For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना भविष्य

06:10 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना भविष्य
Advertisement

हरऽऽ हरऽऽऽ महादेव!!!!!!

Advertisement

आधी व्याधीपासून वाचवणारा शिव, जो योगीही आहे आणि भोगीही आहे, हाती त्रिशूल घेऊन स्मशानात वास करणारा, आभूषणाच्या नावाखाली ऊद्राक्ष, सर्प, चिताभस्म, गजवस्त्र, डमरू (ज्याच्या ध्वनीतून सुसंस्कृत व्याकरण निर्माण झाले) धारण करणाऱ्या या आपल्या आवडत्या देवतेबद्दल काही माहिती द्यायचा प्रयत्न करतो. (1) वीरभद्र : शिवाचे उग्र रूप- वीरभद्र हे शिवाची पत्नी सती हिच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी निर्माण केलेले शिवाचे उग्र स्वरूप आहे. त्याला अनेक शस्त्रs चालवताना आणि ज्वालाचा मुकुट परिधान केलेले चित्रित केले आहे. (2) भैरव : क्रोधयुक्त प्रकटीकरण- भैरव हे शिवाचे उग्र रूप आहे जो विनाश आणि विघटनाशी संबंधित आहे. त्याला गडद कातडीचा, कवटीचा मुकुट आणि शस्त्रs धारण करणारा, कुत्रा बाळगणारा असा दाखविला गेला आहे. (3) नंदी : दैवी बैल आणि शिवाचे वाहन (आरोह)- नंदी हा शिवाचा एकनिष्ठ आरोह आणि द्वारपाल आहे. त्याला पांढऱ्या बैलाच्या रूपात चित्रित केले आहे, जो सामर्थ्य, वीरता आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. चिरंतर प्रतीक्षेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. 4) अर्धनारीश्वर : शिव आणि शक्ती यांचे संयुक्त रूप- अर्धनारीश्वर हे शिव आणि त्यांची पत्नी पार्वती (शक्ती) यांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करतात. शरीराचा अर्धा भाग पुऊष (शिव) आहे आणि दुसरा अर्धा भाग स्त्राr (पार्वती) आहे, जो पुऊष आणि स्त्राr शक्तींच्या अविभाज्य स्वरूपाचे प्रतीक आहे. (5) दक्षिणामूर्ती : ज्ञान आणि शहाणपणाचे मूर्त स्वरूप- दक्षिणामूर्ती हे सर्व ज्ञान आणि बुद्धीचे गुऊ आहेत. त्याला वटवृक्षाखाली बसून शांततेतून ज्ञान देणारे शांत व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रित केले आहे. (6) पशुपती : सर्व प्राण्यांचा स्वामी- पशुपती हा प्राणी आणि सर्व जीवांचा स्वामी आहे. त्याला प्राण्यांच्या कातड्याने सजवलेला योगी म्हणून चित्रित केले आहे. निसर्गाशी त्याचा संबंध दर्शवितो. (7) भिक्षाटन : शिवाचे भिक्षुक रूप. अघोर- भिक्षाटन हे शिवाचे नम्र रूप आहे, भिक्षा मागणारा आहे. तो एक कवटीचा वाडगा घेऊन जातो आणि अनेकदा त्याची पत्नी पार्वती सोबत असते. (7) हरिहर : शिव आणि विष्णू यांचे एकत्र रूप- हरिहर हे शिव आणि विष्णू यांचे मिश्र्रण आहे, जे हिंदू धर्मातील दोन प्रमुख पंथांच्या एकतेचे प्रतीक आहे. शरीराचा एक अर्धा भाग शिवाचे प्रतिनिधित्व करतो आणि दुसरा अर्धा भाग विष्णूचे प्रतिनिधित्व करतो. (8) शरभ : आकलनापलीकडचे स्वरूप-शरभ हा एक पौराणिक प्राणी आहे ज्यात पक्षी, सिंह आणि मानवी वैशिष्ट्यो आहेत. विष्णूचा उग्र सिंह-पुऊष अवतार असलेल्या नरसिंहाला वश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते. (9) गणेश : शिवाचा प्रिय पुत्र- गणेश हा शिव आणि पार्वतीचा प्रिय पुत्र आहे, जो अडथळे दूर करणारा म्हणून ओळखला जातो. (10) हनुमान : एकादश ऊद्र : रामाचा भक्त आणि भक्तीचे मूर्त स्वरूप- हनुमान हे रामाचे भक्त आणि अटल भक्ती आणि नि:स्वार्थ सेवेचे प्रतीक आहेत. धैर्य आणि निष्ठेसाठी ओळखला जाणारा योद्धा म्हणून त्याचे चित्रण केले आहे. (11) अश्वत्थामा : अमर योद्धा- हिंदू पौराणिक कथांमध्ये, अश्वत्थामा एक पौराणिक व्यक्ती आणि एक चिरंजीवी आहे. तो शिवाचा अवतार मानला जातो आणि तो धैर्य आणि निष्ठेशी संबंधित आहे. (12) गृहपती : घराचा स्वामी- गृहपती हे शिवाचे सांसारिक स्वरूप आहे. ज्याची पूजा घरगुती संरक्षण आणि समृद्धीसाठी केली जाते. त्याला पार्वती आणि त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्यासोबत चित्रित केले आहे. (13) किरात : शिवाचे शिकारी रूप- किरात हे महाभारतात उल्लेखलेले शिवाचे शिकारी रूप आहे. वनवासात अर्जुनाच्या पराक्रमाची परीक्षा घेणारा कुशल धनुर्धर म्हणून त्याचे चित्रण करण्यात आले आहे. (14) भृंगी : विष्णूच्या अभिमानावर विजय मिळवणारा प्रखर भक्त- भृंगी हा शिवाचा निस्सीम भक्त आहे जो त्याच्या अतूट भक्तीसाठी ओळखला जातो. केवळ शिवाची पूजा करून विष्णूच्या अभिमानाला आव्हान देणारा ऋषी म्हणून त्याचे चित्रण केले आहे. (15) दुर्वास : क्रोधी ऋषी- दुर्वास हा त्याच्या उग्र स्वभावासाठी ओळखला जातो. तो शिवाचा अवतार मानला जातो आणि इतरांच्या संयमाची परीक्षा घेण्याशी संबंधित आहे. (17) अय्यप्पन : दक्षिण भारतातील पूज्य देवता- अय्यप्पन ही दक्षिण भारतातील एक आदरणीय देवता आहे, जी शिव आणि विष्णूची अवतार मानली जाते. केरळमधील सबरीमालाची प्रमुख देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. (18) खंडोबा : महाराष्ट्रातील योद्धा देवतेची पूजा केली जाते. खंडोबा ही मुख्यत: महाराष्ट्रात पूजली जाणारी योद्धा देवता आहे. तो शिवाचा अवतार मानला जातो आणि त्याच्या धैर्य आणि संरक्षणासाठी पूज्य आहे. (19) पिपलाद ऋषी : दधीची आणि सुवर्णाचा जन्म, पिपलादने पवित्र पिपलाद वृक्षाची पुनर्स्थापना केली, निसर्गाचे नूतनीकरण करण्याची शिवाची शक्ती प्रदर्शित केली. (20) इतर काही अवतार : ज्योतिबा, कापाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्त्र, अजपाद, अहिरबुध्न्य, शंभू आणि चंद.

