For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांची दिवसातून 5 तास चौकशी

06:14 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांची दिवसातून 5 तास चौकशी
Advertisement

आयफोनचा पासवर्ड देण्यास नकार : ईडीने साधला थेट ‘अॅपल’ कंपनीशी संपर्क

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मद्य घोटाळ्यात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे. न्यायालयाने ईडीची कोठडी ठोठावल्यामुळे ते सध्या तिहार कारागृहात असून त्यांची दिवसातून किमान पाच तास चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान ते  तपासात सहकार्य करत नसल्यामुळे इतके दिवस कोठडीत असूनही अधिकाऱ्यांना त्यांच्या अॅपल आयफोनमधील डाटा मिळू शकलेला नाही. आयफोनचा पासवर्ड देण्यास केजरीवाल यांनी नकार दर्शवल्यानंतर त्याचे लॉक उघडण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट अॅपल कंपनीशी संपर्क साधला आहे.

Advertisement

ईडीला इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणून मुख्यमंत्री केजरीवाल यांचा कोणताही वैयक्तिक संगणक किंवा डेस्कटॉप सापडला नाही. मात्र, त्यांच्या आयफोनसह चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या मोबाईल फोनचाही समावेश आहे. 21 मार्च 2024 च्या रात्री केजरीवाल यांना अटक केली तेव्हा त्यांच्या घरात सुमारे 70,000 ऊपये सापडले होते. मात्र, ही रक्कम जप्त करण्यात आली नाही.

अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला आयफोन बंद केला आहे. मात्र, त्याचा पासवर्ड अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केलेला नाही. सदर आयफोनमधील डेटा आणि चॅट्समधून ईडीला आपच्या ‘पोल स्ट्रॅटेजी’ आणि निवडणूकपूर्व युतीबद्दल माहिती सापडणार असल्याने त्यांनी तो ईडीच्या अधिकाऱ्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. अहवालानुसार, अरविंद केजरीवाल यांच्या आयफोनमधून डेटा काढण्यासाठी ईडीने अधिकृतपणे आयफोन निर्माता अॅपलशी संपर्क साधला असल्याचे समजते. तथापि, कोणताही डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आयफोनचा पासवर्ड आवश्यक असल्याचे कंपनीने अधिकाऱ्यांना सांगितले.

जवळपास वर्षभरापासून हा आयफोन आपल्याकडे होता, असे चौकशीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ईडीला सांगितले. 2020-2021 मधील मद्य धोरणाचा मसुदा तयार करताना वापरलेला मोबाईल फोन आता आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अधिकाऱ्यांना सुनीता केजरीवाल यांच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळाला असून त्याचा डेटाही काढण्यात आला आहे.

ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांची रोज पाच तास चौकशी करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) नेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल तिहार तुऊंगात न्यायालयीन कोठडीत असले तरी सीबीआय त्यांच्या कोठडीची मागणी करू शकते. वास्तविक, ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि नवीन मद्य धोरणाद्वारे 100 कोटी ऊपयांचा निधी बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप केला आहे. यापैकी 45 कोटी ऊपये गोव्यातील आम आदमी पक्षाच्या (आप) 2021-22 च्या निवडणूक प्रचारासाठी वापरले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

आमने-सामने चौकशीही सुरू

कोठडीदरम्यान अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे माजी पीएस सी. अरविंद यांचाही सामना करावा लागला. सी. अरविंद यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी मद्य धोरणाबाबतचा मसुदा अहवाल सी. अरविंद यांच्याकडे सोपवण्यात आल्याचा आरोप रिमांड अर्जात करण्यात आला आहे. सी. अरविंद यांनी केजरीवाल यांच्यासमोर आपल्या विधानाचा पुनऊच्चार केला. याशिवाय अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणाशी संबंधित आणखी एक-दोन व्यक्तींना सामोरे जावे लागले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या लोकांची नावे उघड केलेली नाहीत. या प्रकरणात केजरीवाल यांची मुख्य संशयित आरोपी म्हणून चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि आपचे खासदार संजय सिंह हेही तुऊंगात आहेत.

Advertisement
Tags :

.