For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ketan Agrawal Murder दत्तक भावानंतर जन्मली पण नशेतच रमली, केतन अग्रवालचा जीव घेणाऱ्या सियाची डार्क साईड...

07:11 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ketan agrawal murder दत्तक भावानंतर जन्मली पण नशेतच रमली  केतन अग्रवालचा जीव घेणाऱ्या सियाची डार्क साईड
Advertisement

पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालच्या लोहगडावरील मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. सुरुवातीला अपघात वाटणारा ही हत्या पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून समोर आली. अत्यंत सधन घरात वाढलेली सिया इतकी क्रूर का वागली यावरही सोशल मिडीयावर चर्चा झाली. कित्येकांनी आपला संताप कमेंट्समधून व्यक्त केला.

Advertisement

 घटना घडल्यानंतर पोलिस तपासात आरोपी सिया गोयलच्या अनेक काळ्या बाजू समोर आल्या. त्याला टक्कल होतं तो तोतरा होता म्हणून मला तो आवडत नव्हता अशी कारणं देत सियाने आपल्या विकृतीचं समर्थन केलं असलं तरी तिच्या पालकांनीही ती दोषी असल्यास कडक शिक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

दत्तक घेतलेल्या बाळानंतर सियाचा जन्म

Advertisement

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार गोयल दाम्पत्याला अनेक वर्षे मूल बाळ नसल्याने त्यांनी एका बाळाला दत्तक घेतले होते ;पण काही वर्षानंतर गोयल दाम्पत्याच्या घरी सियाचा जन्म झाला. अनेक वर्षानंतर स्वत:चं मूल घरी आल्याने सियाचे प्रचंड कोड कौतुक करण्यात आले. सिया सतत पार्ट्यांमध्ये व्यस्त असायची. तिला पार्टी करणे प्रचंड आवडायचे अशीही माहिती आता समोर आली आहे.

सिया होती प्रचंड नशेखोर

सिया गोयल सतत नशेत असायची. तिला नशा करायला प्रचंड आवडायचे. आणि म्हणून आमच्या मुलांना आम्ही तिच्यापासून दूर ठेवायचो अशी माहिती सियाच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली. प्रचंड लाड आणि हातात असलेला अमाप पैसा यामुळे सियाला मानवी नातेसंबंध आणि भावना याची काहीच किंमत राहिली नव्हती असंच या घटनेतून दिसतं.

घरात धार्मिक वातावरण अन् सियाचे वर्तन

गोयल कुटूंबातील वातावरण प्रचंड धार्मिक आहे. त्यांच्या घरी नेहमी भगवद्गगीतेचे पठन होत असते मात्र सियावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. घरातले धार्मिक वातावरण आणि कुटूंबाचे संस्कार या सर्वांना झुगारून देत सियाने आपल्या होणाऱ्या पतीची हत्या अत्यंत निर्दयीपणे केली.  

Advertisement
Tags :

.