For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाचा सावे विजेता

06:38 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाचा सावे विजेता
Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

Advertisement

केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू सेबेस्टियन सावेने रविवारी येथे झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदविली. या मॅरेथॉनचे जेतेपद मिळविताना दोन तासांपेक्षा कमी कालावधीत विजेतेपद मिळविणारा केनियाचा सावे हा पहिला धावपटू ठरला आहे.

रविवारी झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये सेबेस्टियन सावेने 1 तास, 59 मिनिटे आणि 30 सेकंदांचा अवधी नोंदवित विजेतेपद मिळविले. इथोपियाचा धावपटू योमिप कीजेलेचा याने 1 तास, 59 मिनिटे आणि 41 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले. या मॅरेथॉनमध्ये 2 तासांपेक्षा कमी कालावधी घेत विश्व विक्रम करणारा सावे हा पहिला केनियाचा धावपटू ठरला आहे. युगांडाच्या जेकॉब किप्लीमोने 2 तास, 28 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. लंडन मॅरेथॉनमध्ये केनिया आणि इथोपियाच्या धावपटुंनी आपले वर्चस्व गेली बरीच वर्षे राखले होते. हॅले गेब्रेसेलासी, विल्सन किपसँग, किपचोगी आणि अलिकडच्या कालावधीत किपटूम या धावपटुंनी सदर मॅरेथॉनमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी केली आहे.

Advertisement

लंडन मॅरेथॉनमध्ये महिलांच्या विभागात इथोपियाच्या टीगेस्ट असिफाने 2 तास, 15 मिनिटे आणि 41 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. असिफाची या मॅरेथॉनमधील ही सर्वात जलद वेळ आहे. पण 2003 साली या मॅरेथॉनमध्ये पाओला रॅडक्लीफने नोंदविलेला विक्रम मात्र अद्याप अबाधित राहिला आहे. व्हीलचेअर पुरुषांच्या विभागातील जेतेपद स्विसच्या मार्सेल हगने सलग सहाव्यांदा पटकाविले. तर व्हीलचेअर महिलांच्या विभागात कॅथरीनी डेब्रुनेरने तातियाना मॅकफेडेनला मागे टाकत विजेतेपद पटकाविले.

Advertisement
Tags :

.