For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:10 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

अंकशास्त्र -लो -शो ग्रीड

Advertisement

ज्योतिषशास्त्राला देश, धर्म, भाषा अशा सीमा नाहीत. (समाजातील काही लोक यांचा स्वत:च्या स्वार्थाकरता उपयोग करून घेतात ही गोष्ट वेगळी) आणि केवळ आपलेच पारंपरिक शास्त्र महान अशा अहंकारालासुद्धा इथे स्थान नाही. अंकशास्त्राबद्दल लेखमाला आहे. लू-शु ग्रिडबद्दल बोललो नाही, असे होऊ शकत नाही. लक्षात घ्या, अंकशास्त्र शिकवणे हा इथे उद्देश नाही तर या शास्त्राचा सर्वसामान्य वाचकांना कसा उपयोग करून घेता येईल, हाच मानस आहे. अंकशास्त्राच्या अनेक पद्धतींपैकी लू-शू ग्रिड ही एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन चिनी पद्धत आहे. याचा वापर व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या जीवनातील मूलभूत शक्ती, गुणधर्म आणि भाग्य, यश याचा अभ्यास करण्यासाठी होतो. तसेच विवाह, भागीदारी, व्यावसायिक जुळवणीत याचा उपयोग करून दोघांमधील सामंजस्य, गुणधर्म आणि शक्मयतेचा अंदाज घेतला जातो. लू-शू ग्रिड म्हणजे काय? लू-शू ग्रिड हा 3×3 चौरस आकृतीचा तक्ता असतो, ज्यात अंक 1 ते 9 पर्यंत विशिष्ट क्रमाने बसवलेले असतात. या आकृतीला ‘मॅजिक स्क्वेअर’ देखील म्हणतात. या तक्त्याच्या प्रत्येक रांगेत, स्तंभात आणि तिरप्या रेषेत आकड्यांची बेरीज नेहमी 15 येते. (पंधरीया यंत्रच म्हणा ना!!) हा तक्ता खालीलप्रमाणे असतो.

Advertisement

4         9         2

3          5          7

8         1          6

या तक्त्यात प्रत्येक अंकाला विशिष्ट दिशा, जीवन क्षेत्र आणि कंपनशक्ती असते. उदाहरणार्थ, 1 हा पाण्याचा अंक असून उत्तर दिशेशी संबंधित आहे आणि बुद्धिमत्ता, कल्पकता दर्शवतो. लू-शू ग्रिड तयार कसा करायचा? (1) व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर्व अंक वेगळे करा. उदा. 14/07/1994 म्हणजे 1, 4, 0, 7, 1, 9, 9, 4. (2) हे अंक 1 ते 9 पर्यंत तक्त्यात त्याच्या जागी लिहा. (3)  ज्या घरात एखादा आकडा वारंवार येतो, तिथे त्या गुणधर्माची ताकद वाढते. (4) ज्या घरात कोणताही आकडा नसतो, ती व्यक्ती त्या क्षेत्रात दुर्बल मानली जाते. उदा : जन्मतारीख - 23/06/1995. अंक : 2, 3, 0, 6, 1, 9, 9, 5 लू-शू तक्त्यात मांडणी : 2-वर उजवीकडे, 3-मध्यभागी डावीकडे, 6-खालच्या उजवीकडे, 1-मधे खालच्या मध्यभागी, 5-मध्यभागी, 9-वर मधोमध आणि एकदा पुन्हा मोजणे (rाजू).

लू-शू ग्रिडमधील आडव्या आणि उभ्या ओळींचे अर्थ : लू-शू ग्रिडमधील आडव्या ओळी (प्दग्zदहूत् Rदे) म्हणजे तक्त्याच्या डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या ओळी. या तीन आडव्या ओळींना ‘संपत्ती रेषा’, ‘मनाचा प्रवाह’ आणि ‘शक्ती रेषा’ असे मानले जाते.

वरची ओळ (4-9-2) : विचारशक्ती, कल्पकता आणि बौद्धिक क्षमतेचे प्रतिनिधित्व करते. मधली ओळ (3-5-7) : जीवनातील संतुलन, भावना आणि निर्णयक्षमता दर्शवते. खालची ओळ (8-1-6) : शारीरिक शक्ती, सहनशक्ती आणि कृतीशीलतेचे प्रतीक.

