For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:28 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

बुधवार दि. 11 ते मंगळवार 17 डिसेंबर 2024 पर्यंत

Advertisement

‘जे या शास्त्राची महती, स्वयंशंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी...’ माउली म्हणतात त्याप्रमाणे, जिथे भगवान शंकर स्वयं माता पार्वतीला या ज्ञानाबद्दल सांगतात, त्या ज्ञानाचा उपयोग आपण कसा करावा हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. आतापर्यंत आपण जे पाहिले ते थोडक्मयात पुन्हा एकदा सांगतो. आपल्या नाकाखाली-ओठांच्या वरती एक बोट ठेवावे, दोन नाकपुड्यांपैकी एका नागपुडीमधून गरम हवा येताना जाणवेल. म्हणजेच एका नाकपुडीतून सहजरित्या श्वास येताना जाणवेल. यालाच स्वर म्हणतात. आपण एकावेळी एकाच नाकपुडीमधून श्वास घेतो आणि जातो. दुसरी नागपुडी ही जवळजवळ बंद असते. (अगदी क्वचित दोन्ही नाकपुड्या चालू असतात. ज्याला सुषुम्ना स्वर-नाडी म्हणतात) अशाप्रकारे वायुच्या संचाराच्या क्रियेला स्वर असे म्हणतात. स्वर म्हणजेच श्वास आणि श्वास म्हणजेच जीवन आणि जीवनाचा प्राण म्हणजेच स्वर चालू राहणे. जे जीवनाचे प्रतीक आहे आणि त्याचे बंद होणे हे मृत्युचे. मागच्या वेळेला कुठल्या स्वरात काय करावे याची त्रोटक माहिती दिली. पुढे अगदी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोतच. या स्वर ज्ञानामुळे आपल्या ऋषिमुनींनी भूत-भविष्य काळाबद्दल माहिती दिली आणि आज आपण त्याचा उपयोग करून घेतोय. आपण जेव्हा झोपलेले असतो तेव्हा आपला कुठलाही कंट्रोल श्वासावरती नसतो. त्यामुळे केवळ योगी आणि तंत्रशास्त्रातले प्रगत गुऊ हे झोपलेले असतानासुद्धा आपल्या स्वरावर कंट्रोल करू शकतात. स्वराचा उदय सूर्योदयाबरोबरच होतो आणि साधारणपणे एका तासामध्ये हा बदलतो. तुम्हाला आठवत असेल की, ‘होरा’ या शब्दाबद्दल मी तुम्हाला सांगितले होते. हा होरासुद्धा एक तासाचा असतो! संपूर्ण ब्रह्मांड हे पाच तत्त्वांनी बनलेले आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हे प्रत्येक तासाला बदलत असतात. प्रत्येक तत्त्वाचा कालावधी (ड्युरेशन) असा आहे.... पृथ्वी 20 मिनिटे, जल 16 मिनिटे, अग्नी 12 मिनिटे, वायू 8 मिनिटे आणि आकाश चार मिनिटे. या पंचत्वांची गणना जर अशी समजून घेता येत नसेल तर आणखी एक विधी सांगतो. दोन्हीही अंगठ्यांनी आपले कान बंद करावे, नाकाच्या दोन्ही छिद्रांमध्ये दोन बोटे घालावी, दोन बोटे डोळ्यांवरती आणि उरलेली बोटे ओठांवरती ठेवावी. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला डोळे बंद केलेले असताना आतमध्ये पिवळा रंग दिसला तर पृथ्वी तत्त्व चालू आहे, पांढरा रंग दिसला तर जलतत्त्व चालू आहे, निळा रंग दिसला तर वायू आणि लाल रंग दिसला तर अग्नीतत्त्व चालू आहे असे समजावे. विचित्र रंग दिसला तर हे जाणून घ्यावे की, सध्या आकाशतत्त्व चालू आहे. तेही नाही जमले तर एक छोटेसे काम करावे. आरशावरती श्वास सोडावा. त्या श्वासाच्या उष्णतेमुळे जी आकृती तयार होते, त्यावरून सध्या कुठले तत्त्व चालू आहे हे जाणून घेणे शक्मय आहे. चौरस असेल तर पृथ्वी, त्रिकोण असेल तर जल, गोल असेल तर अग्नी, बिंदू असेल तर वायू आणि विचित्र आकृती असेल तर आकाश. अग्नीतत्त्व हे खांद्यापर्यंत, बेंबी जवळ वायू असतो, जलतत्त्व पायांकडे आणि आकाश तत्त्व डोक्मयामध्ये स्थित असते. या सर्वोदय शास्त्राचा अभ्यास करत असताना ही माहिती असणे आवश्यक आहे. (नाहीतर तुम्ही म्हणाल हे सगळे कशाला सांगतोय!). मागे सांगितल्याप्रमाणे एका तासाला आपण 900 आणि 24 तासात 21,600 श्वास घेतो. क्वचित काही वेळेला दोन्हीही स्वर चालू असतात तेव्हा सुषुम्ना नाडी चालू असते आणि हा सुवर्णकाळ असतो. या काळात केलेली साधना कधीही वाया जात नाही. आपल्या शरीरामध्ये पाठीच्या मणक्मयामध्ये डोक्मयापासून गुदद्वारापर्यंत सुषुम्ना नाडी असते. या नाडीच्या डावीकडे इडा आणि उजवीकडे पिंगळा नाडी असते. आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत त्यामधील या तीन महत्त्वाच्या नाड्या आहेत. आपण जो विचार करतो त्याचा प्रभाव या नाडी तंत्रावर पडतो. ज्यामुळे श्वासाची गती कमी किंवा जास्त होते (तुम्हाला राग येतो तेव्हा श्वास कसा जोर जोरात चालतो!) आणि त्यामुळे आपल्या स्नायू तंत्रावर प्रभाव पडतो. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक परिस्थितीवर होतो आणि घटना घडतात.

