For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल चालवताहेत ‘तिहार’मधून सरकार

06:45 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल चालवताहेत ‘तिहार’मधून सरकार
Advertisement

कारागृहातून पहिला आदेश जारी : पत्रातून दिल्या महत्त्वाच्या सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुऊंगातून सरकार चालवत आहेत. रविवारी सकाळी त्यांनी तुऊंगातूनच पहिला आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री केजरीवालांनी जल मंत्रालयाबाबत आदेश जारी केला आहे. त्यांनी हा आदेश जलमंत्री आतिशी मार्लेना यांना पाठवला आहे. आतिशी यांनीच पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली आहे. मुख्य आदेशासोबतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून एक पत्रही पाठवले आहे. हे पत्र वाचत असताना आपल्या डोळ्यात अश्रू आल्याचे आतिशी म्हणाल्या.

Advertisement

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली असून त्यांना ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. सध्या त्यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता तेथूनच सरकार चालविण्यास सुरुवात केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने केजरीवाल यांनी दिल्लीवासियांच्या पाणीपुरवठ्याबाबत आपल्या सहकारी मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयासंबंधीची माहिती मंत्री आतिशी यांनी दिली.

पत्रकार परिषदेत आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल संपूर्ण दिल्लीला आपले कुटुंब मानतात. त्याच अनुषंगाने त्यांनी दिल्लीवासियांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. दिल्लीच्या काही भागात पाणी आणि गटारांच्या अनेक समस्या असल्याचे मला कळले आहे. मला याची काळजी वाटत आहे. मी तुऊंगात असताना लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. उन्हाळाही येत असून जेथे पाण्याची कमतरता आहे तिथे योग्य प्रमाणात टँकरची व्यवस्था करा. मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश द्या, जेणेकऊन जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. लोकांच्या समस्यांवर तात्काळ आणि योग्य तोडगा काढा. गरज पडल्यास उपराज्यपालांची मदत घ्या. तेही तुम्हाला नक्कीच मदत करतील, असे केजरीवाल यांनी पत्राद्वारे सरकारला कळवले आहे.

Advertisement
Tags :

.