उभा स्तंभ (न्नtग्म्aत् ण्दत्ल्स्हे) म्हणजे तक्त्याच्या वरून खालच्या दिशेने जाणारे रकाने.

डावीकडचा स्तंभ (4-3-8) : मानसिक ऊर्जा, मनाचे संतुलन आणि भावनांचे नियंत्रण.

मधला स्तंभ (9-5-1) : इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा.

उजवीकडचा स्तंभ (2-7-6) : व्यावहारिकता, भाग्य आणि सामाजिक कौशल्य.

यामधून काय कळते?

ज्या अंकांची पुनरावृत्ती होते, त्याची ऊर्जा जास्त प्रभावी असते. ज्या घरी आकडा नसतो, तिथे कमतरता समजली जाते. उदा. या व्यक्तीच्या ग्रिडमध्ये 4, 7, 8 या अंकांचा अभाव असल्याने स्थैर्य, अध्यात्म आणि संयम या गुणधर्मांमध्ये कमतरता मानली जाईल.

लू-शू ग्रिडचे महत्त्व : यामधून व्यक्तीची मानसिकता, आवडीनिवड, आरोग्य, नाते संबंध, आर्थिक स्थैर्य याचा अंदाज लावता येतो. नातेसंबंध जुळवताना दोघांच्या ग्रिड तुलना करून पूरकता तपासता येते. व्यापारात भागीदारी, सल्लागार निवड, व्यावसायिक नाती तपासण्यासाठी उपयुक्त.

लू-शू ग्रिड ही अंकशास्त्रातील प्राचीन आणि अतिशय परिणामकारक पद्धत आहे. याद्वारे व्यक्तिमत्त्व, सामर्थ्य, कमतरता आणि नात्यातील जुळवणूक अतिशय अचूकपणे कळू शकते. हे तंत्र सोपे असून प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मतारखेवरून स्वत:चे आणि इतरांचे ग्रिड सहज तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग जीवनातील विविध निर्णयांमध्ये करू शकतो. आता यावरून तुमची जन्म तारीख घ्या आणि तुम्हीच पहा की, तुमच्या सकारात्मक बाजू कोणत्या आहेत आणि कुठे तुम्ही कमी पडताय. पुढच्या लेखात या लू-शू ग्रिड अनुसार ‘पत्रिका जुळवणे’ (सायवळ!) बघुया!!!

मेष

या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण जाणवेल, पण गुऊच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक लाभाची संधी येईल. घरात एखादा शुभ प्रसंग ठरण्याची शक्मयता. प्रवास टाळल्यास उत्तम. मित्रमंडळीत लोकप्रियता वाढेल. निर्णय घेताना संयम बाळगा. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.

उपाय : मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

वृषभ

भाग्याची साथ लाभेल. नोकरीत बढतीसाठी चांगली वेळ. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्मयता. वैवाहिक जीवनात थोडा ताण जाणवेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक. वाहन चालवताना काळजी घ्या. कौटुंबिक सौहार्द टिकेल. मित्रांकडून मदत मिळेल. आध्यात्मिक अभ्यासाकडे ओढ वाढेल. मानसिक समाधान मिळेल.

उपाय : शुक्रवारी देवीची उपासना करावी.

मिथुन

प्रेमसंबंध दृढ होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. जुने वाद मिटतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात दक्षता आवश्यक. अनावश्यक खर्च वाढेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त. कौटुंबिक आनंद मिळेल. मित्रमंडळीत वाढती लोकप्रियता. लहान प्रवास संभवतो. पण प्रवासात सावध राहण्याची गरज आहे.

उपाय : बुधवारी गणपतीची पूजा करावी.

कर्क

मन अशांत राहील आणि कारण काय हेच कळणार नाही. कामात अडथळे येतील. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबात मतभेद संभवतात. प्रेमसंबंधात गैरसमज टाळावेत. आरोग्याची तक्रार संभवते. जुना मित्र मदतीला धावून येईल. कोर्ट-कचेरीचे काम शक्मयतो पुढे ढकला. मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास वाढवा.

उपाय : सोमवारी शिवाभिषेक करा.

