For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भविष्य खजाना

06:05 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
भविष्य खजाना
Advertisement

बुधवार दि. 24 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत

Advertisement

 मेष

नोकरीच्या शोधात असाल, तर या आठवड्यात आपल्याला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या नोकर-चाकरांचे खूप सहकार्य मिळेल. पण सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून राहू नका. नोकरीतून परदेशगमनही संभवते. मिळालेल्या संधीचा लाभ घ्या.

Advertisement

उपाय : सद्गुरुची उपासना करा.

वृषभ

विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. जोडीदार बुद्धिमान मिळेल. दैनंदिन उद्योग असेल, तर व्यवहार करताना थोडा सांभाळून करावा. वादविवादात अडकून जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराला समजून घेण्याची आवश्यकता आहे. एखादा छोटासा प्रवाससुद्धा घडण्याची शक्यता आहे.

उपाय : कपाळावर चंदनाचा टिळा लावत जा.

मिथुन

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून आलेल्या एखाद्या योजनेमधून लाभ मिळण्याची संधी आहे. पण तो मिळवताना शांत डोक्याने विचार करा. मग पुढे पाऊल टाका. कौटुंबिक सुख मिळेल. कदाचित परदेशगमनाचादेखील विचार कराल.

उपाय : दत्तगुरुंचे नामस्मरण करा.

कर्क

या आठवड्यात आपल्याला दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कदाचित तीर्थयात्रा घडेल. काही धर्मकार्य घडण्याचा संभव आहे. वृद्ध मंडळींच्या सहवासाचे सुख, त्यांचे आशीर्वाद या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. जलपर्यटन घडण्याचा योग आहे. हा आठवडा आनंदात घालवाल.

उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.

सिंह

प्रलोभनाला बळी न पडता सारासर विचार करून कोणताही निर्णय घ्या. उद्योगधंद्यात बढती होईल. नोकरीत मानमरातब, उच्चपद प्राप्ती मिळण्याची शक्यता आहे. समाजात प्रतिष्ठा मिळण्याचा संभव आहे. वडील, वडीलधाऱ्या मंडळींशी सुसंवाद घडून त्यांचा आशीर्वादही मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : श्रीगणेश आराधना करा.

कन्या

राजकारणात कार्यरत असाल तर निवडणुकीत श्रेष्ठ ठरण्याची शक्यता आहे. सभा-समारंभात सहभागी व्हाल. त्यातूनही फायदाच होईल. मित्रपरिवारांच्या, वडील भावंडांच्या गाठीभेटी होण्याचा संभव आहे. त्या गाठीभेटीतून आपल्याला आनंदच मिळेल. एकूणच आपला हा आठवडा छान जाईल.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

तुळ

परदेशातून आपल्याला फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न करण्यास हरकत नाही. मिळालेल्या संधीचा लाभ घ्यायला शिका. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. योग्य त्या ठिकाणीच विचारपूर्वक खर्च करा. आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याची तीव्र इच्छा होण्याची शक्यता आहे.

उपाय : सोमवारी महादेवाला अभिषेक करा.

वृश्चिक

या आठवड्यात मन थोडे अस्थिर व चंचल होण्याची शक्यता आहे. पण चिंता करू नका. चिंता मनापेक्षा शरीराला जाळते. त्यामुळे भगवंतावर भार सोपवा आणि निश्चिंत रहा. देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर शांत मनाने करा. नक्कीच मार्ग सुचेल. आपल्या संततीकडून शुभवार्ता कळेल.

उपाय : मंगळवारी बजरंगबाण म्हणा.

धनु

वाणीवर संयम ठेवा. कदाचित या आठवड्यात पैतृक संपत्तीच्या बाबतीत घरामध्ये काही चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. बोलताना विचार करून बोला. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसाचे मन दुखवत नाही ना, याचा विचार करा. एकूणच हा आठवडा आपल्याला सांभाळून राहण्यास सांगतो आहे.

उपाय : रात्री झोपताना हनुमान चालीसा म्हणा.

मकर

या आठवड्यात आपल्या हातून काही लेखन होण्याची शक्यता आहे, जे सर्वांना आवडेल. नोकरीत असाल तर आपल्या हातून उत्तम काम होईल. वरिष्ठ आपल्यावर खूश होतील. आपल्या छोट्या भावंडांचा सहवास व त्यातील आनंद प्राप्त होण्याची शक्यता आहे.

उपाय : सोमवारी निरश्या दुधाचा अभिषेक करा.

कुंभ

आईच्या तब्येतीची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर समजुतीने घेण्याची गरज आहे. घर व वाहन खरेदी करण्याचा विचार असेल तर कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्या. फसवणूक होत नाही ना याचा विचार करा. वाहन चालवताना रहदारीचे सर्व नियम पाळा. प्रलोभनापासून स्वत:ला सांभाळा.

उपाय : रोज शनि माहात्म्य वाचावे.

मीन

मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. परीक्षेचे दिवस आहेत. आळशीपणा सोडून द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास  केला, तर यश निश्चितच मिळेल. आपण स्वत: कोणती विद्या शिकण्याचा विचार करत असाल, तर अवश्य शिका. यश मिळेल. आपण काही उपासना करत असाल, तर यश नक्की मिळेल.

उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.

Advertisement
Tags :

.