For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी भाषेच्या जागरासाठी केसरीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

03:20 PM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठी भाषेच्या जागरासाठी केसरीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
Advertisement

ओटवणे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचन मंदिर आणि केसरी प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सवाद्य मराठी भाषा जनजागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश दिला.

Advertisement

कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक सुनील जाधव, समीक्षा नाईक, प्रियदर्शनी जाधव, ग्रंथपाल दीपा सुकी आणि विलास जंगले यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, केसरी उपसरपंच भिवा सावंत, केंद्रप्रमुख जी. आर. निऊंगरे, मुख्याध्यापिका वृषाली पाटील यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ‘मला आवडलेले पाठ्यपुस्तक’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थित विद्यार्थ्यांनी दररोज 15 ते 20 मिनिटे प्रकट वाचन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

Advertisement

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा व वाचनाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तरे देणाऱ्या रामचंद्र संदेश सावंत, सुहानी पाटील, मोहित तुकाराम सावंत, रुंजी महेश कासले आणि वेदिका विजय जंगले यांचा स्मृतिचिन्ह व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहानी पाटील, सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले, तर हर्षाली सावंत यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.