खजाना भविष्य
बुधवार दि. 26 मार्च ते मंगळवार 1 एप्रिल 2025 पर्यंत
जर मी तुम्हाला सांगितले की, आपल्यापैकी कित्येक मेषवाल्यांची साडेसाती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि कित्येक मकरवाल्यांची साडेसाती संपली आहे तर तुम्हाला पटेल का? पण सत्य हेच आहे. मुळात जन्म कुंडलीमध्ये असलेल्या मूळच्या चंद्राच्या डिग्रीवरती हे सगळे अवलंबून आहे. म्हणून सगळ्या लोकांची साडेसाती एकाच वेळेला संपते आणि एकाच वेळेला सुरू होत नाही. ज्याप्रमाणे गुऊपुष्यामृत योगाबद्दल गैरसमज आहे, त्याप्रमाणे साडेसातीबद्दलही हाच गैरसमज आहे. गुऊवारी जर पुष्य नक्षत्र असेल तर तो गुऊपुष्यामृत योग होतो आणि सोने खरेदी केले तर ते शुभ असते हाच मुळात गैरसमज. ज्या वेळेला आकाशस्थ पुष्य नक्षत्रामधून गुऊ ग्रहाचे भ्रमण होत असते, त्यावेळेला हा गुऊपुष्य नावाचा योग तयार होतो. गुऊ हा वाढीचा कारक आहे आणि पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये राजा आहे. म्हणून गुऊपुष्यामृत योग असे नाव दिले गेले. असो. तुम्ही ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या वेळेला जन्मला त्यावेळी आपल्या ग्रहमालेची स्थिती (किंवा ग्रहमालेचा स्क्रीनशॉट म्हणा ना!) म्हणजे तुमची कुंडली, ज्याला जन्म कुंडली किंवा जन्म लग्न कुंडली असे म्हणतात. त्या दिवशी त्यावेळी चंद्र ज्या राशीमध्ये होता ती तुमची जन्मरास. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे, मनाला होणारी सगळ्या प्रकारची सुख-दु:खे चंद्रावरून पाहिली जातात. तुम्ही जन्माला आला तेव्हा जी कुंडली होती किंवा तेव्हा जी ग्रह स्थिती होती ती आत्ता आहे का? अजिबात नाही. ग्रह सतत फिरत असतात म्हणून त्यांच्या प्रेरणाच्या अवस्थेला गोचर असे म्हणतात. मागच्या लेखातील आकृती : 1 मध्ये सूर्य केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात असे दाखवले आहे. याला सूर्यकेंद्र केंद्रीत ग्रहमाला किंवा हिलिओ सेंट्रिक असे म्हणतात. आकृती : 2 मध्ये पृथ्वीला केंद्रस्थानी मानून (इथे मानून हा शब्द महत्त्वाचा आहे), आपण जन्मलेले ठिकाण पृथ्वी म्हणून पृथ्वीला केंद्रस्थानी मानून इतर ग्रहांचे चित्र दाखवले गेलेले आहे. आकृती : 3 मध्ये पृथ्वीच्या भोवती काल्पनिक 12 भाग तयार केले गेले आहेत त्यातील एका भागाला आपण एक रास असे म्हणतो. आकृती : 4 मध्ये शनि ग्रह हा कुंभेतून मीन राशीमध्ये जाताना दाखवला आहे. एवढे जरी आपण लक्षात घेतले तरी पुढील भाग लक्षात यायला काहीच अडचण येणार नाही. साडेसातीला का घाबरू नये, शांती होम हवन याने फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होत असते, असे का?, अडीचकी म्हणजे काय, कंटक शनि म्हणजे काय आणि सगळ्या राशींवर त्याचा काय परिणाम होणार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो.
ज्यांना विज्ञानातले थोडेफार कळते, त्यांना लॉ ऑफ एनर्जी म्हणजे ाहुब् म्aहहदू ंा म्rाatाd हद dाstrदब्... ऊर्जेला तयार करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परिवर्तित करू शकतो, हे माहीत असेल. ज्या वेळेला गोचरीने एखादा ग्रह किंवा अनेक ग्रह त्रासाचे ठरू शकतात त्या वेळेला त्या ग्रहांची शांती किंवा पूजापाठ करण्यापेक्षा त्या ग्रहांची एनर्जी दुसरीकडे कशी वळवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? याचबद्दल आपण चर्चा कऊया. 29 मार्चला राशी परिवर्तन करणारा शनि कुंभ, मीन आणि मेष यांना साडेसातीमध्ये ठेवेल. सिंह आणि धनु यांना अडीचकी (म्हणजे अडीच वर्षाचा काळ, या काळात शनि आपली रास बदलतो) सुरू होईल. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला याबद्दल स्पष्ट कळू शकते.
