For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभवीष्य

06:01 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभवीष्य
Advertisement

प्रासंगिक-वक्री शनिचे परिणाम

Advertisement

बुधवार दि. 17 जुलै ते मंगळवार दि. 23 जुलै पर्यंत

मिथुन - मिथुन राशीसाठी आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी शनि आहे. आता तुमच्या नवव्या घरात प्रतिगामी होईल. त्यामुळे, यावेळी नशीब तुमच्या बाजूने नसण्याची शक्मयता आहे आणि त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता देखील असू शकते. मिथुन राशीचे लोक त्यांच्या सध्याच्या नोकरीत काही उत्तम संधी गमावू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान कमी होण्याची आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होणार नाही अशीही शक्मयता आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबातील सततच्या समस्यांमुळे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये गरमागरम वाद किंवा मतभेद होण्याची शक्मयता असते. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सावध असले पाहिजे कारण प्रवासादरम्यान तुम्ही निष्काळजी राहिल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रेमात, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबतच्या नात्यात चढउतारांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. सिंह राशीचे सूर्य चिन्ह - सिंह राशीच्या लोकांसाठी शनि महाराज सहाव्या आणि सातव्या घराचे स्वामी आहेत. यावेळी तुमच्या सातव्या घरात प्रतिगामी असेल. व्यावसायिक वातावरणात, तुम्हाला कामाच्या संदर्भात अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो, जो तुम्हाला आवडणार नाही. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात काही अपयशांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर आम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहिले तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात अहंकाराची समस्या असू शकते आणि अशा परिस्थितीत तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. कन्या सूर्य चिन्ह - कन्या राशीच्या लोकांसाठी शनि तुमच्या राशीच्या पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. कुंभ राशीच्या तुमच्या सहाव्या घरात सध्या प्रतिगामी आहे. कुंभ राशीत शनि प्रतिगामी असल्यामुळे तुम्हाला तुमचे खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. जे स्वत:चा व्यवसाय चालवतात त्यांना व्यावसायिक प्रयत्नांच्या अभावामुळे प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, शनिच्या प्रतिगामी काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्मयता आहे, ज्यामुळे तुम्ही उदास दिसू शकता. तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी चौथ्या आणि पाचव्या घराचा स्वामी शनिदेव आहे. सध्या ते तुमच्या पाचव्या घरातच प्रतिगामी आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक जीवनात पैशाच्या कमतरतेची समस्या असू शकते आणि याचे कारण बजेटचे पालन न करणे हे आहे. त्यांच्या प्रेम जीवनात, या लोकांना भावनिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते ज्यामध्ये अहंकार समोर येतो, ज्यामुळे ते त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होऊ शकतात. वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, शनि तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे. आता तुमच्या चौथ्या घरात प्रतिगामी होईल. शनि प्रतिगामी असताना कुटुंबाकडे लक्ष द्या. या लोकांना त्यांच्या जीवनात घट जाणवू शकते. या व्यतिरिक्त, तुमची विश्र्रांतीदेखील मर्यादित असू शकते. तुमचे करिअर जसजसे पुढे जाईल तसतसे नोकरीच्या चांगल्या संधी तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तसेच, तुमचा कामाचा ताण देखील वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्मयता आहे. आर्थिक जीवनात, प्रवास करताना निष्काळजीपणामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. धनु - धनु राशीच्या कुंडलीत शनि हा दुसऱ्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी आहे आणि सध्या तुमच्या तिसऱ्या घरात असेल. या काळात तुमचा बराचसा वेळ प्रवासातही जाईल. त्यामुळे या लोकांनी त्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा शनि कुंभ राशीत प्रतिगामी असेल तेव्हा तुम्हाला करिअरमध्ये किरकोळ नफा मिळू शकतो, परंतु तुम्ही फारसे समाधानी दिसणार नाही. आर्थिकदृष्ट्या, घरातील कामांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. मकर ा मकर राशीसाठी, शनिदेव केवळ राशीचा स्वामी नाही तर तुमच्या आरोही/1ल्या आणि 2ऱ्या घराचा स्वामीदेखील आहे. यावेळी तुमच्या दुसऱ्या घरात प्रतिगामी असेल. अशा स्थितीत शनि प्रतिगामी काळात तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवाल. याशिवाय तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही काम करत आहात. तुम्हाला तुमचे शब्द निवडताना खूप काळजी घ्यावी लागेल. करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, या काळात नोकरीमध्ये अचानक बदल होण्याची शक्मयता आहे, ज्यामुळे तुम्ही असमाधानी दिसू शकता. आर्थिक जीवनात मकर राशीचे लोक पैसे वाचवू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते.

Advertisement

मेष :

कोणत्यातरी समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या, विशेष करून वडीलधाऱ्या मंडळींच्या गाठीभेटी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मन प्रसन्न व आनंदी राहील. त्या निमित्ताने काही उंची वस्तूंची खरेदी होईल किंवा आपल्याला मिळण्याचीही शक्मयता आहे. आपल्या कामामुळे समाजात आपली प्रतिष्ठा वाढण्याचा संभव आहे. या आठवड्यात आप्तेष्टांबरोबर मित्रांच्या सहवासात वेळ छान जाईल.

उपाय : मारुतीची उपासना करा.

