Ketan Agrawal Murder Case | केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा परिणाम कुटुंबांवर! चेतनच्या परिवाराला घर सोडण्याची वेळ
पुणे - केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.. रोज कोणताना कोणता धक्कादायक खुलासा होत आहे.केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांची हत्या केली.यानंतर सियाच्या बांबाना हॉर्ट अॅटॅक आला त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.. त्यांच्या परिवाराला हा सर्वात मोठा धक्का मिळाला होता.. सिया गोयलच्या आई - बाबांनी आमच्या मुलींने जर गुन्हा केला असेल तर त्यांना लोहगडावरुन ढकलुन द्या अशी प्रतीक्रीया दिली होती.. सिया गोयल आणि केतनच्या परिवाराला या धक्क्यातुन सावरायला वेळ लागतोय.. तर दुसरीकडे चेतन चौधरी यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे..
चेतन चौधरी यांच्या परिवाराला त्यांने केलेल्या हत्येमुळे लोकांकडून होत असलेली टीका आणि संतापाला सामोरे जावे लागत आहे.. लोकांच्या मिळत असलेल्या टोमण्यामुळे त्यांना स्वता:चे राहते घर सोडुन त्यांना पाहुण्यांच्या घरी राहायला जावे लागले इतकेच नाही.. तर पुण्यातील ‘मार्केट यार्ड’ परिसरात चेतनचे वडील बाबूलाल सीरवी यांचे दुकान आहे. पण हे दुकान 25 जून पासून बंद आहे.
एकंदरीत चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केलेल्या गुन्हाची शिक्षा मात्र त्यांच्या परिवाराला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे..याप्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनाआता तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. उद्या दोघांची पोलीस कोठडी संपत आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांना पाच दिवसांची (3 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पोलीस दोघांविरोधात भक्कम पुरावे गोळा करत आहेत. डिजिटल पुराव्यांची मोठी मालिकाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. डिलिट केलेल्या चॅटमधून मोठा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.