For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरिस ऑलिम्पिकनंतर केर्बर निवृत्त

06:22 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॅरिस ऑलिम्पिकनंतर केर्बर निवृत्त
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

जर्मनीची 36 वर्षीय महिला टेनिसपटू अॅन्जेलिक केर्बरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. केर्बरने आपल्या वैयिक्तक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

टेनिसमध्ये एकूण 4 ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा प्रत्येकवर्षी घेतल्या जातात. केर्बरने ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन तसेच अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. पण तिला आजपर्यंत फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस हा क्रीडा प्रकार येथील रोलाँ गॅरो रेडक्लेकोर्टवर खेळविला जाणार आहे. याच ठिकाणी आपण आपल्या टेनिस क्षेत्राला निरोप देणार असल्याचे केर्बरने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत केर्बरचा पहिल्या फेरीतील सामना जपानच्या नाओमी ओसाकाशी होणार आहे. केर्बरने 2016 साली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकून मानांकनात अग्रस्थान मिळविले होते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने एकेरीत रौप्य पदक पटकाविले होते. दोन वर्षांपूर्वी तिने विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. केर्बरने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.