सिंह

कामासंबंधी नवीन योजना आखाल. नोकरीत पदोन्नतीची शक्मयता आहे पण सोबत काम करणाऱ्या लोकांच्या कारस्थानापासून सावध रहा. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात शुभकार्य ठरेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. आरोग्य उत्तम. वडिलांची साथ लाभेल. सुसंवाद साधा. जुनी अडचण दूर होईल. प्रवासाचे योग संभवतात.

उपाय : रविवारी सूर्यनमस्कार घाला.

कन्या

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताणतणाव वाढेल. खर्च वाढेल आणि हिशोब लागणार नाही. नोकरीत बदलाचा विचार कराल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सावधगिरी ठेवा, धोका आहे. व्यापारात लाभ असेल. नवीन माल खरेदी करताना फायदा होईल. घरात वातावरण प्रसन्न असेल.

उपाय : बुधवारी दुर्गासप्तशतीचा पाठ करा.

तुळ

भाग्योदयाचा काळ आहे. जमेल तितका फायदा उचलायचा प्रयत्न करा. जुनी कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य सुधारेल. प्रेमात नवे वळण येईल. कुटुंबात आनंददायक घटना घडेल. मानसिक समाधान प्राप्त होईल. प्रवासाचे योग. सृजनशील कामात यश मिळेल. धार्मिक कामात भाग घ्याल.

उपाय : शुक्रवारी देवीला प्रसाद द्या.

वृश्चिक

तणावाचे प्रसंग येत आहेत, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढेल. प्रेमात दुरावा. नोकरीत दुसऱ्यांमुळे ताण असेल. आरोग्य मध्यम. जुना एखादा आजार त्रास देऊ शकतो. मित्रमंडळींचा आधार मिळेल. अनावश्यक प्रवास टाळा. घरात वाद. निर्णय जपून घ्या. जीवनसाथीबरोबर वादाचे प्रसंग कटक्षाने टाळा. अध्यात्मात मन लागेल.

उपाय : मंगळवारी भैरवनाथाचा जप करा.

धनू

नवीन कामाचा/नोकरीचा योग आहे. स्थान बदलही होऊ शकतो. आर्थिक लाभ होईल. जुने कर्ज फेडाल. प्रेमात यश मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आरोग्य उत्तम असेल पण म्हणून पथ्याकडे पाठ फिरवू नका. कुटुंबात समाधान असेल. कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. सृजनशीलतेत वाढ. वडिलांची मदत मिळेल.

उपाय : गुरुवारी गुरुची पूजा करा.

मकर

कार्यक्षेत्रात यश. खर्चावर नियंत्रण मिळेल. कुटुंबात सौहार्द. पण एखाद्या स्त्राrमुळे नको तो प्रसंग ओढवण्याची शक्मयता आहे. आरोग्य मध्यम असेल. प्रवास टाळा. प्रेमसंबंध गोड होतील. जुने प्रश्न मिटतील. धार्मिक स्थळी जाण्याचा योग. मित्रांचा पाठिंबा मिळेल. केलेल्या कामात मानसिक समाधान प्राप्त होईल.

उपाय : शनिवारी शनैश्चर कवच वाचा.

कुंभ

नवीन ओळखी होतील व त्यातून दूरगामी फायदे होतील. नोकरीत प्रगती. जुनी रक्कम परत मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. आरोग्य चांगले असेल. कुटुंबात समाधान असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवास फायदेशीर. सृजनशील कार्यात यश. जुनी कामे मार्गी लागतील. कोणावरही अंधविश्वास घातक ठरू शकतो.

उपाय : शनिवारी गरिबांना अन्नदान करा.

मीन

कामात अडथळे येतील. आपली चूक नसताना नोकरीत बोलणे खावे लागू शकते. खर्च वाढेल. आरोग्य मध्यम असेल. प्रेमात सावध रहा. नोकरीत इतरांमुळे ताण येईल. कुटुंबात मतभेद होतील पण तुम्ही सांभाळून घ्याल. अध्यात्मात समाधान मिळेल. जुना मित्र भेटेल. निर्णय शांतपणे घ्या. प्रवास टाळा. जास्तीची चौकशी कुणाकडेही करू नका.

उपाय : गुरुवारी हळदीचा तिलक लावा.

Advertisement
Tags :

.