महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केरळ मुख्यमंत्र्यांची कन्या ईडीच्या रडारवर

06:32 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी अडचणी वाढण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ तिऊअनंतपुरम

Advertisement

मनी लाँड्रिंग प्रकरणात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार असतानाच मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. विजयन यांची मुलगी वीणा यांच्या आयटी फर्मला एका खाण कंपनीकडून 1.72 कोटी ऊपये मिळाले आहेत. केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळाची आयटी फर्ममध्ये 13 टक्के भागिदारी होती. याबाबत त्यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळमध्ये पोहोचलेल्या भाजपच्या सर्व नेत्यांनी माकपच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी माकप नियंत्रित सहकारी बँकांमधील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि वीणाच्या मालकीच्या आयटी फर्म एŸक्सलॉजिकने केलेल्या व्यवहारांकडे लक्ष वेधले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article