For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:12 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

गुरु बदल 2025 : राशींवर होणारा   परिणाम

Advertisement

(सूचना- गुरु ग्रह पहिल्यांदा परीक्षा घेऊन-अडचणी आणून मग चांगले फळ देतो हे ध्यानी ठेवून खालील भविष्य वाचावे)

मेष

Advertisement

पराक्रम स्थानातून या गुऊचे भ्रमण आहे. पराक्रमाला वाव. भावंडांशी संबंध सुधार. विवाह रेंगाळलेले आहेत ते आता मार्गे लागणार. गुऊबळ मिळणार. भागीदारीतील आणि वैवाहिक जीवनातील संबंध चांगले. परदेशातील संधी. धार्मिक सहली. सर्व प्रकारचे जीवनातील लाभ. संतती संपत्ती वैवाहिक जीवन आरोग्य शिक्षण करियर वाहन सुख. घर घेण्याचे योग. वृषभ-धनस्थानातून या गुऊचे भ्रमण आहे. धन-कुटुंब वृद्धी. विवाह होतील. आर्थिक संपन्नता. रोग मुक्ती. शत्रूंवर मात. गुऊबळ आहे. ज्योतिषी-पौरोहित्य करणारे-मेडिकलशी संबंधित काम करणारे लोक जसे की डॉक्टर, नर्स यांना धनलाभ. बढती-बदली, प्रमोशन. मिथुन-विवाहयोग. संतती योग. शिक्षणात प्रगती. भागीदारी व्यवसायात निश्चित चांगले लाभ मिळतील. वैवाहिक जीवनातील जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जायची संधी मिळेल. वैवाहिक संबंध सुधारतील. नवमस्थानावर म्हणजेच भाग्य स्थानावर या गुऊची दृष्टी राहील. भाग्यस्थान पूर्वजन्माशी संबंधित समजले जाते. बाहेर देशात शिक्षणासाठी जाण्याचे योगदेखील यावषी येणार आहेत. धार्मिक सहली घडतील. देवदर्शन-गुऊभेट. कर्क-व्ययस्थानातून गुऊचे गोचर असणार आहे. बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी. आर्थिक बजेट कोलमडणार. खर्चाचे प्रमाण वाढणार. आईचे आरोग्य सुधारेल. वाहन खरेदी होईल. वास्तू खरेदी होईल. शत्रूच्या कपट-कारवाया निष्प्रभ राहतील. आजारातून सुटका. डायबेटीसचे जास्त चान्सेस. डॉक्टर, ज्योतिषी लोक, अंत्यविधी करणारे, इन्सुरन्स एजंट्स यांना आर्थिक प्राप्ती चांगली. सिंह- सर्व प्रकारचे चांगले लाभ. वाहन, वास्तू खरेदी होईल. संततीचे सुख मिळेल. पराक्रमाला निश्चितच चांगला वाव मिळणार आहे. भावंडांशी संबंध सुधारतील. शिक्षण-उच्च शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग. संतती इच्छुक दांपत्यांना संतती होईल. प्रेम प्रसंग बहरतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराबरोबर छोटे-मोठे प्रवास घडतील. भागीदारी व्यवसायात चांगले लाभ. कन्या-गुऊचे कर्म स्थानातून भ्रमण. नोकरी व्यवसायातील यश. नोकरीत बढती, बदली, प्रमोशन. आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ. कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन. मातेचे सुख चांगले. वाहन खरेदी, वास्तू खरेदीचे योग. आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने चांगली फळे मिळणार. शत्रूच्या कारवाया निष्फळ ठरतील. तूळ-भाग्यस्थानातून गोचर. गुऊची भेट.  महत्त्वाकांक्षा अपेक्षा पूर्ण होणार.  विवाह योग. भावंडांशी संबंध चांगले राहतील. छोट्या प्रवासाचे प्रसंग वारंवार येतील. संतती योग प्रबळ.  शिक्षणाच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळणार.  वृश्चिक-आठव्या स्थानातून गुऊचे गोचर. पौरोहित्य, ज्योतिषी आणि डॉक्टर लोकांना आर्थिक संपन्नता देणार. गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. रिसर्चमध्ये प्रगती-पदवी. आध्यात्मिक प्रगती होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दवाखान्यासाठी पैसे खर्च होतील. परदेशात सहली होतील. आर्थिक उन्नती. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्मयता. जमिनीचे सुख चांगले मिळणार. वाहन खरेदी वास्तू खरेदी व आर्थिक प्राप्ती चांगली होणार. धनु-सप्तमस्थानातून या गुऊचे गोचर. वैवाहिक जीवनातील जोडीदाराचे वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायात चांगले लाभ मिळणार. सगळ्या प्रकारचे लाभ. आरोग्य सुधारेल. विचार सकारात्मक होतील. महत्त्वाकांक्षा-अपेक्षा निश्चितच पूर्ण होणार आहेत. भावंडांशी चांगले संबंध राहतील. छोट्या-मोठ्या सहली घडतील. पराक्रमाला वाव मिळेल. प्रेझेंटेशन सुधारेल. नोकरी व्यवसायात चांगले यश. मकर-गुऊचे सहाव्या स्थानातून गोचर. शत्रूचा त्रास नाहीसा करणार. दीर्घकाळ रेंगाळणारे आजारदेखील बरे व्हायला लागेल. नोकरीमध्ये बदली बढती होईल. आर्थिक लाभ. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. बजेट कोलमडेल. आजारातून सुटका. परदेशात शिक्षणाची संधी. संतती इच्छुक दांपत्यांना संतती होईल. विद्येचा लाभ. शिक्षणात यश. वैवाहिक जीवनात आनंद. प्रेम प्रकरण वाढेल. तीर्थयात्रेच्या संधी. उपासना वाढेल. वाहन, वास्तू खरेदी होईल. सर्व प्रकारचे चांगले लाभ मिळणार आहेत आर्थिक प्रगती होईल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. मीन-  चतुर्थस्थानातून या गुऊचे गोचर होणार आहे. वाहन, वास्तू खरेदी होईल. आर्थिक लाभ मिळतील. पौरोहित्य करणारे गुऊजी, ज्योतिषी आणि डॉक्टर लोकांना धनप्राप्ती. नोकरी व्यवसायामध्ये चांगले लाभ मिळतील. बदली, बढती, प्रमोशन या गोष्टी दिसून येतात. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी चांगले योग बनणार आहेत. आर्थिक बॅलन्स बिघडणार. दवाखान्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्मयता आहे.

