महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:05 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बुधवार दि. 2 ते मंगळवार 8 ऑक्टोबर 2024 पर्यंत

Advertisement

7 निर्दयी ऋण : याचे कारण म्हणजे पूर्व जन्मी एखाद्याची हत्या करणे किंवा जमीन हडपणे, एखाद्याचे घर घेऊन मूल्य न देणे. याची सामान्य लक्षणे म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांना घरी राहू नये असे वाटणे, एखाद्या विहिरीवरती (विहीर बुजवून) घर बांधणे, अंगावरचे, विशेषत: पापण्यांचे आणि भुवयांचे केस झडणे. यामुळे घरात अपघात होणे एखादी व्यक्ती अपंग होणे असे होते. यावर उपाय म्हणजे परिवारातील प्रत्येक सदस्याकडून समान रक्कम घेऊन लोखंडाचे दान करणे, बांधकाम मजुरांना 43 दिवस जेवण घालणे, कावळ्यांना खाणे घालणे.

Advertisement

आपण हिंदू धर्मातील श्राद्ध संस्काराबद्दल विचार केला. अब्राहमिक धर्मामध्ये सुद्धा अनेक प्रथा आहेत.

ख्रिस्ती अनेक मार्गांनी मृतांना आदर देतात. ख्रिश्चन अंत्यसंस्कारांमध्ये विशेषत: प्रार्थना, वाचन, भजन आणि उपदेश यांचा समावेश होतो. ते सहसा चर्च किंवा स्मशानभूमीत आयोजित केले जातात. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मित्र आणि कुटुंब आठवणी सामायिक करण्यासाठी आणि भजन गाण्यासाठी जागरणासाठी एकत्र येतात.

ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन बहुतेकदा मृत्युनंतर तिसऱ्या, नवव्या आणि चाळीसाव्या दिवशी तसेच पहिल्या आणि तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त स्मारक सेवा आयोजित करतात. पॅथोलिक देशांमध्ये, 1 नोव्हेंबर हा ‘ऑल सेंट्स डे’ आहे, जो मरण पावलेल्या संतांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. 2 नोव्हेंबर हा ‘ऑल सोल्स डे’ किंवा ‘मृतांचा दिवस’ आहे, जेव्हा सर्व विश्वासू मृतांची आठवण केली जाते. कुटुंब मेणबत्त्या पेटवण्यासाठी स्मशानभूमीत जातात आणि त्यांच्या मृत नातेवाईकांसाठी फुले अर्पण करतात. मृतांसाठी प्रार्थना तर जिवंत लोकांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या मृत्युची आठवण करून देण्यासाठी आणि मृत व्यक्तीच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. मुस्लीम अनेक मार्गांनी मृतांना आदर देतात. मृतांसाठी प्रार्थना करतात, क्षमा आणि दया मागतात तसेच स्वर्ग आणि तारणासाठी प्रार्थना करतात. इमाम (पवित्र नेता) अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेचे नेतृत्व करतात. मृत व्यक्तीला मृत्युच्या ठिकाणी दफन करण्यास प्राधान्य देतात आणि अंत्यसंस्कार करण्यास मनाई करतात. दफन करताना प्रत्येक व्यक्ती थडग्यात तीन मूठ माती टाकते.

मुस्लीम 40 दिवसांचा शोक कालावधी पाळतात, ज्या दरम्यान त्यांना फुले आणि अन्न मिळू शकते. समुदाय रसद आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी देखील मदत करू शकतो. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, मृत व्यक्तीसाठी ते करू शकतील अशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, ज्यामध्ये क्षमा आणि दया मागणे आणि स्वर्गासाठी प्रार्थना करणे समाविष्ट आहे. मुस्लीम मृत व्यक्तीला लाभ देण्यासाठी धर्मादाय कार्य करू शकतात. इतकेच काय तर मृत व्यक्तीला लाभ देण्यासाठी हज किंवा उमरा करू शकतात. मुस्लीम मृतकांना लाभ देण्यासाठी उपवास करू शकतात. या ठिकाणी एक गोष्ट सहज आठवली. औरंगजेबाने आपल्या बापाला, शहाजहानला कैदेत ठेवलेले असताना तो आपल्या बापाला केवळ 2 चपात्या आणि मोजकेच पाणी द्यायचा. उन्हाळ्याच्या दिवसात शाहजहानने जास्त पाणी मागितले पण औरंगजेबाने नकार दिला. तेव्हा शहाजहान (जो कवीही होता) त्याने लिहिले ‘ऐ पिसर तू अजब मुसलमानी, ब पिदरे जिंदा आब तरसानी, आफरीन बाद हिंदवान सद बार, मैं देहदं पिदरे मुर्दारावा दायम आब।

म्हणजे... ‘हे पुत्रा, तू पण अजब धार्मिक आहेस, जो आपल्या जिवंत बापाला पाण्याकरता तरसवत आहेस, प्रशंसनीय आहेत हे भारतीय जे आपल्या मेलेल्या पूर्वजांना ही अन्न-पाणी देतात’!!! तूर्तास थांबतो. . .

मेष

मन अस्थिर होण्याची शक्मयता आहे. कसली तरी हुरहूर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चिंती ते वैरी न चिंती असे होऊन जाईल. पण अशा चिंतेने तब्येतीची हेळसांड होईल हे ही लक्षात घ्या आणि तब्येतीला सांभाळा.

उपाय : नामस्मरण करा.

वृषभ

जोडीदाराचे सुख छान मिळेल. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल अथवा नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याची पण शक्मयता आहे. त्यामुळे शक्मयतो वादविवाद टाळा. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : गरजूंना मदत करा.

मिथुन

जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लॉटरी किंवा गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. एखाद्या लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पहायला हरकत नाही. आपल्या कामामध्ये बुद्धी चातुर्य दाखविण्याची संधी मिळाली तर सोडू नका.

उपाय : तुळशीला रोज पाणी घाला.

कर्क

हा आठवडा तुमचा अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी घालवा. एखादी छान ट्रीप काढा. पण आनंद साजरा करताना दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचा ही आशीर्वाद घ्या, म्हणजे तुमचा आनंद द्विगुणीत होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे.

उपाय : गाईला खाऊ घाला.

सिंह

आपल्या तर ‘पाचो उंगलिया घी में’ अशी अवस्था दिसत आहे. पैसा व नाव लौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्मयता दिसत आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश असतील. वडिलांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आपला आनंदात जाईल.

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

कन्या

वडील भावंडाचे सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा आपल्या व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. समाजात आपल्याला मानमरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासामुळे आनंदात दिवस घालवाल. त्यांचे सुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल.

उपाय : लक्ष्मीची आराधना करा.

तूळ

खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का? याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळ करू नका.

उपाय : पक्षांना पाणी द्या.

वृश्चिक

स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ तामसी स्वभाव उफाळून वर येण्याची शक्मयता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. मातेच्या आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

उपाय : हनुमान चालीसा पारायण करा.

धनु

कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात घालवाल. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेने आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्याने रहातील आणि ते तसेच रहावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतील.

उपाय : दत्ताची उपासना करा.

मकर

ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल. पण थोडे कष्ट करावे लागतील असे वाटते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपली कर्तबगारी व बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल.

उपाय : मुंग्यांना साखर घाला.

कुंभ

मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. वाहन पार्किंग करताना योग्य ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीत शांत रहाण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक रहा.

उपाय : लक्ष्मीपूजन करा.

मीन

संततीची  काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता, अस्थिरता येण्याची शक्मयता आहे. सांभाळा. बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांची त्यांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.

उपाय : गरिबाला खायला द्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article