मेष
कोणावरही विसंबून राहू नका. आर्थिक योग मध्यम राहील. खर्चाचे नियोजन करावे लागेल. नोकरी-व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने त्याच्यावर मात करता येईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. व्यापार-व्यवसायात नवीन योजना पूर्ण करू शकाल.
उपाय : खोटे बोलू नका.
वृषभ
आर्थिक बाबतीत बचत करा. सामाजिक माध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पहा. प्रकृती जपा. मानसिक समाधान न मिळल्याने दु:खी राहाल. लहान लहान गोष्टी मनाला बोचतील. त्याकडे फारसे लक्ष न दिलेलेच बरे. आर्थिक योग साधारण राहील. काम वेळवर पूर्ण करावे लागेल. कोणावर विश्वास ठेवू नका, नुकसान संभवते.
उपाय : चिमण्यांना दाणे टाका.
मिथुन
ज्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नाही अशा गोष्टींच्या नादी लागू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. दुसऱ्याने काय करावे, काय करू नये याचा सल्ला देत बसू नका, नुकसान होईल. नोकरी-व्यवसायात प्रामाणिक राहावे लागेल. संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळत राहील. व्यवहार सांभाळून करा.
उपाय : घरात गंगाजल ठेवा.
कर्क
आत्मविश्वासाने वाटचाल करत रहा. प्रवास योग आहे. आशातीत सुधारणा जाणवतील. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात भरभराटी येईल. कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्मय होईल. चांगल्या संधी येतील. न्यायप्रविष्ठ कामात यश मिळेल. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. तब्येतीला सांभाळावे लागेल.
उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.
सिंह
सतर्कता बाळगावी लागते. केव्हाही उठायचे आणि काम करायचे. काही नियोजन करायचे नाही. अशा वेळी नेमका गोंधळ होणार आहे. तेव्हा नियोजनाला खूप महत्त्व दिले पाहिजे. कामकाजाचा अतिरिक्त ताण राहील. जबाबदाऱ्या वाढतील. व्यापार-व्यवहारात लाभ मिळेल. संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्र्रमाचे चीज होईल. अपेक्षित यश मिळेल.
उपाय : कोणतेही दान/गिफ्ट घेऊ नका.
कन्या
प्रवास योग संभवतो. प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना क्रियान्वयन करू शकाल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत समाधान मिळेल. जुन्या समस्या हळूच डोके वर काढतील. परंतु गुऊचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर वेळीच तोडगा निघेल. आर्थिक योग उत्तम. कुटुंबातील मतभेद दूर होतील. मित्रमंडळीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
उपाय : वटवृक्षाला पाणी घाला.
तूळ
प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा. विशेष अनुकूल काळ नाही. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. शारीरिक स्वास्थ्य जपा.
उपाय : दुर्गा पूजा करा.
वृश्चिक
स्पष्टवक्तेपणा टाळा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. कोणाच्या बोलण्या-वागण्याकडे लक्ष देऊ नका. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्ग कामाकडे दुर्लक्ष करू नका. कामात निश्चिंतता राहील. आत्मविश्वास वाढवावा लागेल. अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल.
उपाय : रात्री दूध पिऊ नका.
धनू
एखादी गोष्ट उशिरा झाली म्हणून वाईट काही होत नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा उशिरा का होईना त्याचे फळ चांगले मिळेल. कामात नियमितता ठेवावी लागेल. उत्साह देणारा काळ राहील. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहील. खर्च वाढेल.
उपाय : जुगार इत्यादी खेळणे पूर्णत: टाळा.
मकर
स्वत:साठी वेळ काढावा लागेल. डोळ्याच्या तक्रारी संभवतात. प्रवास करताना काळजी घ्या. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्र्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तूची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.
उपाय : माशांना तांदूळ द्या.
कुंभ
विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. विनाकारण केबिनमध्ये बॉस समोर उभे रहावे लागेल. संयमाने वागा. कामकाज नियमित सुरू ठेवा. नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने नियोजन डगमगेल. देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या.
उपाय : तीर्थयात्रा करा.
मीन
यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरीत बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. कुटुंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभवतो.
उपाय : तुरटीने दात साफ करा.