कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवाल यांचा पंजाबमध्ये शीशमहाल

06:22 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय जनता पक्षाचा आरोप, चौकशीची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक आलिशान शीशमहाल पंजाबमध्ये आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या कथित शीशमहालाची छायाचित्रेही भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केली आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मलिवाल यांनी या आरोपाला दुजोरा दिला असून त्यांनीही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

हा शीशमहाल चंदीगढमधील विभाग 2 येथील एका दोन एकरच्या भूखंडावर असून ते सरकारी निवासस्थान आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून हे निवासस्थान केजरीवाल यांना देण्यात आले आहे. या निवासस्थानाचा विकास केजरीवाल यांनी ‘सप्ततारांकित’ राजमहालासारखा केला आहे. यासाठी पंजाब सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असा हा आरोप आहे.

दिल्लीच्या आठवणी ताज्या

केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या सरकारी अधिकृत निवासस्थानाचा सरकारच्या पैशानेच ‘शीशमहाल’ केला होता. या शानदार महालाच्या अंतर्भागाची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव होऊन दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. आम आदमी पक्षाच्या या पराभवाचे एक कारण हा शीशमहाल असल्याचे मानले जाते. आता पंजाबमध्येही असाच शीशमहाल केजरीवाल यांनी आपल्यासाठी निर्माण केला आहे, असा आरोप असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी केजरीवाल शीशमहालात ?

गुरुवारी केजरीवाल यांनी पंजाबमधील या शीशमहालात काही काळ वास्तव्य केले होते. पंजाब सरकारच्या हेलिकॉप्टरने केजरीवाल या महालासमोर उतरले आणि त्यांनी महालात जाऊन काही काळ वास्तव्य केले. नंतर येथून केजरीवाल विमानतळावर गेले आणि पंजाब सरकारच्या खासगी विमानाने ते गुजरातला आपल्या पक्षाच्या कार्यासाठी गेले, असा आरोप स्वाती मलिवाल यांनी केला आहे.

लपवाछपवीचाही आरोप

केजरीवाल यांनी पंजाबमधील या शीशमहालाची माहिती दडवून ठेवली आहे. या महालासाठीही पंजाब सरकारचे अनेक कोटी रुपये घालविण्यात आले आहेत. हा करदात्यांचा पैसा असून केजरीवाल यांनी तो स्वत:च्या सुखासीनतेसाठी उधळला आहे. या महालात एक जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि इतर सर्व सुखसोयी निर्माण करण्यात आल्या आहेत. बाहेर लोकांना केजरीवाल आपण सर्वसामान्य व्यक्ती असल्याचे भासवितात. तथापी, करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करुन त्यांनी आपल्या वास्तव्यासाठी सरकारी महाल सजविले आहेत. साधेपणाच्या बुरख्याच्या आतली त्यांची विलासी वृत्ती आता उघड झाली आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

‘आप’ची प्रतिक्रिया नाही...

भारतीय जनता पक्षाच्या या नव्या आरोपावर आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल यांची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही. पंजाब सरकारनेही त्याची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे गूढ अधिक वाढले आहे. या शीशमहालाच्या चौकशीची मागणी जोर धरु लागली असून पंजाब सरकारने अद्याप ती मान्य केलेली नाही. आपच्याच राज्यसभा खासदार मलिवाल यांनीही चौकशीचा आग्रह धरला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article