खजाना भविष्य
‘उपाय’ या एका शब्दावर भारतातील ज्योतिषशास्त्र कुबड्या घेऊन उभे आहे. शांत्या, जप-तप करून घेणे, विविध शनि धामांना जाणे, तेल अर्पण करणे, उडीद-खडे मीठ ठेवून येणे, तैलाभिषेक घालणे, आपल्या बहिणीच्या मुलासोबत शिंगणापूरला जाणे, हे सगळे जर भीतीपोटी असेल तर या सगळ्याला काहीही अर्थ नाही असे मला वाटते. (इतरांचे मत वेगळे असू शकते, त्यांचा मी सन्मानच करतो पण... ‘बाह्यात्कारी केले पूजन, अंतरी विकल्पे भरले मन, तरी कोणतेही दैवत नोहे प्रसन्न, हे मुख्य वर्म, आजि कळो आले...’ - प. पू. कलावती आई). हे जे उपाय दिले आहेत ते अत्यंत वास्तविकतेला धरून दिले आहेत. कुंभ, मीन, मेष, धनू, सिंह या राशींबरोबरच इतरांनादेखील याचा लाभ होईल. तसे झाले तर या लेखाचे सार्थक झाले असे मी मानेन.
- मीन रास ही मोक्षाची रास आहे. राशीचक्रातील शेवटची रास. जलतत्त्वाची म्हणून भावनिक, सेंटीमेंटल, इमोशनल, हे करू की ते करू या संभ्रमावस्थेत असणारी. सात्विक, बडबड जास्त करणारी पण मन साफ. मनात आले तर अध्यात्माच्या मागे लागणारी. शनि महाराज इथे आले आहेत तर तुम्हाला येथे असलेल्या सर्व गोष्टींशी असलेली तुमची ओढ सोडून द्यावी लागेल. शक्मय तितकी कमीत कमी जीवनशैली स्वीकारा, गरजा कमी करा. वायफळ खर्च टाळा. एक वास्तववादी बजेट तयार करून सुऊवात करा, जे विलासिताऐवजी गरजांना प्राधान्य देईल. जर तुम्ही आधीच केले नसेल तर आपत्कालीन निधी तयार करा (सेव्हिंग). कारण या संभाव्य आव्हानात्मक संक्रमणादरम्यान आर्थिक सुरक्षितता मन:शांती प्रदान करेल. खरेदीला जितका आळा घालाल तितका तुम्हाला मानसिक त्रास कमी होईल. जोशमध्ये येऊन कुणालाही अवास्तव मदत करणे टाळा.
- या काळात (2.5 वर्षे) काही जवळचे मित्र, नातलग दुरावतील. त्यांच्याशी अकारण भांडणे होतील. कदाचित ते तुम्हाला सोडून जाऊ शकतात, कायमचा दुरावा येऊ शकतो. शनि महाराज, ज्या लोकांची तुमच्या आयुष्यात गरज नाही, किंवा जे लोक पुढे जाऊन समस्या निर्माण करू शकतात त्यांना तुमच्या आयुष्यातून काढणारच. तेव्हा या गोष्टीकडे सकारात्मक नजरने पहा. जे गेले ते आपले नव्हतेच, हे ध्यानी ठेवा.
- अध्यात्मात प्रवेश करा. जर तुम्ही आत्ताच अध्यात्माचा सराव करत नसाल तर तुम्ही तातडीने सुऊवात केली पाहिजे. अध्यात्माचा अर्थ धर्म नाही. तुम्ही कोणत्याही आध्यात्मिक पंथाला लागलात तर शनि महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची आध्यात्मिक शक्ती सुधारण्यासाठी तुम्ही दररोज मंत्रदेखील घेऊ शकता आणि त्यांचा जप सुरू करू शकता, कारण ते तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करेल. मीन राशी ही भावनिक राशी आहे आणि तुम्ही कदाचित पाहिले असेल की, कधी कधी तुम्ही भावनिक निर्णय घेता. ज्यामुळे पैसे, नातेसंबंध किंवा प्रतिष्ठा गमावली जाऊ शकते. म्हणूनच 12 व्या घराला नुकसानाचे घर मानले जाते. योग आणि श्वासोच्छ्वासाच्या सरावाने तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या पद्धतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
- औषधांचे दान करा.
