For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांच्या कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ

06:09 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांच्या कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ
Advertisement

राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वीची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी तिहार तुऊंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. केजरीवाल यांच्यासोबत या प्रकरणात आरोपी मानले जाणारे विनोद चौहान यांनाही हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकांमुळे त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा तुऊंगात जावे लागले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.