मेष 

एकूण ग्रहमान पाहता उलाढालीच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. आपल्या अपेक्षांना बऱ्यापैकी चालना मिळू शकेल. संततीबाबतची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सुख-समाधान मिळू शकेल. प्रकृतीबाबत खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.

उपाय : तांदूळ दान करा.

वृषभ

कामाचा उत्साह देईल. प्रकृतीबाबत तक्रारीला वाव मिळू शकेल. तेव्हा प्रकृतीबाबत अधिक दक्ष रहा. मानसिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक दृष्टिकोनातून ठीक राहील. वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. व्यापाराला चालना मिळेल. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ उत्तम मिळेल.

उपाय : अंध व्यक्तिंना जेवण द्या

मिथुन

प्रगतीची संधी मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याची दक्षता घ्या. अनावश्यक खर्च टाळा. प्रवासाचे बेत साध्य होतील, वाहनसुख मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी होता येईल व एखादे पद मिळण्याची शक्मयता राहील. प्रवासाचे बेत साध्य होतील. कोर्टकचेरीच्या कामाला गती मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व अनुकूलता वाढेल.

उपाय : घरामध्ये यज्ञयाग करा.

कर्क

रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. इतरांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. सरळमार्गी व्यवहार करा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. सामाजिक व दैनंदिन जीवनात रागाचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सामंजस्याने वागणे योग्य राहील.

उपाय  : मांसाहार करू नका.

सिंह

प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. मोसमानुसार आहार घ्यावा. प्रकृतीची पथ्ये पाळा. या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपला उत्साह वाढीला लागेल.  प्रवासाचे बेत साध्य होतील. शिक्षण, उद्योग या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत अधिक लक्ष द्या. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या.

उपाय : दिलेले वचन अवश्य पाळा.

कन्या

आपले ग्रहमान पाहता आपण एकाग्र वृत्तीने काम करणेच योग्य राहील. धरसोड वृत्ती सोडून एकाग्र दृष्टीने काम करावे. भागीदारीत दक्षतेने काम करावे.  नको त्या गोष्टीत व प्रलोभनात अडकू नका. छोटे प्रवास संभवतात. प्रयत्नशील राहणेच योग्य राहील. ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराची साथ उत्तमपणे मिळू शकेल.

उपाय : घरात गंगाजल कायम ठेवा.

तूळ

बरेचसे ग्रहमान आपणास साथ देणारे आहे, पर्यायाने आपण नव्या योजनांचा विचार करू शकता व आपले ध्येय गाठण्यास प्रारंभ करू शकता. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. शारीरिक व मानसिकतेसाठी योगाचा उपयोग करा. जोडीदाराची साथ मिळेल.

उपाय : घरात गंगाजल कायम ठेवा.

वृश्चिक

नोकरदारांना दिलासा मिळेल. उधारी वसूल होण्याची शक्मयता आहे. सरकारची कामे मार्गी लागतील. कामकाजात सुलभता जाणवेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सध्या फार मोठ्या उलाढाली शक्मय नसल्या तरी दैनिक कामकाजात अधिक लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. कायदा व नियमांचे कटाक्षाने पालन करा.

उपाय : मिठाचे प्रमाण शक्मय तेवढे कमी करा.

धनू

आपले ग्रहमान पाहता बरीचशी अनुकूलता लाभण्याची शक्मयता असल्याने आपण आत्मविश्वासाने कामे पार पाडाल. आपल्या अनुभवाचा लाभ घेता येईल, पर्यायाने आपल्याला मानसिक शांती लाभणे शक्मय होईल. कला, व्यापार, छोटे व्यावसायिक यांना प्रगतीची संधी मिळू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मुलांसाठी खर्च करावा लागेल.

उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.

मकर

सर्व बाबतीत संयमाने वागणेच इष्ट ठरेल. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. क्रीडा, राजकारण अशा क्षेत्रात प्रगती करता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. जोडीदाराशी सामंजस्याने वागा. व्यापारी वर्गाला व्यापाराकरता खर्च करावा लागेल.

उपाय : पांढरे कपडे वापरू नका.

कुंभ

एकूण ग्रहमान पाहता काही चांगल्या गोष्टी करणे शक्मय होईल व प्रगतीची वाटचाल करता येईल. कला, व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. प्रवासाचे बेत आखता येतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळू लागेल. कौटुंबिक वातावरण वादासारख्या प्रसंगाने बिघडणार नाही याची खात्री बाळगा. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. नको त्या प्रलोभनात अडकू नका.

उपाय :  कोणतेही  दान/भेटवस्तू  घेऊ नका.

मीन

आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग करा. जोडीदाराशी सुसंवाद साधणे योग्य.  प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका. वेळीच औषधोपचार करावा. मुलांची चिंता करू नये. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायातील हा काळ लाभदायक जाऊ शकेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

उपाय :  नशापाणी यापासून सक्त दूर राहा.

Advertisement
Tags :

.