्दांशी प्रामाणिक रहा. आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. वडिलांचा सल्ला डावलू नका. जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार तूर्तास पुढे ढकला. आपली स्थावर, जंगम मालमत्तेचा सुखोपभोग घ्या व जपून ठेवा. आपण शिकलेल्या विद्येवर पूर्ण विश्वास ठेवून त्यातून नवीन अनुभव मिळवा.

उपाय : काळे तीळ व काळे उडीद शनिला वाहा.

Advertisement
Tags :

.