महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निळ्या वॅगनारमध्ये दिसणार केजरीवाल

06:46 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपची उपरोधिक टीका : सुनीता भाजी खरेदी करताना दिसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आप नेते संजय सिंह यांच्या पत्रकार परिषदेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने आपच्या या दाव्याला नाटक ठरवत केजरीवाल अजून अनेक एपिसोड दाखविणार असल्याचे म्हणत त्यात ते निळ्या वॅगनारमधून फिरताना दिसून येतील आणि त्यांच्या पत्नी सुनीता या रस्त्याच्या कडेला भाजी खरेदी करताना आढळतील अशी उपरोधिक टीका केली आहे.

दिल्लीत मंगळवारी ज्या राजकीय नाटकाची सुरुवात झाली, त्याचा पहिला एपिसोड संजय सिंह यांनी दाखविला आहे. अजून हे नाटक बराच काळ चालणार आहे. संजय सिंह हे टप्प्याटप्प्याने पटकथा उलगडत जाणार आहेत. पुढील एपिसोडमध्ये केजरीवाल हे स्वत:चा ‘शीशमहाल’ सोडण्याचे नाटक करतील आणि मग नामनिर्देशित मुख्यमंत्री त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर केजरीवाल छोटा फ्लॅट, झोपडपट्टी किंवा कौशांबीतील घरात स्थलांतरित होण्याचा ड्रामा रचतील अशी उपरोधिक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केली आहे.

यानंतर ज्या  मोठ्या वाहनातून भ्रष्ट मुख्यमंत्री फिरत होते, ती सोडून देत निळ्या वॅगनारचा शोध घेतला जाईल. कार 10 वर्षे जुनी असल्याने दंड भरावा लागेल. मग दिल्ली पोलिसांना दुषणे देण्यात येतील. हा तिसरा एपिसोड असणार आहे. चौथ्या एपिसोडमये माता सुनीता या एखाद्या ठेल्यावरून भाजी खरेदी करतील. मग त्यांचा एक नातेवाईक अचानक आजारी पडेल आणि त्याला सरकारी  रुग्णालयात दाखल केले जाईल. हे संपूर्ण नाटक हळूहळू चालविले जाणार आहे. मग ते कुठल्या तरी रिक्षातून फिरताना दिसून येतील. हा पूर्ण चित्रपट चालणार असल्याची टीका भाजप नेत्याने केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article