- स्वत:ला वेगळे करायला शिका. मीन रास ही एकाकीपणाची रास आहे जी समाजात वावरते पण आपले दु:ख आत लपवून. तसेच एकाकीपणातच तुमच्या मनात सर्वोत्तम कल्पना येतात. तुम्ही बाह्य जगापासून जितके वेगळे रहाल तितकी ही 2.5 वर्षे चांगली जातील. याचा अर्थ असा नाही की कुणाशी बोलू नका, मिसळू नका, पण स्वत:ला विरक्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
- दररोज रात्री, आकाशाशी संबंध निर्माण करण्यासाठी तारे पाहण्याचा आणि आकाश पाहण्याचा सराव करा.
- मीन राशीचा संबंध नि:स्वार्थ सेवा आणि सर्व प्राण्यांसाठी कऊणेशी आहे. इतरांना मदत करण्याचे मार्ग शोधणे. विशेषत: असुरक्षित, आजारी किंवा उपेक्षित हे मीन राशीतील शनि ऊर्जेशी पूर्णपणे जुळते. स्वयंसेवा, धर्मादाय देणग्या किंवा गरजू मित्र आणि कुटुंबासाठी अधिक उपलब्ध असणे या संक्रमणादरम्यान सकारात्मक कर्म निर्माण करू शकते. लक्षात ठेवा की, निष्काम सेवेमध्ये योग्य सीमा समाविष्ट आहेत. इतरांना मदत करणे तुमच्या स्वत:च्या कल्याणाच्या किमतीवर येऊ नये.
- वृद्ध, दिव्यांग यांची जमेल ती सेवा करा.
- जे लोक गाडी चालवताना मोबाईल वापरतात, हेल्मेट घालत नाहीत त्यांची खैर नाही, हे पक्के ध्यानात ठेवा.
- चुकूनही नशा, अनैतिक गोष्टी करू नका. ‘आ बैल मुझे मार’, अशी परिस्थिती निर्माण होईल.
- घाम गाळा. कामे करा. तुमचे काम बैठे असेल तर जिम लावा, धावा, शारीरिक थकवा येईल आणि घाम गळेल, याची काळजी घ्या.
- आजचे काम उद्यावर ढकलू नका. कधीच.
- ‘आळस केला आणि संकट आले’, हे सूत्र मनात बिंबवा.
- हाताखालच्या नोकरांना, काम करणाऱ्यांना अत्यंत सन्मानाने वागवा.
- चुकूनही कुणाचा अधिकार मारू नका, बूमरँग होऊन तुमचे नुकसान नक्की.
- सट्टा, जुगार किंवा ज्याला ईझी मनी म्हणतात, त्यापासून शेकडो मैल दूर रहा. शनि महाराजांना कष्टाचा पैसा आवडतो.
- माफ करायला शिका. नाती टिकवा. विशेषत: कुटुंबातील व्यक्तींना सांभाळा.
- या काळात अति लांबचे प्रवास जरूर करा. ज्यांना ज्योतिषातले थोडेजरी कळते त्यांना मी हे का म्हणालो ते कळेल.
मेष
विनाकारण टेन्शन घेणे सोडा. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात चांगला काळ असेल. व्यवसायात, तुम्हाला काही अनपेक्षित वाढ किंवा बढती मिळेल. यामुळे आगामी काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्यात नोकरी मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून चांगला पाठिंबा मिळेल.
उपाय : थोरा-मोठ्यांचा आदर राखा.
वृषभ
वादविवाद आणि कोर्ट केसेसमध्येही विजय मिळवाल. नवीन नोकरीची ऑफर मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. तुम्हाला संयम ठेवून तिसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागेल. तुम्हाला चांगली ऑफर मिळेल. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना चांगला राहील, कारण तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. या आठवड्यात मुलांपैकी एकाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.
उपाय : कुलपुरोहिताचा सन्मान करा.