वृषभ :

या आठवड्यात तुमच्याकडून खर्चावर आळा घालण्याची गरज भासणार आहे. जपून खर्च करा. शक्मयतो फालतू खर्च करू नका. पुण्यकर्म मिळविण्यासाठी खर्च होऊ दे. वाहन चालवताना रहदारीचे नियम पाळून सांभाळून चालवा. देवाधर्मावर विश्वास ठेवा. नोकरीत अधिकाराचा नीट विचार करून वापर करा. अन्यथा लोकापवादाला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे.

उपाय : घरातील कुलधर्म कुलाचार नीट पाळा.

मिथुन :

या आठवड्यात मन थोडे चंचल होण्याचा संभव आहे.मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांची मर्जी आपल्या उत्तम कामामुळे सांभाळावी लागणार असे दिसते. कष्ट करावे लागणार. कौटुंबिक सुख चांगले मिळण्याचा संभव आहे. थोडे रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवा.

उपाय : शंकराची उपासना करा.

कर्क :

या आठवड्यात कुटुंबातील माणसांमध्ये वेळ छान जाण्याचा संभव आहे. वडिलार्जित संपत्तीच्या संदर्भात काही चर्चा चालली असल्यास त्यातून आपल्याला फायदा होण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर आपली भुरळ पडण्याची शक्मयता आहे. काही देण्याघेण्याचे व्यवहार सुरू असतील अथवा त्या चर्चेत असाल तर आपला फायदा होण्याचीच शक्मयता आहे.

उपाय : कुलदेवतेची उपासना करा.

सिंह :

नोकरीत आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. आपली वट वाढण्याची शक्मयता आहे. आपल्या हाताखालील सहकारी वर्गाचे आपल्याला सहकार्य लाभेल. आपले नातेवाईक, भावंडे, मित्र यांच्या संगतीत हा आठवडा आपल्याला आनंददायी जाण्याचा संभव आहे. कदाचित या सर्वाबरोबर अथवा कामानिमित्त छोटे प्रवासही होण्याचा संभव आहे. आनंदी रहा, खुश रहा.

उपाय : पांडुरंगाच्या नामस्मरणात वेळ घालवा.

कन्या :

मातेचा सहवास आपल्याला या आठवड्यात छान लाभण्याची शक्मयता आहे. त्याचा पुरेपूर लाभ घ्या. त्या सारखा आनंद तुम्हाला मिळणार नाही. तिची काळजी पण घ्या. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असेल तर जरूर पाऊल टाका. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार चालू असतील तर पुर्ण विचार करून व्यवहार करा. यश मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : महालक्ष्मीची उपासना करा.

तूळ :

संततीची प्रगती पाहून आनंदीत व्हाल. आपल्या पाल्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज भासण्याची शक्मयता आहे. लक्ष द्या. विद्यार्थ्यांनो अभ्यासाकडे लक्ष द्या. यश मिळेल. अचानक धनलाभाची शक्मयता आहे. आपण नवीन काही विद्या शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर जरूर शिका. आपल्या इष्ट देवतेला स्मरून काम सुरू करा. कुठल्या यंत्राचा अभ्यास करावयाचा असेल तर करायला हरकत नाही.

उपाय : आपल्या इष्टदेवतेची आराधना करा.

वृश्चिक :

कष्ट करावे लागणार आहे. पण तब्येतीकडे लक्ष द्यावे लागण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा. केलेल्या कामाचे फळ चांगलेच मिळेल. पण थोडे सबुरीने घ्यावे. नोकरावर अति विसंबून राहू नका. आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळेल त्या ठिकाणीच शक्मयतो जा. या आठवड्यात मन थोडे चंचल राहण्याची शक्मयता आहे. सांभाळा.

उपाय : हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनु :

जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. जे विवाहेच्छुक आहेत त्यांना चांगला जोडीदार मिळण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र व्यावसायिक असतील तर या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळण्याची, प्राप्तीत वाढ होण्याची शक्मयता आहे. व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदाराचे सहकार्य चांगले लाभेल. हरवलेली वस्तू अचानक सापडण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळी गंधाचा टिळा लावा.

मकर :

एखाद्या स्त्राrकडून अथवा सासरकडून धनलाभ होण्याची शक्मयता आहे. किंवा लॉटरी सारख्या प्रकारातून द्रव्यलाभ होण्याची शक्मयता आहे. पण ते धन योग्य मार्गाने येत आहे का याचा विचार करूनच त्या धनाचा स्वीकार करा. गैर मार्गाने आलेला पैसा नुकसान करूनच जातो, हे लक्षात ठेवा. कोणतीतरी मानसिक व्यथा सतावत राहण्याचा संभव आहे. काळजी घ्या.

उपाय : महादेवाची उपासना करा.

कुंभ :

मन अस्वस्थ राहण्याची शक्मयता आहे. जप जाप्य करीत रहा. त्यानेच मनाला शांति मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळण्याची शक्मयता आहे. संधी सोडू नका. धर्माचरण करण्याची पण संधी मिळण्याचा संभव आहे. शक्मय होईल तेवढे शांत राहून आपले कर्तव्य करीत रहा. आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांचा व घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल.

उपाय : अपंगांना शक्मय होईल तेवढी मदत करा.

मीन :

स्वतंत्र उद्योगात असाल तर या आठवड्यात आपल्याला चांगली प्राप्ती संभवते. नोकरीत असाल तर उच्च पद प्राप्ती संभवते. समाजात प्रतिष्ठा लाभण्याची शक्मयता आहे. मानमरातब वाढेल. आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. आपल्या कर्तबगारीमुळे आपले वडील आपल्यावर खुश होतील. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर थोड्याच प्रयत्नाने आपले काम होईल.

उपाय : आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा.

Advertisement
Tags :

.