For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

500 कोटी घोटाळा प्रकरणात गोव्यात महत्त्वाचे धागे

06:26 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
500 कोटी घोटाळा प्रकरणात गोव्यात महत्त्वाचे धागे
Advertisement

ईडीकडून कारवाई सुरू

Advertisement

पणजी : सुमारे 500 कोटी ऊपयांच्या कथित आर्थिक घोटाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) गोव्यातील आलिशान यॉटसह (व्हिला) काही स्थावर मालमत्तांची ओळख मिळाली आहे. या मालमत्ता गुंतवणूकदारांच्या पैशांच्या गैरवापरातून खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  या घोटाळा प्रकरणात गोव्यात महत्त्वाचे धागे असल्याचे समोर आले आहे.

ईडीने 13 आणि 14 एप्रिल रोजी दिल्ली-एनसीआर, गोवा, जयपूर आणि मुंबईतील सात ठिकाणी एकत्रित छापे टाकले. या कारवाईदरम्यान, रिअल इस्टेटशी संबंधित संघटित ‘पॉन्झी’ स्वरूपाच्या फसवणुकीचे पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात आले. या योजनेत एकाच ‘व्हर्च्युअल’ (आभासी पद्धतीने) व्यावसायिक जागेची वारंवार विक्री करून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गोव्यातील यॉटसह गुऊग्राम आणि महाराष्ट्रातील काही मालमत्ता गुह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचा संशय आहे. गुंतवणूकदारांच्या निधीतून आलिशान जीवनशैली उभारल्याचा आरोपही तपासात पुढे आला आहे. हा तपास ‘32वा अवेन्यू ग्रुप’ आणि त्याचे प्रवर्तक संचालक अनुभव शर्मा व ध्रुव शर्मा यांच्याभोवती केंद्रीत आहे. दिल्ली पोलिस व गुऊग्राम पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

Advertisement

आरोपींनी गुंतवणूकदारांना हमी भाडे परतावा व दीर्घकालीन मूल्यवाढीचे आश्वासन देत व्यावसायिक जागा खरेदीस प्रवृत्त केले. सुरुवातीला काही महिन्यांसाठी आकर्षक भाडे परतावा देऊन विश्वास निर्माण केला जात असे. त्यानंतर त्याच जागांची पुन्हा नव्या गुंतवणूकदारांना विक्री करून ‘पॉन्झी’ पद्धतीने फसवणूक चालवली जात होती.

तपासात 500 कोटी ऊपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांकडून वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम विविध विभाग व बेनामी कंपन्यांमार्फत फिरवून मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

छाप्यांदरम्यान 1.05 कोटी ऊपये रोख, तसेच सुमारे 1.5 कोटी ऊपयांचे सोने व दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय काही बँक खाती व लॉकर गोठवण्यात आले असून, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ध्रुव शर्मा आणि शिरीन शर्मा यांना हरियाणा पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे, तर अनुभव शर्मा आणि ममता शर्मा फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.