मिथुन
अनावश्यक वादामुळे या आठवड्यात तुमच्या भावंडांसोबत काही समस्या येऊ शकतात. उत्तरार्धात परिस्थिती सामान्य होईल. चांगला धनप्रवाह असेल आणि तुमचे खर्च कमी होतील. जे घर किंवा वाहन खरेदी करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे. कर्ज किंवा आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत असाल, तर कागदपत्रे तपासण्याचा प्रयत्न करा.
उपाय : गणेश उपासना करा.
कर्क
कामाला ओळख मिळेल आणि उत्पन्नात वाढदेखील सूचित आहे. नंतर महिन्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला काही कामाचा बोजा आणि अशांतता जाणवू शकते. तुमच्या कार्यालयात तुमच्याबद्दल काही गैरसमज किंवा नकारात्मक चर्चा सुरू होऊ शकतात. म्हणून, आपल्या कार्यालयात सर्वांशी विनम्र आणि मैत्रीपूर्ण राहण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता असेल.
उपाय : केळी दान द्या.
सिंह
काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटदुखी, छातीत दुखणे, मूत्रमार्गाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ सामान्य राहील. पहिल्या दोन दिवसात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. वाहन किंवा घराच्या दुऊस्तीसाठी पैसे खर्च करू शकता. कामाच्या ठिकाणी टेन्शन असेल.
उपाय : केशरी टिळा कपाळावर लावा.
कन्या
कौटुंबिकदृष्ट्या हा काळ मिश्र्र परिणाम देईल. गुऊवार-शुक्रवार तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. वडिलांना किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे लोक तुम्हाला चुकीचे समजू शकतात, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
उपाय : कुत्र्याला खाऊ घाला.
तूळ
हट्टीपणाने वागल्याने लोकांशी वाद घालू शकता. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांशी योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक न करणे चांगले राहील. नवीन करार किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करतानाही काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल आणि ते त्यांच्या परीक्षांमध्ये यशस्वी होतील.
उपाय : चांदीचा हत्ती घरात ठेवा.
वृश्चिक
शत्रूंवर विजय मिळवाल आणि तुमची थांबलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. दीर्घकाळ चिंता निर्माण करणाऱ्या समस्यांचेही निराकरण होईल. तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती किंवा तुमच्या व्यवसायात चांगला बदल मिळेल. या महिन्यात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. लोक तुमचे महत्त्व ओळखतील आणि या महिन्यात तुमची कीर्ती वाढेल.
उपाय : उघड्या डोक्मयाने बाहेर फिरू नका.
धनु
वरिष्ठांशी बोलताना अनावश्यक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या काळात प्रवासदेखील करू शकता, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. पोट आणि मज्जासंस्थेशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या जाणवू शकतात. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी पुरेशी विश्र्रांती घेण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींचीही काळजी घ्यावी लागेल.
उपाय : चांदीच्या भांड्यातील पाणी प्या.
मकर
निष्काळजीपणामुळे महत्त्वाच्या वस्तू गमावण्याची शक्मयता आहे. अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक कार्यक्रमात किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांसोबत प्रवासदेखील करू शकता. आर्थिक बाबतीत सामान्य अनुभव असतील.
उपाय : डोक्मयावर शिखा ठेवा.
कुंभ
व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या काळात त्यावर काम सुरू करू शकता. नवीन व्यवसायाच्या संधीदेखील मिळू शकतात, परंतु चुकीच्या माहितीमुळे काही समस्या उद्भवू शकतात म्हणून व्यावसायिक करारांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता स्वत:च्या आवडी निवडीकडे दुर्लक्ष करावे लागेल.
उपाय : चारशे ग्रॅम धणे पाण्यात सोडा.
मीन
बढती मिळू शकते आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना या महिन्यात नोकरी मिळेल. या महिन्यात तुमचे उत्पन्नही वाढेल. परदेशात जाण्यासाठी किंवा नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करणारे या काळात प्रयत्न करू शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या बोलण्याचा आदर करतील आणि कार्यालयातही तुमच्या कामाची दखल घेतली जाईल.
उपाय : पिंपळाचे झाड लावा.