पंचभूतात्मक शिवलिंगांची माहिती-भगवान शिवाशी संबंधित रहस्ये असंख्य आहेत. शिवाची रहस्ये ही जगातील सर्वोत्तम गुपिते आहेत. (1) वायू लिंग - श्री कालहस्ती येथील वायू लिंग, तिऊपतीच्या जवळ (चेन्नईपासून 150 किमी) (2) अग्नि लिंग- अऊणाचल प्रदेश - अग्नि लिंग (तिऊवन्नमलाई, तामिळनाडू) (3) जल लिंग- जंबू लिंगम - वऊण लिंगम (तिऊवनिकावल, तिर्ची, तामिळनाडू येथील जल लिंगम) (4) पृथ्वी लिंग - रामेश्वरम, तामिळनाडू (5) आकाश लिंग - चिदंबरम, तामिळनाडू.

Advertisement

मेष

जवळचे लोक भेटतील. आपले ग्रहमान पाहता आर्थिक व व्यावहारिकदृष्ट्या हा आठवडा चांगला जाणारा राहील. यशदायी सप्ताह राहील. नोकरी व्यवसायात कोणाला दुखवू नका. वास्तू विषयक गोष्टींना चालना मिळेल. घरातून उत्तम पाठिंबा मिळेल. आरोग्याबाबत मात्र जागरूक रहा. घरात शुभकार्याचे वारे वाहू लागतील. आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवास कराल.

उपाय : भागीदारी करू नका.

वृषभ

आर्थिक बाजू सुधारण्याची संधी मिळू लागेल. आपल्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल. काही जुने येणेही वसूल होण्याची शक्मयता राहील. प्रकृती स्वास्थ्याबाबत मात्र चालढकलपणा करू नका. वेळीच औषधोपचार करा. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या निर्णयाने येणाऱ्या प्रसंगांना आनंदाने सामोरे जाल. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या.

उपाय : व्यसनापासून दूर रहा.

