महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून खादरवाडीच्या युवकाची आत्महत्या

11:45 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून खादरवाडी येथील एका तरुणाने शेतवडीतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अनिकेत मानाजी हेंडोरकर (वय 20) रा. खादरवाडी असे त्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो डोकेदुखीने त्रस्त होता. उपचार करूनही फरक पडला नाही म्हणून रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 6.30 यावेळेत आपल्या शेतजमिनीतील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. यासंबंधी त्याच्या वडिलांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article