महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जामिनासाठी केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात

06:25 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुदत 7 दिवसांनी वाढवण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे आम आदमी पक्षाने सोमवारी सांगितले. आजारपण आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे अंतरिम जामिनाचा कालावधी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. केजरीवाल यांची 10 मे रोजी दिल्लीच्या तिहार तुऊंगातून तात्पुरती सुटका झाली होती. मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 50 दिवस तुऊंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे.

आम आदमी पक्षाच्या म्हणण्यानुसार अटकेच्या कारवाईपासून केजरीवाल यांचे वजन 7 किलोने कमी झाले आहे. सध्या त्यांची केटोन पातळी जास्त असून ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांनी त्यांना पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी (पीईटी-सीटी) स्कॅन आणि इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिल्यामुळे केजरीवाल यांनी आपल्या अंतरिम जामिनासाठी मुदतवाढ मागितली आहे.

तिहार तुऊंगातून सुटल्यानंतर केजरीवाल सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया ब्लॉकच्या प्रचारात सामील झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. त्यांना जामीन 1 जूनपर्यंत लागू असून 2 जून रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article