खजाना भविष्य
मेष
परीक्षेचे दिवस आहेत. आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. कुठल्याही कामात आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभही होण्याचा संभव आहे. आपल्या बुद्धीचातुर्याने अनेक अडथळे आपण पार करू शकाल. पण स्वत:ला सांभाळून रहावे लागणार आहे.
उपाय : ‘ॐ नम: शिवाय’चा जप करा.
वृषभ
परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. अथवा आहे त्या नोकरीतूनच आपल्याला परदेशी जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सहकार्य मिळेल. थंडीच्या दिवसामुळे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी संभवतात. पण त्यातून बरे व्हाल. हा आठवडा छान जाईल.
उपाय: शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करून लाल गुलाब वाहा.
मिथुन
या आठवड्यात डोकं जरा शांत ठेवा. जोडीदाराला समजून घ्या. आपण जर छोट्या व्यवसायात असाल तर व्यवसायवृद्धी होण्याची शक्यता आहे. पण व्यवसायातील भागीदाराशी उगाच वादावादी करू नका. या आठवड्यात सरकारी कामातूनही काही लाभ होण्याची शक्यता आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.
कर्क
अचानक धनलाभ किंवा स्त्राrकडून लाभ संभवतो. पण तो लाभ योग्य मार्गाने मिळाला तर चांगले आहे. पण तो मिळविण्यासाठी हट्टीपणा करू नका. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. थोडे समजुतीने घ्या. कोणतीतरी चिंता सतावण्याची शक्यता आहे. एकूण हा आठवडा आपल्याला सांभाळून राहण्यास सांगत आहे.
उपाय: गायीची पूजा करा व तिला खायला घाला.
सिंह
दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कदाचित धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आपल्या हातून धर्मकार्य घडण्याचा संभव आहे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. खोट्या आशेला बळी पडू नका. कोणताही व्यवहार करताना अगर निर्णय घेताना खूप विचार करून निर्णय घ्या.
उपाय: श्री गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणा.
कन्या
हा आठवडा आपल्याला छान जाईल असे दिसते. आपल्या कामावर वरिष्ठ खूश होऊन आपली पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपला मानमरातब वाढण्याची शक्यता आहे. पर्यायाने समाजातही आपली प्रतिष्ठा उंचावेल. मन लावून प्रामाणिकपणे काम करा. यश तुमच्या हातात आहे.
उपाय: शनिवारी दशरथकृत शनैश्चर स्तोत्र म्हणा.
तुळ
हा आठवडा आपल्याला उत्तम जाईल. तुम्ही जे कराल त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या अशा समारंभात सहभागी होण्याचा संभव आहे. ज्यातून काहीतरी फायदाच होईल. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील. ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या संधी मिळतील. संधीचा लाभ घ्या.
उपाय: दत्तगुरुंची उपासना करा
वृश्चिक
या आठवड्यात तुम्हाला सांभाळून राहाण्यास सांगतो आहे. कुणालाही जामिन राहू नका. नको त्या प्रसंगात अडकण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना रहदारीचे सर्व नियम पाळूनच चालवा. सर्व आवश्यक ती कागदपत्रे जवळ असू द्या शत्रुपीडा संभवते. पण आत्मविश्वास घालवून घेऊ नका. या सगळ्याला टक्कर देण्यात समर्थ बना.
उपाय: मंगळवारी बजरंग बाण व रोज हनुमान चालीसा वाचा.
धनु
जोडीदाराला समजून घ्या. त्याची काळजी घ्या. त्याच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मन जरा अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. पण काळजी करू नका. सद्गुरु आपल्याला नक्की मार्ग दाखवतील. विश्वास ठेवा. मन मात्र ताब्यात ठेवायला शिका. अगर प्रयत्न करा. कारण चंचल मन भरकटण्याची शक्यता असते.
उपाय: गायीची सेवा करा.
मकर
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढाल व त्यांच्या सहवासात छान रमून जाल. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होण्याची देखील शक्यता आहे. आपली सर्व आप्तेष्ट मंडळी आपल्यावर आपल्या वागण्या बोलण्यावर, खूश होण्याचा संभव आहे. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही रिलॅक्स असाल.
उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
कुंभ
आळशीपणा करू नका. प्रामाणिकपणे काम केलेत तर यश नक्की मिळेल. पण मिळालेच पाहिजे म्हणून कुठल्या दुसऱ्या मार्गाने जाऊ नका. त्या मोहाला बळी न पडता थोडे कष्ट पडले तरी चालतील पण सरळ मार्गाचा अवलंब करा. बाकी लहान भावंडासोबत छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आनंदात रहा.
उपाय: शनिवारी तळलेले पदार्थ भिकाऱ्यांना खाऊ घाला.
मीन
सध्या शनि महाराज तुमच्याच राशीत बसल्याने तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ थोडे उशिरानेच मिळेल. घर, वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे सांभाळून व्यवहार करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. डोकं थंड ठेवून समोरील व्यक्तींशी बोला. कोणाचेही मन दुखवू नका.
उपाय: शनिवारी शनीला काळे उडीद, काळे तीळ व तेल वाहा.