महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केविन ड्युरंटचा विक्रम

06:28 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ फोनिक्स

Advertisement

फोनिक्स सन्स बास्केटबॉल संघातील आघाडीचा बास्केटबॉलपटू केविन ड्युरंटने आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल क्षेत्रामध्ये (एनबीए) नवा इतिहास घडविला. ड्युरंटने सर्वाधिक गुण नोंदविणाऱ्या पहिल्या 10 बास्केटबॉलपटूंच्या यादीत स्थान मिळविले आहे.

Advertisement

केविन ड्युरंटने यापूर्वी या क्षेत्रात नोंदविलेला मोझेस मेलोनी यांचा विक्रम मोडीत काढला. 35 वर्षीय ड्युरंटने 27,411 वैयक्तिक गुण घेत सर्वोत्तम गुण नोंदविणाऱ्या पहिल्या 10 बास्केटबॉलपटूंच्या यादीत 10 वे स्थान मिळविले. फोनिक्स सन्स आणि डेनव्हेर न्युगेड्स यांच्यातील झालेल्या सामन्यामध्ये ड्युरंटने सर्वोत्तम कामगिरी केली. या सामन्यापूर्वी ड्युरंटला मेलोनीचा विक्रम मागे टाकण्यासाठी 17 गुणांची गरज होती. केविन ड्युरंटने दोन वेळेला एनबीए चॅम्पियनचा किताब मिळविला. तसेच जवळपास 7 फूट उंचीच्या ड्युरंटने सरासरी 27 गुणांची प्रत्येक सामन्यात राखली होती. शुक्रवारच्या झालेल्या सामन्यात ड्युरंटने मध्यंतरापर्यंत 22 गुण नोंदविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article