For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खडे बाजार कॉर्नरमधील उघड्या गटारामुळे नागरिक त्रस्त; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी;प्रशासनाविरोधात संताप

02:24 PM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
खडे बाजार कॉर्नरमधील उघड्या गटारामुळे नागरिक त्रस्त  गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी प्रशासनाविरोधात संताप
Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खडे बाजार कॉर्नर येथील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेली उघडी सांडपाणी वाहिनी नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर दिवस-रात्र मोठी वर्दळ असल्याने गणेशोत्सवाच्या काळात अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुख्य रस्त्यावरील गटाराचा मोठा भाग उघडा पडला असून त्यामध्ये कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच गटाराची रचना रस्त्याच्या पातळीपेक्षा सुमारे चार इंच उंच असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी तसेच इतर वाहने या उंच भागावर आदळून किरकोळ अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

खडे बाजार परिसरात दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि उघडे गटार स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात या मार्गावरील गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

एखाद्या नागरिकाचा नाहक बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विशाल एम. देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

गणेशोत्सवापूर्वी महानगरपालिका प्रशासनाने उघड्या गटाराची तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा. तसेच गटारातील कचरा आणि परिसरातील अस्वच्छता दूर करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.