For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ketan Agrawal Murder Case | केतन अग्रवालच्या मृत्यूचा जबर धक्का! आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

09:39 AM Jul 05, 2026 IST | NEETA POTDAR
ketan agrawal murder case   केतन अग्रवालच्या मृत्यूचा जबर धक्का  आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन
Advertisement

पुणे - गेले बऱ्याच दिवसापासुन केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज कोणतीना कोणती धक्कादायक माहीती समोर येत आहे.. काही दिवसापुर्वी चेतन आणि सियाचा मित्राने धक्कादायक खुलासा केला होता, त्याला केतनचा चेतन आणि सियाचा खुन करणार असल्याची माहीती समोर आली होती.. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहीती समोर येत आहे.. केतन अग्रवालच्या आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन झाले आहे..

Advertisement

काही दिवसांपूर्वी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. अशातच नातू केतनची हत्या झाली, याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

समोर आलेल्या माहीतीनुसार, केतनच्या अश्या जाण्याने त्यांना धक्का बसला होता..केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडले होते.. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांचे शनिवारी निधन झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.