For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Keshavrao Bhosale Natya Gruh | कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह लवकरच नव्या रूपात; ;महापौर रुपाराणी निकम यांची ग्वाही

03:17 PM Mar 04, 2026 IST | NEETA POTDAR
keshavrao bhosale natya gruh   कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह लवकरच नव्या रूपात   महापौर रुपाराणी निकम यांची ग्वाही
Advertisement

     कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह लवकरच नव्या रूपात

Advertisement

कोल्हापूर- संपूर्ण कोल्हापूरकरांची अस्मिता आणि महाराष्ट्रातील रंगकर्मींचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम लवकरच पूर्ण होईल..त्यासाठी रंगकर्मी , कलाकारांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही आज महापौर रुपाराणी निकम यांनी दिलीये..

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करत महापौरांकडून या संदर्भात आढावा घेण्यात आलायं..संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी भीषण आग लागल्याने ते आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं..त्यानंतर राज्य शासनाकडून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्ण उभारणीसाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करुन कामास सुरुवात करण्यात आली..मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याचं म्हणत 27 मार्चला रंगकर्मी दिनापूर्वी नाट्यगृह करण्यात यावं अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या होत्या..

Advertisement

त्यामुळे आज महापौर रुपाराणी निकम यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामांची पाहणी करून आढावा घेतलायं..यावेळी नाट्यगृहाचं पहिल्या टप्प्यातील काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं आहे..दुसऱ्या टप्प्यातील देखील काम लवकरच पूर्ण करण्यात येईल..त्यामुळे रंगकर्मींना आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिलीये.

Advertisement
Tags :

.