Keshavrao Bhosale Natyagruha: मार्चमध्ये उघडणार नाट्यगृहाचा पडदा, 27 मार्चला पहिला प्रयोग
नाट्याकर्मींनी हे काम कधी होणार ते लेखी द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला
कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यागृहाचा पडदा पुढील वर्षी 27 मार्चला नाट्याकर्मी दिनी उघडणार आहे. महानगरपालिका अधिकारी, नाट्यागृहाचे बांधकाम कंत्राटदार व नाट्याकर्मी कलाकार यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला. सुमारे अडीच तासापेक्षा अधिक काळ ही बैठक झाली.
केशवराव भोसले या जळीत नाट्यागृहाचे पुनर्बांधकाम सुरू आहे. 9 ऑगस्ट या कै. केशवराव भोसले यांच्या जन्मदिनी ते खुले होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. नंतर जानेवारीपर्यंत हे नाट्यागृह पुन्हा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. पण पुन्हा बांधकाम रेंगाळले. यामुळे नाट्याकर्मी संतप्त झाले होते. याविषयी मंगळवारी नाट्यागृह आवारात बैठक झाली.
यात बांधकाम हेरिटेजनुसार नसल्याचा आरोप झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत, नाराजी व्यक्त केली. याबाबत लक्ष्मी हेरिकॉनचे कंत्राटदार यांनी उडवाउडवीची उतरे दिली. नाट्यकर्मींनी हे काम कधी होणार ते लेखी द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर सर्वानुमते मार्चच्या 27 रोजी नाट्याकर्मी दिनी हे नाट्यागृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संयुक्त बैठक दर आठवड्याला घेण्यात येणार आहे.
बैठकीस अभियंता मस्कर, अतिरिक्त आयुक्त आडसूळ, प्रकल्प सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, इंजिनियर अनुराधा वांडरे, प्रकल्प सल्लागार रायकर, लक्ष्मी हेरिकॉनचे श्रीनिवास सुरगे, व्ही. के. पाटील, अभिनेते आनंद काळे, रंगकर्मीं किरण चव्हाण, सागर वासुदेवन, रविराज पवार, संजय मोहिते, सुभाष गुंदेशा, रोहन घोरपडे, संग्राम भालकर, वनीता दिक्षित होते.
मूळ बांधकामात कोणताच बदल नाही
"काही तांत्रिक कारणामुळे नाट्यागृहाच्या बांधकामाला वेळ लागला आहे. भिंती कैच्ची, मंगलोरी छत आदी पहिल्या टप्प्याचे काम 95 टक्के तर दुसऱ्या टप्प्याचे काम 50 टक्के झाले आहे. साऊंड, खुर्च्या, लाईट आदी काम तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. यावेळी अनेकवेळा प्लॅन बदलला असला तरी, मूळ बांधकाममध्ये कोणताच बदल केलेला नाही."
- चेतन रायकर, प्रकल्प सल्लागार
वेळेत व दर्जेदार काम व्हावे
"नाट्यागृहाच्या बांधकामाबाबत अनेक त्रुटी आहेत. याबाबत दर आठवड्याला संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाट्यागृह आमचे घर असून, वेळेत व दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा आहे."
- आनंद काळे, अभिनेत