मिथुन

अनावश्यक खर्च टाळल्यास व आपल्या गुप्त वार्ता मनात ठेवल्यास आपल्या यशाचा पाया बांधणे शक्मय होईल. एखादी गोष्ट मनाविऊद्ध झाली तरी सामोपचाराने त्याला सामोरे जाणेच योग्य ठरेल. बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सफलता मिळू शकते. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वैवाहिक, कौटुंबिक जीवनात चांगले निर्णय घेता येतील.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

कर्क

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगल्यास यशाची वाटचाल करणे शक्मय होईल. नोकरी व्यवसायात आपली छाप पाडू शकाल. केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. घरात मंगलकार्याचे वारे वाहू लागतील. वैवाहिक जीवनात मिळते-जुळते धोरण स्वीकारणे हितकारक राहील. जवळची व्यक्ती निराश करेल. नको त्या प्रलोभनात मात्र अडकू नका.

उपाय : कोणतीही गिफ्ट घेऊ नका.

सिंह

महत्त्वाची कामे योग्य माणसावरच सोपवणे या सप्ताहात आवश्यक ठरणार आहे. घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आणताना मिळणारा मदतीचा हात मोलाचा ठरेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित अशा गोष्टी साध्य करणे शक्मय होईल. घरातील पाळीव प्राण्यांपासून सावधानता बाळगा. शेतीविषयक कामाला चालना मिळेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात गोडवा येईल.

उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.

कन्या

या सप्ताहात आपण दिलेला शब्द, आश्वासने व नियमांचे पालन अशा अनेक गोष्टींचे पालन केल्याने आपली छाप पाडू शकाल. मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या. स्वत:बद्दलचा गैरसमज होणार नाही, याची दक्षता घ्या. नशिबाची मिळणारी साथ आणि आप्तेष्टांचे मिळणारे सहकार्य याने यश विस्तारित होऊ शकेल. वैवाहिक जीवनात होणारे मतभेद टाळा.

उपाय : मासे खाऊ नका.

तूळ

या सप्ताहात प्रकृती स्वास्थ्याबाबत सतर्कता ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे योग्य होणार नाही. दुरावलेले नातलग जवळ येतील. जुन्या चुकांची दुऊस्ती करण्याची हीच वेळ आहे. कामाची उलाढाल चालूच ठेवा. आर्थिक बाजू सावरता येईल. कौटुंबिक जीवनात काही मतभेद असण्याची शक्मयता राहील.

उपाय : घरात ‘जाते’ ठेवा.

वृश्चिक

या सप्ताहात आपण काही धाडसी निर्णय घेण्याची शक्मयता आहे. नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ यशाच्या दृष्टीने नेता येणे शक्मय आहे. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. कुटुंबात चांगले दिवस घालवू शकाल.

उपाय : खोटी साक्ष देऊ नका.

धनु 

सर्वसाधारण काळ आहे. मोठ्या अपेक्षा न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवा. नोकरी व्यवसायात आणि कुटुंबातही काही शुभ चिन्हे दिसू लागतील. मात्र त्याचा लाभ त्वरित दाखविता येणार नाही. कामाचा वेग तसाच चालू ठेवा. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होणार नाही, याची दक्षता घ्या.

उपाय: केळीच्या झाडाला व वटवृक्षाला पाणी घाला.

मकर

हाती घेतलेल्या कामाला गती मिळू शकेल. नोकरदारांकडून मिळणारा प्रतिसाद आणि ग्राहकांची पसंती याद्वारे नफ्याचे प्रमाण वाढविता येईल. मात्र एखाद्या खरेदीत अथवा व्यवहारात आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्या. कामाचा उत्साह वाढीला लागेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. वैवाहिक जीवनातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.

उपाय: मंदिरात देवदर्शनासाठी जा.

कुंभ

या सप्ताहात एका प्रश्ना पाठोपाठ अनेक प्रश्नांची मालिका आपल्या पुढे उभी राहण्याची शक्मयता आहे, विशेषत: घरातून आणि बाहेरूनही. पर्यायाने आपल्या प्रगतीची काहीशी पिछेहाट होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कलाक्षेत्राला चांगला वाव मिळेल. कौटुंबिक जीवनातील प्रश्न सतावतील.

उपाय: रागीटपणा टाळा.

मीन

या काळात प्रश्नांची भेंडोळी सुटू लागतील, अनेक अडचणींवर मात करता येईल, अनेकांची मदत मिळू लागेल व बऱ्याच प्रमाणात अपेक्षित यश मिळविता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. मात्र अनोळखी व्यक्तींवर विश्वास न टाकणे हितकारक राहील. घरगुती वातावरण चांगले राखता येईल. कुटुंबासह आनंद घेता येऊ शकेल.

उपाय: चांदीची भरीव गोळी जवळ ठेवा.

Advertisement

.