(क्रमश:)

Advertisement

मेष

ऑफिसमध्ये राजकारणापासून सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. गटबाजी उफाळून येईल. मन अस्थिर होण्याची शक्मयता आहे. कसली तरी हुरहुर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चिंती ते वैरी न चिंती असे होऊन जाईल. पण अशा चिंतेने तब्येतीची हेळसांड होईल हेही लक्षात घ्या आणि तब्येतीला सांभाळा.

उपाय : नामस्मरण करा.

वृषभ

घरातील वातावरण चांगले ठेवण्याकरता थेट प्रयत्न करावे लागतील. जोडीदाराचे सुख छान मिळेल. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल अथवा नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याची पण शक्मयता आहे. त्यामुळे शक्मयतो वादविवाद टाळा. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : गरजुंना मदत करा.

मिथुन

कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष द्या. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लॉटरी किंवा गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. एखादे लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पहायला हरकत नाही. आपल्या कामामध्ये बुद्धी चातुर्य दाखविण्याची संधी मिळाली तर सोडू नका.

उपाय : तुळशीला रोज पाणी घाला.

कर्क

लहान मोठ्या दुखापतीपासून सावध राहणे गरजेचे आहे. हा काळ तुमचा अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी घालवा. एखादी छान ट्रिप काढा. पण आनंद साजरा करताना दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचा ही आशीर्वाद घ्या. म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे.

उपाय : गाईला खाऊ घाला.

सिंह

प्रयत्न करणाऱ्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. आपली तर पाचो उंगलिया घी में अशी अवस्था दिसत आहे. पैसा व नावलौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्मयता दिसत आहे. वरिष्ठ आपल्यावर खूश असतील. वडिलांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आनंदात जाईल.

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

कन्या

नातलगांपैकी एखादी व्यक्ती कामासंदर्भात तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते. वडील भावंडाचे सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा आपल्या व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. समाजात आपल्याला मानमरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आनंदात दिवस घालवाल. त्यांचेसुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल.

उपाय : लक्ष्मीची आराधना करा.

तूळ

नको त्या लोकांच्या नादाला लागू नका, वेळ आणि पैसे वाया जातील. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. नंतर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळ करू नका.

उपाय : पक्ष्यांना पाणी द्या.

वृश्चिक

आपल्या पुढच्या प्लॅन्सबद्दल कुठेही वाच्यता न करणे शहाणपणाचे असेल. स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ तामसी स्वभाव उफाळून वर येण्याची शक्मयता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. मातेच्या आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

उपाय : हनुमान चालीसा पारायण करा.

धनु

बाहेर एक आणि आतून एक अशी दुतोंडी लोकं गाठ पडतील. कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात घालवाल. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेने आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्याने राहतील आणि ते तसेच राहावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतील.

उपाय : दत्ताची उपासना करा.

मकर

मित्रांपासून लाभापेक्षा हानी जास्त संभवते. ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल. पण थोडे कष्ट करावे लागतील असे वाटते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपली कर्तबगारी व बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल.

उपाय : मुंग्यांना साखर घाला.

कुंभ

खर्चावर नियंत्रण ठेवून बजेट करा. नंतर कुणाकडे मागायची वेळ नको. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. वाहन पार्क करताना योग्य ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक रहा.

उपाय : लक्ष्मीपूजन करा.

मीन

अति तिथे माती याचा अनुभव येण्याची शक्मयता आहे. त्या काळात कोणालाही पैसे उधारी देऊ नका. संततीची काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता, अस्थिरता येण्याची शक्मयता आहे. सांभाळा. बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांची त्यांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.

उपाय : गरिबाला खायला द्या.

Advertisement
Tags :

.